तुकडेबंदी बद्दल चा निकाल, 1 ते 2 गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार का? जाणून घ्या सत्त्य | Tukde Bandi Kayda Latest News

Tukde Bandi Kayda

Tukde Bandi Kayda Latest News :- मा. औरंगाबाद हाय कोर्टाने 12 जुलै 2021 चे परिपत्रक रद्द केले आहे. ते करताना आयुक्तांना हाऊसचे म्हणजेच विधानसभेचे अधिकार नसतात असे म्हटले आहे.

हे परिपत्रक रद्द झाले तरी तुकडेबंदी कायदा मात्र रद्द झालेला नाही. कायदा तसाच आहे आयुक्तांचं परिपत्रक रद्द होणे व कायदा रद्द होणे यात खूप फरक असतो. तुकडेबंदी कायद्यातील एकही कलम रद्द झालेले नाही.

Tukde Bandi Kayda Latest News | tukde bandi paripatrak 2022

औरंगाबाद खंडपीठाचे न्या. आर. डी. धानुका आणि न्या. एस. जी. मेहरे यांनी शासनाचे 12 जुलैचे तुकडाबंदीचे परिपत्रक व महाराष्ट्र नोंदणी नियम 1961 चे नियम क्रमांक 44 (1) (ई) गुरुवारी रद्द केले. परिणामी. राज्यातील अकरा महिन्यांपासून ठप्प पडलेले खरेदीखत नोंदणीचे व्यवहार आता सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य मुद्रांक विभागाने 12 जुलै 2021 पासून तुकडाबंदीचे परिपत्रक व नियम जारी केल्यामुळे एनए-44 (अकृषी जमिनी / नॉन-अॅग्रिकल्चर) वगळता इतर सर्व घरे, जागा, प्लॉटची रजिस्ट्री बंदच आहे.परिणामी,’हवाला’ पद्धतीसारख्या मुद्रांकावर (बॉण्ड) मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांचा सपाटा सुरू असतानाच खंडपीठाने हा आदेश दिला आहे. “Tukde Bandi Kayda”

प्लॉटिंग व्यावसायिक याचिकाकर्ते गोविंद सोलापुरे, प्रकाश गडगूळ व कृष्णा पवार (रा. करोडी, औरंगाबाद) यांनी त्यांच्या ग्राहकांना विकलेले भूखंड, रो हाऊसेस, इ.बाबत दुय्यम निबंधक कार्यालयात वेगवेगळे खरेदीखत नोंदणी करण्यासाठी गेले असता त्यांचे खरेदीखत न नोंदविता याचिकाकर्त्यांना परत दिले.

वरील परिपत्रक आणि नियमानुसार जिल्हाधिकाऱ्यांचे ‘ना होती. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड.रामेश्वर हरकत प्रमाणपत्र’ आणल्याशिवाय तोतला यांनी काम पाहिले, त्यांना अँड. खरेदीखत नोंदवण्यात येणार नाही, राहुल तोतला, अँड. रिया जरीवाला, असे सांगण्यात आले. म्हणून त्यांनी अॅड.स्वप्निल लोहिया, अँड.रजत मालू खंडपीठात याचिका दाखल केली आदींनी सहकार्य केले. Tukde Bandi Kayda

तुकडाबंदी नियमांच्या तरतुदी अशा होत्या | tukade bandi kayda in marathi

  • एखाद्या सर्व्हे नंबरचे क्षेत्र 2 एकर असेल, तर त्यातील एक, दोन किंवा तीन गुंठे जागा विकत घेता येत नाही. त्याची रजिस्ट्री होत नाही.
  • जमिनीचे अधिकृत ले आऊट करून घेतले तरच रजिस्ट्री होईल.
  • प्रमाणापेक्षा कमी क्षेत्र असेल तर त्याच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीची आवश्यकता असेल.
  • एखाधा जागेच्या तुकड्याचा भूमी अभिलेख विभागाकडून स्वतंत्र मोजणीचा नकाशा असेल, त्याचे विभाजन करण्यासाठी तुकडाबंदीचे नियम लागू असतील, अशी तरतूद आहे.

तुकडा बंदी रद्द झाल्यानंतर काय होणार ? | tukde bandi act

  • राज्य मुद्रांक विभागाने १२ जूनपासून तुकडा बंदी नियमाचे परिपत्रक काढल्यामुळे एनए-४४ (अकृषी जमिनी/ नॉन अॅग्रिकल्चरा वगळता इतर सर्व घरे,जागा, प्लॉटची रजिस्ट्री सुरु होणे शक्य आहे.
  • मुद्रांकावर (बॉण्ड) मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांना ब्रेक लागेल.
  • तुकडा बंदीमुळे गुंठेवारी वसाहतीसह शहरालगतच्या एनए नसलेल्या सर्व वसाहतींमधील प्लॉट व जुन्या बांधकामांचे व्यवहार ठप्प आहेत.
  • सोसायटीमध्ये घर व प्लॉटचे व्यवहार करायचे आहेत, ते देखील थांबले आहेत. ते व्यवहार होण्याची शक्यता आहे.
  • निर्देश महानिरीक्षक कार्यालयाकडून येतील जिल्हा मुद्रांक विभागाने सांगितले. ‘Tukde Bandi Kayda’

खंडपीठाने दिलेला निकाल हा एका प्रकरणाबाबत आहे की, कलम व परिपत्रकाबाबत आहे. याची माहिती अद्याप घेतलेली नाही. यावर जास्त बोलता येणार नाही, त्यामुळे महानिरीक्षक कार्यालयाकडूनच कायदेशीर स्पष्टीकरण देण्यात येईल.

तुकडेबंदी कायदा रद्द झाला आहे का?

तुकडेबंदी कायदा मात्र रद्द झालेला नाही. कायदा तसाच आहे आयुक्तांचं परिपत्रक रद्द होणे व कायदा रद्द होणे यात खूप फरक असतो. तुकडेबंदी कायद्यातील एकही कलम रद्द झालेले नाही.

तुकडेबंदी बद्दल कोणते परिपत्रक रद्द झाले आहे?

मा. औरंगाबाद हाय कोर्टाने 12 जुलै 2021 चे परिपत्रक रद्द केले आहे. ते करताना आयुक्तांना हाऊसचे म्हणजेच विधानसभेचे अधिकार नसतात असे म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top