वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना | Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2024

By Shubham Pawar

Published on:

Virbhadra kali Tararani Swayamsiddha Yojana 2024: ग्रामीण भागातील गरीब व जोखीमप्रवण महिलांना समृध्द, आत्मसन्मानाचे व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारीत स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करुन त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कोरोना (कोविड-१९) विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात राज्यात ग्रामीण भागामध्ये अनेक कुटुंबांमधील कर्त्या पुरुषांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्या कुटुंबांतील कर्त्या पुरुषांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या कुटुंबांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

अशा कुटुंबांतील महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे व त्यांची उपजीविका सन्मानजनक व्हावी या उद्देशाने त्यांना तातडीने मदत करणे आवश्यक आहे. वीरभद्रकाली ताराराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सिध्द करत स्वत:चे शौर्य सिध्द केले होते.

अशा वीरभद्रकाली ताराराणी यांचे नावाने राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाच्या काळात ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्युमुखी पडला आहे, त्या कुटुंबांमधील एकल (विधवा) महिलांसाठी उत्पन्नांची साधने निर्माण करुन त्यांना व सन्मानजनक उपजीविकेचे साधन व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी “वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा योजना” राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

या लेखामध्ये योजनेची सर्व प्रकारची माहिती जाणून घेणार आहोत. तर तुम्ही ही माहिती पुढे इतरांना देखील नक्की शेअर करा सर्व सोशल मिडिया नेटवर्कवर.

 

योजना उद्देश

ग्रामीण भागातील महिलांचा सर्वांगिण विकास होऊन त्यांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी शासनाच्या विविध योजनांचा कृतीसंगम घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मोठ्याप्रमाणात प्रयत्न करण्यात येत आहेत. कोरोना या विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात ज्या कुटुंबांमधील कर्त्या पुरुषांचा मृत्यु झाला आहे

आणि जी कुटुंबे जोखीमप्रवण झालेली आहेत, त्या कुटुंबांना सन्मानपुर्वक जीवन जगता यावे, यासाठी त्या कुटुंबांमधील एकल (विधवा) महिलांना उत्पन्नाची साधने निर्माण व्हावी व त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी निर्माण होऊन त्यामाध्यमातून त्यांची उपजीविका व्यवस्थित सुरु राहावी यासाठी “वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिध्दा\” ही योजना शासनाच्या माध्यमातून सुरू केली. \’Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana\’

 

योजनेचे फायदे

  • महिलांना वेगवेगळे प्रशिक्षण देणार उमेदमार्फत एकल/ विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
  • या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/ युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • आरसेटी योजनेअंतर्गत 18 ते 45 या वयोगटातील युवक-युवतींना 10 ते 45 दिवसांचे कृषि विषयक प्रशिक्षण, प्रक्रिया उद्योग विषयक प्रशिक्षण, उत्पादक विषयक प्रशिक्षण असे विविध व्यवसायांचे मोफत व निवासी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
  • केंद्र सरकारच्या उन्नती योजनामध्ये पात्र असलेल्या एकल (विधवा) महिलांना प्रशिक्षण देताना प्रथम प्राधान्य असणार आहे.
  • त्याचप्रमाणे केंद्रशासन सहाय्यीत योजनेतही अशा एकल/विधवा महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न प्रक्रिया उद्योगासाठी ऑनलाईन नोंदणीद्वारे बीज भांडवल देण्यात येणार आहे.
  • कोरोना महामारीत घरातील कर्त्या पुरूषांच्या अकाली निधनाने कुटुंबांवर जी आपत्ती ओढविली, ती या शासन निर्णयाद्वारे काही प्रमाणात तरी दूर होईल, असा विश्वास हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केला. Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana 2024

 

 

बिनव्याजी कर्ज

या एकल/ विधवा महिलांना पीएमजेजेबीवाय व पीएमएसबीवाय योजनेचे 342 रूपये निधी भरण्यास बिनव्याजी कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच या महिलांना आरोग्य विमा योजनेचाही लाभ देण्यासाठी पात्र महिलांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहे.

उमेदमार्फत एकल/विधवा महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधीही प्राधान्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या महिलांना तसेच त्यांच्या कुटुंबातील 18 ते 35 वयोगटातील युवक/युवतींना दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनेच्या माध्यमातून प्रशिक्षण देतानाही प्राधान्य देण्यात येणार आहे. Virbhadrakali Tararani Swayamsiddha Yojana Maharashtra

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

close button