विहिरीला 3 लाख रुपये तर सोलर पंप योजनेला 3 लाख 25 हजार रु. अनुदान | Vihir Solar Pump Anudan Yojana

Vihir Solar Pump Anudan Yojana

Vihir Solar Pump Anudan Yojana –  वनहक्क कायद्यातंर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्याकरीता विहीरींची निर्मिती करणे, वनपट्टे धारकांच्या शेतीत सोलारपंप बसवुन त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीकोनातुन

Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land 1 under FRA 2006 ही सन 2015-16 मध्ये विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत रु. 1800.00 लक्ष किंमतीची मंजुर योजना राबविण्यासाठी

दि. 26.08.2021 रोजीच्या शासन निर्णयासोबतचे परिशिष्ट 1 अन्वये देणेत आलेल्या मार्गदर्शक सुचना अधिक्रमित करुन सुधारित मार्गदर्शक सुचनांना सोबत जोडलेल्या परिशिष्ट क्रमांक 1 नुसार मंजूरी प्रदान करण्यात येत आहे.

Bore well /dug well with solar pump (5 hp) for irrigation of land | given under FRA 2006

Vihir Solar Pump Anudan Yojana

वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीच्या लाभार्थ्यांना शेतीच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने शेतीला पाणीपुरवठा करण्याकरीता विहीर करणे व सोलार पंप बसविणे.

विशेष केंद्रिय सहाय्य अंतर्गत सन 2015-१६16 करिता मंजुर रु. 1800.00 लक्ष 1 वर्ष संपुर्ण राज्य. आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचेकडुन प्रकल्प कार्यालयनिहाय (वनपट्टे वाटप झालेल्या प्रकल्पांतर्गत) लक्षांक निश्चित करणेत येतील. बाबनिहाय प्रति लाभार्थी अनुदानाची मर्यादा खालीलप्रमाणे असेल. Vihir Solar Pump Anudan Yojana

 1. विहीर – 3,00,000/-
 2. सोलार पंप, पॅनल (5HP) – 3,25,000/- 
 •  उपरोक्त नमुद बाबीकरीता ठरविण्यात आलेली अनुदानाची मर्यादा ही शासनाच्या धोरणाप्रमाणे ठरविण्यात आलेली महत्तम मर्यादा आहे. योजनेचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या अनुषंगाने प्रती लाभार्थी कमी खर्च येत असेल तर त्याप्रमाणे अनुदान अदा करणेत येईल व शिल्लक निधीच्या प्रमाणात लक्षांकात वाढ करण्याचे अधिकार मुल्यमापन व संनियंत्रण समितीस असतील.
 • योजनेचा लाभ देण्यासाठी इच्छुक वनपट्टेधारक शेतक-यांसाठी पात्रतेचे निकष सदर समितीकडुन ठरविण्यात येतील.
 • रहिवासी दाखला, जातीचा | दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, सोलार पंप देणे प्रस्तावित आहे त्या लाभार्थ्यांकडे जलस्त्रोत उपलब्ध असल्याचा दाखला

यापूर्वी सदर योजनेचा लाभ आदिवासी विकास अथवा अन्य विभागामार्फत घेतला नसल्याबाबत प्रमाणपत्र, विहीर प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्वेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, किमान जमीन क्षेत्र इ. बाबींचा त्यामध्ये समावेश करणेत येईल.

विहिरीला 3 लाख रुपये तर सोलर पंप योजनेला 3 लाख 25 हजार

 • आयुक्त आदिवासी विकास ह्यांच्याकडुन प्रकल्प कार्यालय निहाय लक्षांक | देण्यात येईल.
 • सदर लाभार्थ्यांच्या मध्ये विधवा महिला शेतकरी, अपंग शेतकरी यांना प्राधान्य देण्याबाबत समिती निर्णय घेईल.
 • प्रकल्प अधिकारी हे स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त करुन घेतील. प्रकल्प कार्यालयामार्फत प्राप्त अर्जाची छाननी करणेत येईल.
 • धोरणात्मक बाब उद्भवल्यास शासनाचे मार्गदर्शन घेण्यात यावे.योजनेच्या सनियंत्रण व मुल्यमापन करण्याची कार्यपद्धती समितीकडुननिश्चित करणेत येईल.
 • तथापि तीन महिन्यातुन एकदा योजनेचा आढावा घेण्यात यावा. लाभार्थ्याकडुन विहीरीची निर्मिती झाल्याचा, सोलर पंप बसविण्यात आल्याचे व ते कार्यरत असल्याचा अहवाल प्रकल्प कार्यालये, आयुक्त आदिवासी विकास नाशिक यांच्यामार्फत शासनाकडे सादर करतील.
 • वनहक्क कायदा अंतर्गत वनपट्टे मिळालेल्या अनुसूचीत जमातीचे लाभार्थी शेतामध्ये विहीरीच्या माध्यमातुन जलसंचनाची सुविधा निर्माण होणे व सोलार पंपच्या माध्यमातुन शेतीला पाणी पुरवठा करु शकतील व त्याआधारे उत्पन्नाच्या शाश्वत मार्गाद्वारे जीवनमानाचा दर्जा उंचावतील. Vihir Solar Pump Anudan Yojana

विहिरीला किती अनुदान आहे?

विहिरीला 3 लाख रुपये अनुदान आहे.

सोलर पंप योजनेला किती रुपये अनुदान आहे?

सोलर पंप योजनेला 3 लाख 25 हजार रुपये येवढे अनुदान आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top