शेतकरी महा-डीबीटी सर्व योजना मध्ये अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे : MahaDBT Farmer Scheme Documents Upload List

MahaDBT Farmer Scheme Documents Upload List

MahaDBT Farmer Scheme :- नमस्कार, मित्रांनो महाडीबीटी पोर्टल वरून तुम्ही भरपूर योजनेसाठी अर्ज केला असेल कोणत्याही योजनेमध्ये जर तुमचं नाव लागलं असेल म्हणजेच तुमचं लॉटरीमध्ये जर नाव लागलं असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर कागदपत्रे अपलोड करावी लागतात? कोणत्या योजनेसाठी कोणती कागदपत्रे अपलोड करायची असतात? हेच या मध्ये आपण पाहणार आहोत.

कृषि विभागाच्या योजनांसाठी निवड झाल्यानंतर शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे पुढीप्रमाणे आहेत.

(महा डीबीटी पोर्टलवर आधार क्रमांक अपडेट केला असल्याची खात्री करून घ्यावी, आधार प्रोफाईल नसेल तर अनुदान वितरण होणार नाही)

कांदा चाळ योजनेसाठी

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • DPR (प्रपत्र 2 हमीपत्र) (प्रपत्र 4 बंधपत्र)
 • 7/12 वर कांदा पिकाची नोंद नसेल तर कांदा पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र {MahaDBT Farmer Scheme Documents Upload List}

प्लास्टिक मल्चिंग योजनेसाठी

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • 7/12 वर फलोत्पादन पिकाची नोंद नसेल तर फलोत्पादन पिकाचे स्वयंघोषित पेरा प्रमाणपत्र
 • चतुःसीमा नकाशा (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

हरितगृह / शेडनेटगृह योजनेसाठी

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र 1)
 • विहित नमुन्यातील बंधपत्र (प्रपत्र 2)
 • चतुःसीमा नकाशा
 • वैजात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र “MahaDBT Farmer Scheme Documents Upload List”

कृषि यांत्रिकीकरण योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • मंजूर यंत्र / औजाराचे कोटेशन
 • मान्यता प्राप्त संस्थेचा वैध टेस्ट रिपोर्ट
 • Tractor चलित औजारासाठी RC
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
 • केंद्र शासनाच्या यादीत समाविष्ट असलेल्या पावर टिलर व tractor ला च अनुदान देय राहील, त्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही पावर टिलर व tractor ला पूर्वसंमती देण्यात येणार नाही.
 • पूर्वसंमती पूर्वी खरेदी करण्यात आलेल्या यंत्र/औजाराला अनुदान देय राहणार नाही.
 • औजारे बँकेसाठी खरेदी करावयाच्या सर्व यंत्र/औजारांचे कोटेशन व वैध टेस्ट रिपोर्ट अपलोड करणे आवश्यक आहे. ‘MahaDBT Farmer Scheme Documents Upload List’

क्षेत्र विस्तार (Dragon Fruit) योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यात हमीपत्र
 • अंदाजपत्रक
 • स्थळदर्शक नकाशा
 • चतुःसीमा
 • वैध जात प्रमापत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र

ठिबक / तुषार / PVC पाईप स्कीम

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र (परिशिष्ट 19) 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी सिंचन सुविधा असल्याबाबत स्वयंघोषणा पत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) {MahaDBT Farmer Scheme Documents Upload List}

पंपसंच (ISI / BEE labeled with Minimum 4 Star rated) योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • मंजूर घटकाचे कोटेशन
 • मंजूर घटकाचा टेस्ट रिपोर्ट
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र
 • 7/12 उताऱ्यावर सिंचनाच्या सुविधेबाबतची नोंद नसल्यास विहीर, शेततळे इत्यादी बाबत स्वयंघोषणा पत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजना

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • विहित नमुन्यातील हमीपत्र
 • प्रमाणपत्र (अनु. जाती/ अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • सामाईक क्षेत्र असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र [MahaDBT Farmer Scheme Documents Upload List]

भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • स्थळदर्शक नकाशा चतुःसीमा
 • विहित नमुन्यातील हमीपत्र
 • वैध जात प्रमाणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी)

वैयक्तिक शेततळे योजना (NPSM/MTS)

 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 7/12
 • तलाठी सही किंवा डिजिटल स्वाक्षरी असलेला अद्ययावत 8 अ
 • स्थळदर्शक नकाशा
 • चातु:सीमा
 • वैध जात प्रमणपत्र (अनु. जाती/अनु. जमाती शेतकऱ्यांसाठी) “MahaDBT Farmer Scheme Documents Upload List”
 • शेतकन्यांकडे त्याच्या नावावर किमान 0.60 हे. जमीन असणे आवश्यक आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारे वरील कागदपत्रे तुम्ही महाडीबीटी फार्मर लॉटरीमध्ये नाव लागल्यानंतर अपलोड करू शकता हा लेख तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.

3 thoughts on “शेतकरी महा-डीबीटी सर्व योजना मध्ये अपलोड करावयाची आवश्यक कागदपत्रे : MahaDBT Farmer Scheme Documents Upload List”

 1. महाडिबिटी पोर्टल ओपन होत नाही काय करावे लागेल शुभम भाऊ .

 2. RAHUL SUBHASH NANDRE

  दादा नमस्कार
  महा डिबिटी योजने अंतर्गत वडिलांना ट्रॅक्टर लागले होते त्याचे अनुदान 1.25 लाख मिळणार आहे आता त्याच योजनेत वडिलांना 5 फुट रोटव्हिटर लागले आहे पुरवसहमती आली त्या नंतर डीलर च्या खात्यात rtgs करून पेमेंट केल व कागदपत्र उपलोड केल पण आज कृषी पर्यवेशक यांनी माझ्या वडिलांच्या नावावर लागलेले रोटव्हिटर मोका तपसनीला नकार दिला कारण की एका शेतकऱ्याला एका आर्थिक वर्षात फक्त 1 लाख पर्यंतच लाभ दिला जाईल असे त्यांनी उत्तर दिले. याबाबत काही परिपत्रक आहे का कारण मला त्यांनी पुरवसहमती दिली व माझ्ये पैसे अडकले व आता ते नकार देत आहे कृपया योग्य पर्याय सुचवावा व परिपत्रक मिळेल तर द्यावे ही विनंती….

  1. हो त्यांचे बरोबर आहे आता तसा gr मध्ये पण दिले आहे. यावर काही उपाय नाही पण कृषी पर्यवेशकला थोडे फार काही पैसे देऊन होतंय का पहा … नाहीतर उपाय नाही

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top