जिल्हा परिषद योजना सुरू हे फॉर्म भरा | ZP Pune Yojana 2022

Zp pune yojana

ZP Pune Yojana (जिल्हा परिषद योजना): पुणे जिल्हा परिषद पुणे, कृषि विभागाअंतर्गत जिल्हा परिषद निधी अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या विविध योजना राबविणेत येत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजना राबवितांना शासनाच्या ५ डिसेंबर २०१६ च्या शासन निर्णयानुसार थेट लाभ हस्तांतरण (DBT) या पध्दतीने राबविणेत येणार आहेत.

कृषि विभागाच्या विषय समितीने निश्चित केलेल्या अटी व शर्तीनुसार पात्र असणा-या व अंततः मान्यता दिलेल्या पात्र व गरजु लाभार्थ्यांना विहीत बार्बीचा लाभ देण्यात येणार आहे. सदर योजनांविषयी खालील तक्त्यात थोडक्यात माहिती देण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ (www.punezp.org – जिल्हा परिषद योजना) संबंधित सर्व पंचायत समित्या व ग्रामपंचायतीत उपलब्ध आहे.

विहीत निकषां प्रमाणे पात्र लाभार्थ्यांकडुन खालील योजनांसाठी दि. २२ ऑगस्ट २०२२ पर्वत विहीत नमुन्यातील अर्ज कागदपत्रासहित ऑफलाईन पध्दतीने मागविणेत येत आहेत. विहीत मुदतीत अर्ज व कागदपत्रे संबंधित पंचायत समिती कार्यालयात मुदतीत जमा करावयाचे आहेत.

ग्रामिण भागातील महिलांना व्यवसायभिमुख/ जिवनाश्यक वस्तु पुरविणे अंतर्गत महिलांना पीठ गिरणी/शिलाई मशिन /सोलार हिटर /तेलघाणा पुरविणे हे योजनेचे उद्धिष्ट आहे.

ZP Pune Yojana 2022

 1. ७५% अनुदानावर शेतकऱ्यांना सुधारित औजारे व साहित्य पुरवठा करणे.
 2. ३ एच.पी. ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच
 3. ५ एच.पी. ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच
 4. ७.५ एच.पी. ओपनवेल विदयुत मोटार पंपसंच (४) २ एच.पी. इलेक्ट्रीक कडबाकुट्टी यंत्र मोटारसह (हॉरिझेंटल मॉडेल)
 5. ५ एच.पी. डिझेल इंजिन पंपसंच
 6. प्लॅस्टिक क्रेटस २० किलो क्षमता
 7. प्लॉस्टक ताडपत्री ( हूक जॉईन्ट ६ x ६ मिटर)
 8. ७५ एमएम पी.व्ही.सी. पाईप ४ kg/am२
 9. ९० एमएम इंची पी.व्ही.सी. पाईप ४ kg/em२
 10. ७५ एमएम एच.डी.पी.ई. पाईप ३.२ kg/em क्लोपसह किंवा क्लीपविरहीत
 11. ट्रॅक्टरचलित दोन फाळी सरीरिजर
 12. बॅटरी ऑपरेटेड नॅपसॅक स्प्रेपंप
 13. हॉरिझेंटल ट्रिपल पिस्टन स्प्रेपंप ऑईल इंजिनसह

संबंधित शेतकऱ्याने विहित कालावधीत आवश्यक कागदपत्रांच्या (७/१२, ८-अ दाखला, आधार कार्ड/ ओळखपत्र) स्वयंसाक्षांकित प्रती सादर करावयाच्या लाभार्थ्यांचे धारण क्षेत्र जास्तीत जास्त १० एकरपर्यंत असावे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना प्राधान्य.योजनेंतर्गत लाभार्थ्यास जास्तीत जास्त एक अवजारासाठी लाभ देण्यात येईल. jilha parishad yojana 

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

सदर योजनेंतर्गत पी.व्ही.सी. व एच.डी.पी.ई. पाईपचा लाभ प्रतिलाभार्थ्यास जास्तीत जास्त २० पाईप (१२० मीटर) व प्लॅस्टीक क्रेट्स या बाबीसाठी प्रतिलाभार्थ्यास जास्तीत जास्त ३० नगचा लाभ देण्यात येईल.

विद्युत मोटार पंपसंचाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थीन सिंचन सुविधेची नोंद असलेला पुरावा देणे आवश्यक राहील. तसेच लाभाथ्यनि कडबाकुट्टी यंत्र या बाबीसाठी विजेची सोय असलेबाबत वीजबिलाची साक्षांकित प्रत देणे आवश्यक राहील. ५. आधार कार्डशी जोडणी केलेल्या बँकपुस्तकाची छायांकित प्रत.

नैसर्गिक सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन योजना / परसबाग उभारणेस अर्थसाहाय्य देणे

 1. नमूद योजनेंतर्गत शेतकऱ्यांस गिर गाय/ साहीवाल गाय खरेदीसाठी अनुदान, शेतकरी प्रशिक्षण / अभ्यास दौरा, गांडूळ खतनिर्मिती सयंत्रे, जैविक खते/ जैविक कीटकनाशके, बायोडायनॅमिक खत युनिटसाठी निविष्ठा व प्रशिक्षणासाठी प्रोत्साहन अनुदान, हिरवळीची खते (ताग/देंचा बियाणे) व इत्यादी आवश्यक बाबीसाठी लाभ दिला जाईल. ‘jilha parishad yojana’
 2. सेंद्रिय शेती उत्पादन प्रमाणीकरण करणे कन्व्हर्जन वर्ष १, २,३ नमूद योजनेंतर्गत गाय या घटकाचा लाभ देत असताना प्रतिशेतकन्यास गाय खरेदी किमतीच्या ७५% किंवा रु. ४५,०००/- यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देय राहील.
 3. नमूद योजनेंतर्गत गायीसह अन्य सर्व घटकांचा लाभ घेतल्यासच प्रतिलाभार्थी शेतकन्यास प्रोत्साहन अनुदान देय राहील व त्यांची मर्यादा रु. ६५,०००/- इतकी राहील.
 4. शेतक-यांना ७५% अनुदानावर सोलर वॉटर हिटर संवत्र २०० लिटर क्षमता (अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत निर्माण करणे व सौर प्रकल्प कार्यान्वित करणे योजना.) “शारदा” शेतकरी माता भगिनी अर्थसहाय्य योजना. (पुणे जिल्हयात वास्तव्य व शेतजमिन असणा-या विधवा शेतकरी महिला घटस्फोटीत शेतकरी महिला, परितक्त्या शेतकरी महिला व निराधार शेतकरी महिला) ZP Pune Yojana 

उपरोक्त सर्व योजनांतर्गत पुरविण्यात येणारे साहीत्य हे लाभार्थ्याने प्रथम स्वःखर्चाने घेण्याचे आहे. परंतु असे साहित्य घेण्यापूर्वी अर्जदारानं केलेल्या अर्जाची पात्रता तपासून प्रथम हेतुपत्र (101) दिले जाईल व अशा हेतुपत्रात विहित केलेल्या मुदतीत खरेदी समितीने निश्चित केलेल्या मापदंडाचे साहित्य लाभार्थ्यांने स्वतः खरेदी करून त्याचे पुराव्या दाखल जी. एस. टी. (GST) धारक

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

लाभर्थ्याचे बँकेतील खात्याचा पुरावा दर्शविणारे खाते पुस्तकाची प्रत, बँकेचे नाव, पत्ता, खाते नंबर व आय.एफ.एस.सी. कोड ख चंद नसावे. टिप:- १. सदर योजनेचे विहीत नमुन्यातील अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती कार्यालयात व जिल्हा परिषद संकेतस्थळावर उपलब्ध आहेत व अर्ज भरुन पंचायत समिती कार्यालयात जमा करावयाचे आहेत.

 1.  उपरोक्त योजनांतर्गत एकाच बाबीसाठी लामाध्यांनी अर्ज करावयाचा आहे.
 2. लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय यांचेकडे दि. २२ ऑगस्ट २०२२ पर्यंत जमा करावयाचे आहे.
 3. लाभार्थी निवडीचा अंतिम अधिकार कृषि समिती सभेस राहील.
 4. अर्जासोबत जोडलेली माहिती चुकीची अथवा खोटी आढळल्यास लाभार्थ्यास मिळालेला लाभ १००% वसुल करणेत येईल.
 5. अधिक माहितीसाठी नजीकच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा.
 6. निधीचे उपलब्धतेनुसार लाभार्थी निवड कमी जास्त होऊ शकते.

FORM DOWNLOAD  – CLICK HERE

जिल्हा परिषद योजनेला किती अनुदान मिळणार आहे?

कृषी योजनांना 75 टक्के अनुदान आहे व पशूसंवर्धन योजनांना 50 टक्के अनुदान मिळणार आहे.

जिल्हा परिषदेच्या एकूण किती योजना आहेत?

एकूण २० पेक्षा जास्त योजना दरवर्षी राबवल्या जातात.

1 thought on “जिल्हा परिषद योजना सुरू हे फॉर्म भरा | ZP Pune Yojana 2022”

 1. संतोष म्हस्के

  अपंगांसाठी जिल्हा परिषद मधून झेरॉक्स मशीन मिळण्यासाठी काय करावे लागेल काय योजना आहे कृपया माहिती द्यावी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top