Ration Card Update Maharashtra – अंत्योदय / प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना जाहीर अवाहन करण्यात येते की उच्च उत्पन्न असणाऱ्या नागरिकांनी स्वेच्छेने अन्नधान्याचा लाभ सोडवा (अन्नधान्य च्या अन्नदानातून बाहेर पडा)
Ration Card Update Maharashtra
दिनांक 31 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वेच्छेने “Give it up” (धान्य सोडणे) चे अर्ज संबंधित रास्तभाव दुकानदाराकडे किंवा परिमंडळ कार्यालयाकडे जमा करावे अन्यथा 01 सप्टेंबर 2022 पासून उच्च उत्पन्न असणारा (कुटुंबातील सदस्यच्या नावे चाक चाकी वाहन, एअर कंडिशनर (AC), सरकारी किंवा खाजगी नोकरी, सरकारी पेन्शन, कुटुंबातील सर्व सदस्यचे मिळून 59,000/ पेक्षा जास्त उत्पन्न असल्यास) व्यक्ती चे धान्य बंद करुन आजपर्यंत घेतलेले धान्याची वसुली बाजारभावाने करण्यात येईल व शासनाची फसवणुक केल्याबद्दल कार्यवाही करण्यात येईल. याची नोंद घ्यावीसर्व प्रकारच्या रेशन कार्डधारकांसाठी
फॉर्म येथे डाऊनलोड करा 👇 👇👇 Download Here
महत्वाची जरुरी सूचना
सर्व रेशन कार्ड धारकांना सुचित करण्यात येते की, शासनाचे सुधारीत सुचनेप्रमाणे आपणास सुचित करण्यात येते की,
- कार्ड धारकांच्या कुटूंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय, निमशासकीय सेवेत असल्यास.
- कुटुंबामध्ये 2 चाकी, 3 चाकी, 4 चाकी किंवा टॅक्टर असल्यास.
- सर्व मार्गांनी मिळूण कुटूंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 59,000/- असल्यास.
- 5 एकरापेक्षा जास्त जमीन धारक असल्यास (ओलीत, सिंचन, विहीरसह)
- RC मधील घराचे पक्के बांधकाम असल्यास. सवलतीच्या दरात रेशन कार्डावरील धान्य उचल करत असल्यास सदर कार्ड धारकांने स्वतःहून आपल्या कार्डाची वर्गवारी बदलुन घ्यावी.
अन्यथा सवलतीच्या दरामध्ये आजपर्यंत उचल केलेल्या अन्न धान्याची शासकीय दराप्रमाणे वसुली करण्यात येईल. या बाबतची सर्व जबाबदारी कार्ड धारकांची राहील. याची नोंद घ्यावी.
मा. तहसिलदार सोा यांचे आदेशानुसार
विषय :- अन्न धान्य योजनेतून बाहेर पडा (Give it up)
संदर्भ :- मा. उपायुक्तसो (पुरवठा विभाग) पुणे विभाग पुणे दि. 13/08/2022 यांचे सुचनेनुसार,
जे कार्डधारक अन्न सुरक्षा योजने नुसार धान्याचा लाभ घेतात तरी यातील कार्डधारक लाभार्थी पैकी शासकीय नोकर, निमशासकिय नोकर, व्यावसायीक, किराणादुकाणदार, पेन्शन धारक, ट्रॅक्टर असणारे बागायतदार शेतकरी, मोठ-मोठ्या कंपणीत काम करणारे, तसेच साखर कारखाण्यात परमनंट असणारे कामगार, आयकर भरणारे, पक्के घर (स्लॅप बिल्डींग) असणारे, चार चाकी वाहन (घरगुती व व्यावसायीक) धारक यांनी 31/08/2022 पर्यंत अन्न धान्य योजनेतून बाहेर पडा (Give it up) फॉर्म स्वइच्छेने भरुण देणेचे आहे.
फॉर्म येथे डाऊनलोड करा 👇 👇👇 Download Here
सदरचा फॉर्म दि. 31/08/2022 पर्यंत भरुण देणार नाहीत अशा लाभार्थी बाबत दि. 01/09/2022 पासून तलाठी व मंडल अधिकारी शाहनिशा करुन अपात्र लाभार्थीवर आजपर्यंत उचल केलेल्या धान्याची बाजारभावा प्रमाणे रक्कम वसूल करुन फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करणे बाबतची कारवाही करणेत येईल.
Sahayika