शबरी घरकुल योजना अर्ज Form | Shabari Adivasi Gharkul Awas Yojana 2022

shabari adivasi gharkul yojana

Shabari Adivasi Gharkul Yojana Maharashtra: राज्यातील बेघर किंवा ज्यांची घरे कुडा- मातीची आहेत अशा आदिवासी‌ लाभार्थ्यांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी या विभागाच्या दिनांक 28.03.2013 च्या शासन निर्णयान्वये शबरी आदिवासी घरकुल योजना सुरु केली आहे.

या योजने अंतर्गत ग्रामीण भागासाठी 1 लाख रुपये, नगरपालिका क्षेत्रासाठी दीड लाख रुपये तसेच महानगरपालिका व मुंबई महानगर विकास प्राधिकरण भागासाठी 2 लाख एवढ्या रकमेच्या मर्यादेत अनुदान दिले जाते.

महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील आदिवासी समुदायासाठी राज्ये सरकारने शबरी आवास योजना सुरु केले आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देणे.

या लेखामध्ये शबरी आदिवासी घरकुल योजना ची प्रमुख अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे, पात्रता व कुठे संपर्क साधावा. अशी सर्व प्रकारची माहिती या लेखामध्ये सांगितलेली आहे.

Shabari Adivasi Gharkul Yojana अटी

 • लाभार्थी अनुसूचित जमातीचा असायला हवा.
 • स्वत:च्या मालकीची जागा असावी.
 • 40 टक्केपेक्षा जास्त दिव्यांगत्वअ सलेल्या अनुसूचित जमातीच्याला भार्थ्यांना देखील लाभ.
 • ग्रामीण भागात लाभार्थ्यांची निवडक रण्याचे अधिकार ग्रामसभेस.
 • संदर्भाधीन शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन घरकुलांचे बांधकाम दर्जेदार आणि चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल याची दक्षता घेण्यात येईल.  (Shabari Adivasi Gharkul Awas Yojana)

शबरी आदिवासी घरकुल योजना पात्रता

 1. लाभार्थी अनुसुचित जमाती संवर्गाचा असावा.
 2. लाभार्थ्याकडे अनुसुचित जमातीचा व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
 3. महाराष्ट्र राज्यात वास्तव्य किमान 15 वर्षे असावे.
 4. लाभार्थीकडे घरकुल बांधकामासाठी स्वत:ची अथवा शासनाची जमीन असणे आवश्यक आहे.
 5. लाभार्थीकडे स्वत:चे अथवा कुटुंबाचे पक्क्या स्वरुपाचे घर नसावे.
 6. विधवा, परितक्त्या, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थींना प्राधान्य.
 7. ग्रामीण क्षेत्रासाठी उत्पन्न मर्यादा रक्कम रु.1.20 लाख पर्यंत असावे.
 8. लाभार्थ्यांने इतर योजनांमधून घरकुलाचा लाभ घेतलेला नसावा. (Shabari Adivasi Gharkul Awas Yojana)

Shabari Adivasi Gharkul Awas Yojana Documents

 • मालमत्ता नोंदपत्र (प्रॉपर्टी कार्ड)
 • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला
 • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला
 • मालमत्ता कर भरल्याची पावती.
 • रेशनकार्ड
 • आधारकार्ड
 • अर्जदाराचे नजिकच्या काळातील दोन पासपोर्टसाईज फोटो
 • जातीचे प्रमाणपत्र
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • 7/12 उतारा व नमुना 8-अ
 • शाळा सोडल्याचा दाखला/वयाचा दाखला
 • जागा उपलब्धतेचे प्रमाणपत्र
 • शासन वेळोवेळी विहित करतील अशी कागदपत्रे
 • ग्रामसभेचा ठराव
 • उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार)

लाभाचे स्वरूप असे

 1. ग्रामीण भागासाठी 100 टक्के अनुदान
 2. नगरपरिषद भागासाठी 7.50 टक्के लाभार्थी हिस्सा
 3. महानगरपालिका क्षेत्र 10 टक्के लाभार्थी हिस्सा आवश्यक.

प्रत्यंक्ष कार्यपध्दती

 • लाभार्थीची निवड झाल्या नंतर लाभार्थीच्या राहत्या घराचा [कच्चे घर] Geo Tag, Job Card Mapping.
 • निधी वितरित करण्यासाठी लाभार्थीचे खाते PFMS प्रणालीकडे संलग्न करुन, पंचायत समिती लाभार्थीची नावे जिल्हा स्तरावर मान्यतेसाठी प्रस्तावित करते.
 • जिल्हा स्तरावरुन मान्यता प्राप्त लाभार्थी यांना तालुका स्तरावरुन थेट लाभ हस्तांतरण [DBT] नुसार लाभार्थीस 1 ला हप्ताह दिला जातो.
 • लाभार्थीने स्वत:च लक्ष देऊन बांधकाम करुन घेतले पाहिजे, जेणेकरुन त्याला स्वत:च्या अपेक्षेनुसार घर बांधता येईल.
 • यासाठी कुठल्याही कंत्राटदाराचा सहभाग या योजनेत नाही. यासाठी काटेकोर प्रयत्न केले गेले आहेत.

Shabari Adivasi Gharkul Awas Yojana Form 2022 PDF

घर बांधणीच्या प्रत्येक टप्या्वर Geo Tag व इतर तंत्रज्ञानाच्या माध्य”मातून प्रत्यक्ष बांधकामावर जिल्हा व तालुका स्तरावरून आर्थिक व भौतिक प्रगतीचा आढावा घेतला जातो व त्यानुसार त्याला 2रा, 3रा, व अंतिम हप्ता भौतिक प्रगतीशी संसंगत पध्दतीने अदा केला जातो.

लाभार्थीस मनरेगाच्यात माध्यीमातून 90 दिवसांचा रोजगार व त्या्ला 18,000/- रू इतकी रक्करम अदा केली जाते. स्वच्छ. भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधणीसाठी स्वचतंत्र्यपणे 12,000/- रू इतकी रक्कम उपलब्ल करुन दिली जाते. वरील रुपरेषेनुसार बेघरांचे “स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले जाते. (Shabari adivasi gharkul yojana 2022 pdf)

शबरी या योजनेबाबतीत योग्य‍ ते नियंत्रण राखण्यासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्रालयाने आवास सॉफट व आवास ॲप विकसित केले आहे.

ज्या‍मुळे योजनेचे काम अत्यंत पारदर्शकपणे पार पाडले जाते. योजनेचे सनियंत्रण जिल्हा स्ततरावर जि.ग्रा.वि.यं. येथून व तालुका स्तेरावर पंचायत समिती या यंत्रणाच्या माध्यमातून केले जाते.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणाकडे संपर्क साधावा:-ग्रामपंचायत, ग्रामसेवक पंचायत समिती, गट विकास अधिकारी. “Shabari Adivasi Gharkul Awas Yojana form pdf”

अर्ज फॉर्म डाउनलोड करा PDF - क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top