पीक विम्यात ‘रिलायन्स’ ला सापडली सोन्याची खाण, काय प्रकरण आहे बघा

reliance finds gold mine in crop insurance

पुणे: पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाटण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या नफेखोर रिलायन्स विमा कंपनीला पीक विमा योजनेच्या नावाखाली अक्षरशः सोन्याची खाण सापडली आहे. शेतकऱ्यांच्या नावाखाली कंपनीने 2016 पासून आतापर्यंत सव्वा दोन हजार कोटी रुपये कमावले आहेत, असा स्पष्ट उल्लेख राज्याने केंद्राला पाठविलेल्या एका स्वतंत्र अहवालात करण्यात आला आहे.

उच्चपदस्थ सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या (आरजीआयसीएल) व्यापारी वृत्तीचे वाभाडे काढणारा अहवाल केंद्रीय कृषी मंत्रालयाला पुराव्या सकट पाठविण्यात आलेला आहे. (Reliance finds gold mine in crop insurance)

त्यात कंपनीने गेल्या पाच वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून व सरकारी पातळीवर पीक विम्या पोटी गोळा केलेला पैसा, प्रत्यक्षात वाटलेली अल्प नुकसान भरपाई आणि मिळवलेल्या अफाट नफ्यासंबंधी उल्लेख करण्यात आलेला आहे.

रिल्यानसने असा मिळवला पैसा:

याप्रमाणे खालील माहिती दिलेली आहे.

हंगाम – गोळा केलेला पैसा – दिलेली भरपाई – मिळालेला नफा

  • खरीप 2016 – 794.20 कोटी – 119.83 कोटी – 614.37 कोटी
  • खरीप 2017 – 359.30 कोटी – 221.55 कोटी – 137.75 कोटी
  • रब्बी 2020 – 135.13 कोटी – 5.74 कोटी – 129.9 कोटी
  • खरीप 2020 – 964.10 कोटी – 243.01 कोटी – 721.09 कोटी
  • रब्बी 2021 – 76.45 कोटी – 8.37 कोटी – 67.48 कोटी
  • खरीप 2021 – 782.74 कोटी – 227.95 कोटी – 554.69 कोटी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top