वीस वर्षे मोफत वीज मिळवण्याची संधी सोलर रूफटॉप सबसिडी योजना | Rooftop Solar Subsidy Yojana 2022

Rooftop Solar Subsidy Yojana 2021-22

Rooftop Solar Subsidy Yojana :- देशभरात वाढती महागाईही मोठी समस्या बनत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांना हैराण करत आहेत. सातत्याने वाढणाऱ्या विजेच्या दरामुळे ही नागरिक हैराण झाले आहेत.

विजेच्या वाढत्या दरावर उपाययोजना म्हणून भारत सरकारच्या अक्षय ऊर्जा मंत्रालयाने सोलर रूफटॉप सबसिडी योजना सुरू केली आहे. देशात कधीही न संपणारी सौर ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासन ग्राहकांना सोलर रूफटॉप बसविण्यासाठी अनुदान देणार आहे.

Rooftop Solar Subsidy Yojana 2022

३ किलोवॅटपर्यंत सौर रूफटॉप पॅनेल स्थापित करण्यासाठी ४० टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळणार आहे. ३ किलोवॅट ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के सबसिडी मिळणार आहे.

सोलर रूफटॉप सबसिडी योजनेंतर्गत घराच्या छतावर सोलर रूफटॉप बसवून विजेचा खर्च ३० ते ५० टक्क्यांनी कमी करणे शक्य होणार आहे.

सोलर रूफटॉप २५ वर्षांसाठी वीज पुरवेल आणि या योजनेतील खर्च ५-६ वर्षांत दिला जाईल.

यानंतर पुढील १९-२० वर्षे सौरऊर्जेवरील मोफत विजेचा लाभ मिळेल सौर ऊर्जेसाठी जागा आवश्यक सोलर पॅनल बसवण्यासाठी घराच्या किंवा फॅक्टरीच्या छतावर १ किलोवॅट सौरउर्जेसाठी १० चौरस मीटर जागा आवश्यक आहे.

सोलर रूफटॉप सबसिडी योजनेसाठी वीज वितरण कंपनीच्या जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधता येणार आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी solarrooftop.gov.in हे होम पेज आहे.

अर्ज करण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top