आता Mutual Fund च्या योजना स्वत:हून बंद करता येणार नाही | Share Market Update

Share Market Update

Share Market Update:-SEBI म्हणजेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने काल मंगळवारी झालेल्या सेबीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे

आता Mutual Fund च्या योजना विश्वस्तांना स्वत:हून बंद करता येणार नाही – यामुळे म्युच्युअल फंड्सना योजना बंद करण्यापूर्वी युनिटधारकांची संमती घेणे बंधनकारक करण्यात आले आहे

Share Market Update

आणखी काय सांगितले SEBI ने ?

SEBI ने म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा म्युच्युअल फंडचे विश्वस्त एखादी योजना स्वत:हून बंद करण्याचा निर्णय घेतात, किंवा क्लोज एंडेड स्कीम मुदतीपूर्वीच रोखतात तेव्हा त्यांनी युनिटधारकांची संमती घेणे आवश्यक आहे

संमती कशी घ्यावी लागेल ?

विश्वस्तांना साध्या बहुमताच्या आधारे विद्यमान युनिट धारकांची संमती घ्यावी लागेल – त्यासाठी प्रति युनिट एक मत या आधारे मतदान केले जाणार आहे

तसेच योजनेच्या समाप्तीची नोटीस जारी केल्यापासून 45 दिवसांच्या आत मतदानाचा निकाल प्रकाशित करणे आवश्यक आहे

मात्र विश्वस्तांना असे केले नाही तर, मतदानाचा निकाल जाहीर केल्यानंतर दुसऱ्या व्यावसायिक दिवसापासून ही योजना खुली असावी लागेल – असेही SEBI ने सांगितले

SEBI ने घेतलेला हा निर्णय Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी खूप महत्वाचा आहे – आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top