आरटीई 2024-25 प्रवेश कागदपत्रे, नियम, अटी, पात्रता व अर्ज | RTE Admission 2024-25 Maharashtra

By Shubham Pawar

Updated on:

RTE Admission 2023-24 Maharashtra

RTE Admission 2024-25 Maharashtra: मित्रांनो, शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया (RTE Admission 2024-25 Maharashtra) राबविण्यात येते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शैक्षणिक सत्र 2024-25 करिता राबविण्यात येणाऱ्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत (RTE Admission 2024-25 Maharashtra) शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत नोंदणी करावी लागणार आहे. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पालकांना अर्ज करता येणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत प्रवेशासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. तर याविषयी आजच्या ह्या लेखात आपण थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.

RTE Admission 2024-25 Maharashtra

आरटीई प्रवेश प्रक्रियेतून आर्थिक दुर्बल घटकांमधील मुलांना नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश घेण्याची संधी मिळते. यंदा शैक्षणिक सत्र 2024-25 करिता आरटीई प्रवेश प्रक्रियेत {RTE Admission 2024-25 Maharashtra} शाळांना 23 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील सर्व शाळांची नोंदणी पूर्ण करण्याची जबाबदारी प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांची आहे. ही नोंदणी पूर्ण झाल्यानंतरच पालकांना आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज दाखल करता येणार आहे. साधारणत: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पालकांना अर्ज करता येण्याची शक्यता आहे.

🧑‍🎓निकॉन स्कॉलरशिप 2024, 1 लाख रुपये शिष्यवृत्ती 👉येथे क्लिक करून पहा

शाळेतील पहिली ते आठवीच्या एकूण विद्यार्थ्यांच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश मिळालेले असल्यास, अशा शाळांची नोंदणी प्रवेश प्रक्रियेत करण्यात येणार नाही. त्याचप्रमाणे नव्या खासगी शाळांचा तीन वर्षांपर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत समावेश करू नये. या शाळांची शैक्षणिक तपासणी आणि पडताळणी पूर्ण केल्यानंतरच त्यांचा समावेश प्रक्रियेत करण्यात यावा, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.

RTE Admission 2024-25 Maharashtra Documents List

मित्रांनो, लवकरच शैक्षणिक सत्र 2024-25 करिता आरटीई प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे, त्यामुळे पालकांना कागदपत्रांची जुळवा-जुळव आतापासूनच करावी लागणार आहे.
तर प्रवेश प्रक्रियेसाठी कोणती महत्त्वाची कागदपत्रे लागतील, चला पाहुयात.

  1. रहिवासी / वास्तव्याचा पुरावा
  2. वंचित जात संवर्गातील असल्यास जातीचे प्रमाणपत्र
  3. दिव्यांग असल्यास आवश्यक कागदपत्रे
  4. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्यास उत्पन्नाचा दाखला (एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न)
  5. जन्माचा दाखला / जन्मप्रमाणपत्र

आरटीई 25% ऑनलाइन प्रवेशाकरिता लागणारी सर्व कागदपत्रे ही ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंतची असावीत, त्यानंतरची कागदपत्रे स्वीकारली जात नाही, याची काळजी घ्यावी.

📃 RTE Admission 2024-25 Maharashtra करिता लागणारी कागदपत्रे 👉 येथे क्लिक करून पहा

पालकांनी अर्ज भरल्यानंतर, त्यांच्या कागदपत्रांची तपासणी गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीद्वारे करण्यात येणार आहे. ही पडताळणी यशस्वी झाल्यानंतर, पालकांना थेट शाळेत प्रवेश घेण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शाळेत कोणत्याही प्रकारची कागदपत्रांची पडताळणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

RTE Admission 2024-25 Maharashtra Age Criteria

मित्रांनो, RTE Admission 2024-25 Maharashtra करिता वयोमर्यादा किती असते, ह्याची सुद्धा जाणीव ठेऊन पालकांना अर्ज करावा लागणार आहे. साधारणपणे पाल्याचे वय 4.5 वर्षे ते 7.5 वर्षे असावे. मागील वर्षीच्या पत्रकानुसार वयोमर्यादा किती आहे? हे आपण पाहुयात.

📃 मागील वर्षीच्या पत्रकानुसार वयोमर्यादा 👉 येथे क्लिक करून पहा

मित्रांनो, लवकरच शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव असणाऱ्या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबतचे वेळापत्रक, अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि आरटीई प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सर्व महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या वेबसाईट वर पाहायला मिळणार आहे. त्यासाठी आमच्या https://marathicorner.com/ वेबसाईटला नेहमी भेट देत रहा.

Shubham Pawar

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Related UPDATE

OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रु, करा अर्ज | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

mahacmletter.in : लिंक, घोषवाक्य, सेल्फी फोटो | maha cm letter in registration process

ITR फाईल नक्की दाखल करा हे आहेत फायदे जाणुन घ्या | ITR File Benefits in Marathi

टाडा ॲक्ट म्हणजे काय? | Tada Act in Marathi

Leave a comment