पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार 34 कोटीची भरपाई | Pik Vima Yojana Maharashtra

Pik Vima Yojana Maharashtra

Pik Vima Yojana Maharashtra – पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार 34 कोटींची भरपाई. राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीकविमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती जोखीमेबाबत खरीप हंगामातील पिकांच्या झालेल्या नुकसानीची राज्यांतून आत्तापर्यंत 24 लाख 2 हजार सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यापैकी 94 हजार 440 सूचनांसाठी 34 कोटी 46 लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.

Pik Vima Yojana Maharashtra

नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासंदर्भात राज्यात 33 लाख 34 हजार शेतकऱ्यांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. त्यातून 24 लाख 2 हजार शेतकऱ्यांच्या सूचनांवर सर्व्हेक्षण पूर्ण झालेले आहे. असे सांगून कृषी आयुक्तालयातील मुख्य सांख्यिक व कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे म्हणाले, शेतकऱ्यांकडून प्राप्त उर्वरित सूचनांचे सर्वेक्षण आणि नुकसानभरपाईची रक्कम निश्चित करण्याची कार्यवाही सुरू आहे. {Pik Vima Yojana Maharashtra}

सर्वेक्षणाअंती पीकविम्याची नुकसानभरपाईची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे. राज्यात ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसानीची माहिती ही घटनेच्या 72 तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे बंधन आहे.

पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना मिळणार 34 कोटीची भरपाई

नैसर्गिक आपत्ती या बाबी अंतर्गत विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग यामुळे वैयक्तिक स्तरावर पंचनामे केले जातात. तसेच, घोषित निकषांच्या अधीन राहून नुकसानभरपाई निश्चित केली जाते.

सद्यस्थितीत शेतकऱ्यांकडून पीक नुकसानीच्या आलेल्या सूचनांपैकी 9 लाख 32 हजार सूचनांवरील सर्वेक्षण व नुकसानभरपाई रक्कम निश्चित करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी 656 कोटी, राज्य सरकारने 1 हजार 880 कोटी रुपये आणि केंद्राने 1 हजार 877 कोटी रुपये मिळून एकूण विमा हप्ता ४ हजार 414 कोटी रुपये होतात. त्यापैकी शेतकरी, केंद्र आणि राज्य अनुदानाचा पहिला हिस्सा 2 हजार 111 कोटी रुपये हा संबंधित विमा कंपन्यांना दिला आहे. (Pik Vima Yojana Maharashtra)

पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना किती रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे?

पीकविमा योजनेतून शेतकऱ्यांना 34 कोटी 46 लाख रुपयांची नुकसानभरपाई निश्चित करण्यात आली आहे.

‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसानीची माहिती ही घटनेच्या किती तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे बंधन आहे.

‘प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती किंवा काढणीपश्चात नुकसानीची माहिती ही घटनेच्या 72 तासांच्या आत विमा कंपनीला देण्याचे बंधन आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top