सोलर रुफटॉप योजना 2023 ऑनलाईन अर्ज | How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra

solar rooftop scheme in maharashtra

Solar Rooftop Yojana 2023 in Maharashtra: महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील ग्राहकांसाठी (घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना) छतावरील (रूफटॉप) सौरऊर्जा र्निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून 40 टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. सौरऊर्जा निर्मिती यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात बचत होणार आहे. तर नेटमीटरिंग द्वारे महावितरण कडून वर्ष अखेर शिल्लक वीज देखील विकत घेतली जाणार आहे.

या योजना संदर्भात महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नुकताच आढावा घेतला आणि घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना या योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांनी तत्पर कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या योजना टप्पा दोन अंतर्गत महावितरणसाठी 25 मेगा वॉटचे उद्दिष्ट मंजूर झाले आहे. या योजनेमधून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलो वॉट क्षमतेची छतावरील (रूफटॉप) सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा बसविण्यासाठी केंद्र शासनाकडून वित्त साह्य देण्यात येणार आहे.

सोलर रुफटॉप योजना अटी

 1. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निवड करण्यात येणारे गाव /पाडा / वस्ती
 2. ज्या प्रकल्प कार्यालयातून एक पेक्षा अधिक गावांची निवड केली गेली असल्यास त्यांना प्राधान्य क्रम देण्यात यावा.
 3. गावांची निवड करते वेळीस त्या गावाची प्राथमिक माहिती जसे की गावाचे नाव, तालुका जिल्हा, एकूण लोकसंख्या, आदिम जमात लोकसंख्या,एकूण घरे इ. माहिती सोबत जोडावी.
 4. ज्या गावांला विद्युतीकरणा संबंधी कोणतीही सुविधा अद्याप पर्यंत प्राप्त नाही अशा गावांना प्राधान्य देण्यात यावे. Solar Rooftop Subsidy Yojana Maharashtra

नोट:- सोलर रुफटॉप योजनेचे सर्वसाधारण पणे अशा अटी आहेत.

सोलर रुफटॉप योजना 2023 उद्देश

सोलर रुफटॉप योजना खालील प्रमाणे दर्शविलेले उद्देश:

 • गृहनिर्माण संस्था, निवासी संघटनांना 20 टक्के अनुदान.
 • साधारणतः 3 ते 5 वर्षांत परतफेड परतफेडीची संधी.
 • यंत्रणेमुळे मासिक घरगुती वीज बिलात मोठी बचत होणार.
 • घरगुती, गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनांना होणार लाभ.
 • सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिट पर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहकांकडील एक किलो वॉट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिल मध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल.
 • तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमीटरिंग द्वारे वर्ष अखेर शिल्लक वीज प्रति युनिट प्रमाणे महावितरण कडून विकत घेतली जाईल.

अशा प्रकारे सोलर रुफटॉप योजनेचे उद्देश दाखविलेले आहे. ‘Solar Rooftop Maharashtra’

योजनेचे नावसोलर रुफटॉप योजना 2023
लाभार्थीगाव /पाडा /वस्ती हे अति दुर्गम, आदिम जमाती
लाँच केलेलेमहाराष्ट्र शासन व केंद्र शासन
उद्देशवीज बिलात मोठी बचत
ऑफिशियल वेबसाइटhttps://solarrooftop.gov.in/

सौरऊर्जा र्निर्मिती यंत्रणा साठी वित्त साह्य

 • घरगुती ग्राहकांसाठी 1 ते 3 किलो वॉट पर्यंत 40 टक्के
 • 3 किलो वॉट पेक्षा अधिक ते 10 किलो वॉट पर्यंत 20 टक्के अनुदान देण्यात येणार आहे.
 • सामूहिक वापरासाठी 500 किलो वॉट पर्यंत
 • परंतु प्रत्येक घरासाठी 10 किलो वॉट मर्यादसह गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटना ग्राहकांना 20 टक्के अनुदान मिळणार आहे.

पाच वर्षांच्या देखभाल खर्चासह रूफटॉप सौरऊर्जानिर्मिती यंत्रणेसाठी 1 किलो वॉट- 46,820, 1 ते 2 किलो वॉट- 42,470, 2 ते 3 किलो वॉट- 41,380, 3 ते 10 किलो वॉट- 40,290, तसेच 10 ते 100 किलोवॉटसाठी 37,020 रुपये प्रति किलो वॉट किंमत जाहीर करण्यात आली आहे.

उदा. या दराप्रमाणे 3 किलोवॅट क्षमतेसाठी सौर ऊर्जा यंत्रणेची 1 लाख 24 हजार 140 रुपये किंमत राहील. त्यामध्ये 40 टक्के अनुदान प्रमाणे 49 हजार 656 रुपयांचे केंद्रीय वित्त सहाय्य मिळेल व संबंधीत ग्राहकास प्रत्यक्षात 74 हजार 484 रुपयांचा खर्च करावा लागेल. Solar Rooftop Subsidy in Maharashtra

Solar Rooftop Yojana in Maharashtra

रुफटॉप सौर ऊर्जा निर्मिती यंत्रणा कार्यान्वित केल्यानंतर दरमहा 100 युनिट पर्यंत वापर असलेल्या घरगुती ग्राहक कडील एक किलो वॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेमधून वीजबिल मध्ये सध्याच्या वीज दरानुसार दरमहा सुमारे 550 रुपयांची बचत होऊ शकेल.

तसेच या यंत्रणेला लावण्यात आलेल्या नेटमिटरिंग द्वारे वर्षा अखेर शिल्लक वीज प्रति युनिट प्रमाणे महावितरणकडून विकत घेतली जाईल. त्याचाही आर्थिक फायदासंबंधीत घरगुती ग्राहकांना होणार आहे. सोबतच सौर यंत्रणा उभारणीच्या खर्चाची साधारणतः 3 ते 5 वर्षात परतफेड होणार आहे.

दरमहा वीज बिलातील आर्थिक बचत तसेच पर्यावरणस्नेही ग्राहक म्हणून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महावितरणच्या घरगुती वर्गवारीतील वीजग्राहकांनी रुफटॉप सौर ऊर्जा योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. ‘Solar Rooftop Scheme in Maharashtra 2023’

सोलर रुफटॉप योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा विडियो नक्की बघा 👇👇 ‘How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra’

सोलर रूफटॉप योजनेला किती अनुदान दिले जाणार आहे?

रुफटॉप सोलर पॅनल योजनेला 40% अनुदान दिले जाणार आहे.

रुफटॉप सोलर योजनेला कोण ऑनलाईन अर्ज करू शकतो?

भारतातील कोणताही नागरिक या योजनेला अर्ज करू शकतो.

2 thoughts on “सोलर रुफटॉप योजना 2023 ऑनलाईन अर्ज | How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top