शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ही कर्ज खाती होणार नील | शेतकरी कर्जमाफी बाबत मोठी बातमी

karj mafi news maharashtra

मुंबई: सन 2015-16 ते 2018-19या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात 50 पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही. (The good news for farmers will be the loan accounts)

परिणामी शेतकरी थकबाकीदार झाल्यामुळे कर्जाच्या दृष्टचक्रात अडकलेला आहे आणि त्यांना शेती कामांकरीता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत. शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने मा. मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशन, 2019 मध्ये “महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019″ जाहीर केली आहे.

सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्यस्तर)(कार्यक्रम), 24350142 या लेखाशिर्षाअंतर्गत 33 अर्थसहाय्य या बाबी अंतर्गत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या मागणीनुसार निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. ‘mahatma jyotiba phule karj mafi yojana 2021′

शासनाचा निर्णय:

  • सन 2021-22 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मंजूर निधीपैकी रु. 162.75 कोटी (रु. एकशे बासष्ट कोटी पंचाहत्तर लाख फक्त) एवढा निधी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्यस्तर) (कार्यक्रम), (24315042) या लेखाशिर्षाअंतर्गत 33 अर्थसहाय्य या बाबी साठी वितरीत करण्यास या शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
  • सदर तरतूद खर्च करण्यासाठी (V004) सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे अधिनस्त सहाय्यक निबंधक (अंदाज व नियोजन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रण अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आले आहे.
  • तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषीत करण्यात आले आहे.
  • सदर निधी आहरण करुन हा खर्च वेळेत होईल हे सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच या बाबतचा अहवाल व खर्चाची माहिती वेळोवेळी शासनास पाठवावी.
  • ३. सदर ही रक्कम मागणी क्रमांक व्ही-02, 2435-इतर कृषीविषयक कार्यक्रम, 60-इतर, 101 – शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना, (00)(03) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 (राज्यस्तर) (कार्यक्रम), (24315042) अर्थसहाय्य या लेखाशिर्षाखालील सन 2021-22 या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून खर्च करण्यात यावा.
  • सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 202111091731174002 असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top