आता ST कर्मचाऱ्यांना ३४% महागाई भत्ता मिळणार : ST Bus Employees Allowance Update

ST Bus Employees Allowance Update

ST Bus Employees Allowance Update – एसटी कर्मचाऱ्यांना 34% महागाई भत्ता, महामंडळावर महिन्याला 18 कोटींचा भार.

ST Bus Employees Allowance Update

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांनाही 34 टक्के महागाई भत्ता देण्याच्या प्रस्तावास अखेर बुधवारी सरकारने मंजुरी दिली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्के वाढ होईल.

या महागाई भत्ता वाढीमुळे महामंडळावर महिन्याला 18 कोटींचा अतिरिक्त भार पडेल. याचा लाभ महामंडळातील 89 हजार कर्मचाऱ्यांना मिळेल. सध्या एसटी कर्मचाऱ्यांना 28 टक्के महागाई भत्ता मिळतो. गेल्या वर्षी दिवाळीदरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळाला होता.

नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली. तो 34 टक्के झाला. याच धर्तीवर एसटी कर्मचाऱ्यांनाही 34 टक्के महागाई भत्ता द्यावा, यासाठी सरकारकडे महामंडळाने तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला होता. त्यावर सरकारने बुधवारी याबाबत निर्णय घेतला. “ST Bus Employees Allowance Update”

दहावी बारावी परीक्षा जुन्याच पद्धतीने होणार, काही सवलती बंद

आजवर काय घडले?

  • एसटी महामंडळाच्या कर्मचायांना राज्य सरकारी कर्मचायांप्रमाणे महागाई भत्ता दिला जातो.
  • प्रलंबित महागाई भत्ता मिळावा, म्हणून कामगार संघटना मुख्यमंत्र्यांच्या भेटी घेत होत्या.
  • सलग तीन वेळा कामगार संघटनांनी भेटी घेतल्या होत्या.

याबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. प्रलंबित महागाई भत्ता मिळावा, असा आमचा आग्रह होता. मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य करत, तथा सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या, शिवाय अतिरिक्त मुख्य सचिवांनी अंतिम मंजुरीसाठी फाइल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली, होती. त्याला बुधवारी मंजुरी मिळाली.

दहावी बारावी परीक्षा जुन्याच पद्धतीने होणार, काही सवलती बंद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना किती टक्के महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे?

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता देण्याचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे?

कोणत्या महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली?

नोव्हेंबर महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सहा टक्क्यांनी वाढ झाली?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top