शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र 2024 | Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra

By Shubham Pawar

Updated on:

Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra – शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra 2024

सदर योजने अंतर्गत इ.1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 450 उष्मांक (कॅलरी) आणि 12 ग्रॅम (प्रोटीन) युक्त दुपारचे मध्यान्ह भोजन तसेच इ. 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांना 700 उष्मांक (कॅलरी) आणि 20 ग्रॅम (प्रोटीन) युक्त आहार देण्यात येतो.

कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजना म्हणून माहे मार्च 2020 पासून शाळा स्तरावर शिजविलेल्या आहाराचा पुरवठा करण्याऐवजी कोरडा शिधा दिला जात आहे. केंद्र शासनाने संदर्भ क्र.1 च्या पत्रान्वये पात्र विद्यार्थ्यांना कोविङ-19 चा प्रादुर्भाव रोखण्याकरीता करावयाच्या उपाययोजनांचे पालन करून शाळा स्तरावर तयार आहार देणेबाबत सूचना निर्गमित केलेल्या आहेत. \”Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra\”

शालेय पोषण आहार योजना महाराष्ट्र 

राज्यातील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या शाळा दि.01 फेब्रुवारी, 2022 पासून सुरु करण्यात आलेल्या आहेत. स्थानिक परिस्थिती विचारात घेवून विद्यार्थ्यांची उपस्थिती व शाळेचा कालावधी निश्चित करुन त्यानुसार अंमलबजावणी केली जात आहे.

सद्यस्थितीमध्ये राज्यातील कोविड-19 च्या प्रादुर्भावाची स्थिती नियंत्रणात आल्याने राज्यातील योजनेस पात्र शाळांमधील इयत्ता 1 ली ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना दि. 15 मार्च, 2022 पासून शाळा स्तरावर तयार आहार देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. \’Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra\’

शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना तयार आहाराचा (मध्यान्ह भोजन) लाभ देणेबाबत खालीलप्रमाणे निर्देश देण्यात येत आहेत.

 योजनेस सुरवात दिनांक 22 नोव्हेंबर, 1995

शालेय पोषण आहार ही केंद्र पुरस्कृत योजना असून राज्यात सदर योजना 22 नोव्हेंबर, 1995 पासून राबविण्यात येत आहे. सुरुवातीला या योजने अंतर्गत इयत्ता 1 ली ते 5 वी च्या विद्यार्थ्यांना प्रति महा 3 किलो प्रमाणे मोफत तांदूळ देण्यात येत होता.

(Take Home Supplement) सन 2001 मध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने शालेय पोषण आहार योजने अंतर्गत विद्यार्थ्यांना कोरडा तांदूळ न देता शाळेमध्ये अन्न  शिजवून द्यावे असे आदेश दिले व त्यानुसार सन 2002 पासून या योजनेचे स्वरूप बदलून घरी तांदूळ देण्याऐवजी विद्यार्थ्यांना शाळेतच शिजविलेला आहार देण्यात येतो.

सन 2008 मध्ये या योजनेचा विस्तार करण्यात आला असून इयत्ता 6 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना सुध्दा या योजनेचा लाभ देण्यात येतो. Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra

योजनेची ठळक वैशिष्टे

  • प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणे.
  • प्राथमिक शाळातील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविणे.
  • शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबविणे.
  • भेदभाव नष्ट करणे.
  • विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.

राज्य व केंद्र शासनाच्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा, मदरसा / मक्तबा, राष्ट्रीय बालकामगार शाळेतील विदयार्थी (NCLP शाळेतील विदयार्थ्यांना उच्च प्राथमिक नुसार लाभ) इ. ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. \”Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra\”

योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपध्दती

शालेय पोषण आहार योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपविण्यात आली असून, खाजगी शाळांबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनाकडून शालेय पोषण आहार योजनेची अंमलबजावणी केली जाते. शालेय पोषण आहार योजने अंतर्गत आहार शिजविण्याचे काम महिला बचत गट, गरजू महिला तसेच NGO यांचे कडून केले जाते.

या योजनेसाठी लागणारा तांदूळ केंद्र शासनाकडून मोफत प्राप्त होतो. या योजनाअंतर्गत भारतीय अन्न महामंडळाच्या गोडाऊनमधून प्राप्त होणाऱ्या तांदूळाची शाळेपर्यंत वाहतूक करण्यासाठी केंद्र शासनाकडून वाहतूक खर्च प्राप्त होतो. Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra

केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या मोफत तांदुळापासून आहार बनविण्याकरीता Cooking Cost या शिर्षाखाली शासनाकडून अनुदान प्राप्त होते. Cooking Cost यामध्ये इतर धान्यादी वस्तू, आहार तयार करण्याकरीता लागणारे इंधन तसेच पालेभाज्या इ. खर्चाचा समावेश असतो.

 स्वयंपाकी व मदतनीस

दिनांक 2 फेब्रुवारी 2011 च्या शासन निर्णयानुसार शालेय पोषण आहार योजनेमध्ये अन्न शिजवण्याचे काम करण्यासाठी स्वयंपाकी व मदतनीस या कामासाठी स्वतंत्रपणे मानधन अदा करण्यास मान्यता दिली आहे. Shaley Poshan Aahar Yojana Maharashtra

स्वयंपाकी मदतनीस यांनी खालील कामे करणे

  1.  अन्न शिजविण्याचे काम करणे.
  2. तांदूळ व धान्यादी मालाची साफसफाई करणे.
  3. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे वाटप जेवणाच्या जागेवर करणे तसेच पाणी पुरविणे.
  4. भोजनानंतर जागेची ताटांची साफसफाई करणे, शाळा व परिसर स्वच्छ ठेवणे.

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खालील बाबींसाठी जिल्हयांना तरतूद वितरीत करण्यात येते

  1. इंधन आणि भाजीपाला
  2. धान्यादी मालाची खरेदी
  3. स्वयंपाकी तथा मदतनीस मानधन 4. डाटा एन्ट्री ऑपरेटर मानधन

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment