Forest Guard Recruitment 2022: – नमस्कार मित्रांनो वनरक्षक भरती 2022 पुढील दोन महिन्यांमध्ये सुरू होत आहे त्यासाठी काय पात्रता लागते? वेळापत्रक नक्की काय आहे? अभ्यासक्रम कसा असेल? आणि रिक्त जागांचा तपशील कसा राहील सर्व माहिती आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
वनरक्षक भरती 2022 वेळापत्रक | Forest Guard Recruitment
- जाहिरात प्रसिद्ध करणे – 20/12/2022 पर्यंत
- अर्ज स्वीकारणे – 31/12/2022
- ऑनलाइन परीक्षा घेणे – 10/1/2023 ते 20/1/2023
- ऑनलाइन परीक्षेचा निकाल जाहीर करणे – 30/1/2023 पर्यंत
- शारीरिक चाचणी – 10/2/2023 ते 20/2/2023
- अंतिम निवड सूची जाहीर करणे – 28/2/2023 पर्यंत
- नियुक्ती आदेश निर्गमित करणे – 5/3/2023

वन विभाग भरती GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वनरक्षक भरती संभाव्य जागांचा तपशील
- चंद्रपूर – 88
- गडचिरोली- 222
- नागपूर – 207
- अमरावती – 260
- यवतमाळ – 86
- पुणे – 81
- धुळे – 243
- नाशिक – 76
- औरंगाबाद – 122
- ठाणे – 363
- कोल्हापूर – 200
वन विभाग भरती GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
वनरक्षक भरती 2022 परीक्षा पात्रता
- वेतनश्रेणी : 20,000 ते 25,000/- पर्यंत
शैक्षणिक पात्रता :- प्रमाणपत्रासहित पूर्ण धारण करणे आवश्यक आहे. उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने – माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी ) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनख़बरे व वन कर्मचा-याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (१० वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
टिप:- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचा-याचे संबंधात वरील प्रयोजनाकरिता शासकीय वैद्यकीय अधिकारी आणि पोलिस खात्यातील घटनेच्या कार्यक्षेत्रातील सक्षम पोलिस अधिकारी यांचे कडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र विचारार्थ घेण्यात येईल.
वयोमर्यादा :- उमेदवार हा ऑनलाइन अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेस 18 वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व 25-28 वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा. (या मध्ये बदल होऊ शकतो )
- उच्च वयोमर्यादा खालील बाबतीत शिथिलक्षम – महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत ५ वर्षापर्यंत.
- माजी सैनिकांसाठी विहित वयोमर्यादेतील सुट ही सदर उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवे इतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील
- प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता तसेच मागासवर्गीय उमेदवाराकरिता सरसकट कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष राहील.
वन विभाग भरती GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
Forest Guard Recruitment परीक्षेचा अभ्यासक्रम
निवडीची पध्दत :- ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या अर्जातील माहितीनुसार पात्र ठरणा-या उमेदवारांची महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग, शासन निर्णय क्रमांक एफएसटी-०७/१८/प्र.क्र.३२३/फ-४, दिनांक २८/८/२०१८ नुसार खालीलप्रमाणे उल्लेखित केलेल्या कार्यपध्दतीनुसार निवड करण्यात येईल.
लेखी परीक्षा:- पात्र असलेल्या उमेदवारांची १२० गुणांची स्पर्धात्मक लेखी परिक्षा घेण्यात येईल. लेखी परीक्षेमध्ये खालीलप्रमाणे ४ विषयांना गुण देण्यात येईल. लेखी परीक्षा ही माध्यमिक शालांत (१० वी) पातळीची राहील.
लेखी परीक्षा – 120 गुण
शारीरिक परीक्षा – 80 गुण
सामान्य ज्ञान (पर्यावरण विशेष) – 30 गुण
बौद्धिक चाचणी – 30 गुण
मराठी – 30 गुण
इंग्लिश – 30 गुण
- लेखी परीक्षा ही नियोजित स्थळी ऑनलाईन पध्दतीने संगणकावर घेण्यात येईल.
- लेखी परीक्षा ही ९० मिनिटाची राहील.
- उमेदवारांना परीक्षा दालनात मोबाईल फोन अथवा इतर कोणत्याही प्रकारची
- इलेक्ट्रॉनिक साधने आणण्यास / वापरण्यास सक्त मनाई आहे.
- परीक्षा दालनात परीक्षेच्या वेळेपूर्वी ९० मिनिट अगोदर हजर राहणे बंधनकारक राहील.
- परीक्षेवेळी इकडे-तिकडे बघणे, डोकावणे, तोतयागिरी करतांना
- आढळल्यास उमेदवारास परीक्षा केंद्राबाहेर पाठविण्यात येईल.
परीक्षा पद्धती – आयबीपीएस किंवा टीसीएस द्वारे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
नकारात्मक गुणपद्धती – या परीक्षेसाठी 0.25 ही नकारात्मक गुणपद्धती राहणार आहे.
वन विभाग भरती GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
परीक्षा पद्धत कशी असेल?
आयबीपीएस किंवा टीसीएस द्वारे परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येईल.
लेखी परीक्षा किती मिनिटाची राहील?
लेखी परीक्षा ही ९० मिनिटाची राहील.