युगे अठ्ठावीस आरती लिरिक्स मराठीत | yuge atthavis aarti lyrics in marathi

yuge atthavis aarti lyrics in marathi

yuge atthavis aarti lyrics in marathi : – 

yuge atthavis aarti lyrics in marathi

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा।
पुंडलिकाचे भेटी पखम्ह आले गा।
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा
जय देव जय देव जय पांडुरंगा
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।।१।।
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी ।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती ॥२॥
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा ।
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा ।
राई रखुमाबाई राणीया सकळा ।
ओवाळीती राजा विठोबा सावळा || ३||
ओवाळू आरत्या कुरवंडया येती ।
चंद्रभागेमाजी सोडूनिया देती।
दिंडया पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥४॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती ।
दर्शनहेळामात्रे तथां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओवाळीती ॥५॥

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top