मुलींसाठी असे जमवा लाखो रुपये, सुकन्या समृध्दी योजना मध्ये बदल | Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

Sukanya Samriddhi Yojana Maharashtra – मुलींसाठी असे जमवा 64 लाख रुपये. तुम्ही मुलीचे शिक्षण अथवा विवाह यांसाठी मोठी रक्कम उभी करू इच्छित असाल, तर तुमच्यासाठी सुकन्या समृद्धी योजना हा एक चांगला पर्याय आहे.

Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

यात बँक एफडी आणि पीपीएफ यांसारख्या छोट्या बचत योजनांच्या तुलनेत खूप अधिक व्याज मिळते. सध्या या योजनेत वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज मिळते. आता केंद्र सरकारने या योजनेत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.

नियमांत काय बदल

आतापर्यंत मुलीचा मृत्यू झाला अथवा लग्न झाले तरच सुकन्या समृद्धी योजनेचे खाते बंद केले जाऊ शकत होते. आता त्यात बदल करण्यात आला आहे. आता खातेधारकास प्राणघातक आजार असेल अथवा पालकाचा मृत्यू झाला असल्यासही मुदतीपूर्वी खाते बंद करता येऊ शकते. “Sukanya Samriddhi Yojana Maharashtra”

तिसऱ्या मुलीसाठीही कर सवलत

सुकन्या समृद्धी योजनेत आतापर्यंत 80 सी अंतर्गत 2 मुलींसाठी वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळत होती.

आता तिसऱ्या मुलीसाठीही ही सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतविता येतात. Sukanya Samriddhi Yojana Maharashtra

असे मिळतात 63 लाख रुपये

मुलगी 1 वर्षाची असताना 15 वर्षांसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते काढून वर्षाला 1.50 लाख रुपये गुंतविल्यास मुलगी 21 वर्षांची झाल्यानंतर 63.65 लाख रुपये मिळतील.

त्यात मुद्दल रक्कम २२.५ लाख रुपये असून ७.६ टक्के दराने २१ वर्षांचे व्याज ४१.१५ लाख रुपये आहे. आगामी काळात व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यामुळे या योजनेत मिळणारा लाभ आणखी वाढू शकतो.

खाते थकीत ठरले; तरी मिळत राहणार व्याज

या योजनेत वार्षिक किमान रक्कम न भरल्यास खाते थकीत (डिफॉल्ट) होते. पूर्वी खाते थकीत झाल्यास, जोपर्यंत ते पुन्हा सुरु होत नाही, तोपर्यंत व्याज दिले जात नव्हते. “Sukanya Samriddhi Yojana Maharashtra”

आता या नियमात बदल करण्यात आला आहे. खाते पुन्हा सक्रिय केले नाही, तरी भरलेल्या रकमेवर व्याज मिळत राहील. परिपक्यतेच्या वेळेस ही रक्कम व्याजासह परत मिळेल.

सुकन्या समृध्दी या योजनेत वार्षिक किती टक्के दराने व्याज मिळते?

सुकन्या समृध्दी या योजनेत वार्षिक 7.6 टक्के दराने व्याज मिळते.

सुकन्या समृद्धी योजनेत तिसऱ्या मुलीसाठी कर सवलत किती आहे?

सुकन्या समृद्धी योजनेत आतापर्यंत 80 सी अंतर्गत 2 मुलींसाठी वार्षिक 1.50 लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळत होती. आता तिसऱ्या मुलीसाठीही ही सवलत लागू करण्यात आली आहे. या योजनेत वर्षाला कमीत कमी 250 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतविता येतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top