पीक नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज | Pik Nuksan Bharpai Online Form 2022

pik nuksan bharpai maharashtra 2021

Pik Nuksan Bharpai Online Form 2022: जिल्ह्यात सोमवारी रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे अनेकठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच शेत जमीनच वाहून गेल्याचे प्रकार देखील घडले आहेत.पिकांच्या नुकसानीचे फोटो व माहिती ॲपच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या ॲपवर पाठवायची आहे.

तसेच ऑफलाईन तक्रार देखील करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया ७२ तासात करणे अपेक्षित असल्याने शेतकऱ्यांनी कार्यवाही करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे देखील नुकसान अनेक भागात झाले आहे. पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना या नुकसानीची भरपाई मिळणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन फोटो सह नुकसानीची तक्रार ॲपच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. तसेच ही तक्रार ऑफलाईन देखील करता येणार आहे. याचा कालावधी हा ७२ तास असणार आहे.

Pik Nuksan Bharpai Online Maharashtra

यासंदर्भातील पीक विमा कंपनीकडून ‘Crop Insurance’ ॲप ‘गूगल प्ले स्टोर’ वरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन केले आहे. मागीलवर्षी शेतकऱ्यांनी ॲपच्या माध्यमातून तक्रारी केल्या नसल्यामुळे नुकसान होऊन देखील विमा रक्कम मिळाली नव्हती.

ज्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने मध्ये पीक विमा भरला असेल आणि शेतकऱ्यांच्या शेतात नुकसान झाले असेल तर त्यांनी मोबाईल द्वारे कशी तक्रार करायची त्या संबंधित या लेखामध्ये माहिती दिलेली आहे.

Details of PIK Nuksan Bharpai

योजनेचे नावपिक विमा योजना
ने लाँच केलेकेंद्र सरकार व राज्य सरकार
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
उद्दिष्टपीक विमा भरपाई 2022
अधिकृत संकेतस्थळhttp://krishi.maharashtra.gov.in/

Pradhan Mantri Pik Vima Yojana उद्दिष्टे

केंद्र सरकारने पीक विमा योजना घेऊन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेतून भरपूर सारा दिलासा दिला आहे. जेणे करून पूर, दुष्काळ अतिवृष्टी इ. यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्यांना त्याची चिंता करण्याची गरज राहणार नाही.

पीक विमा नुकसान भरपाईच्या अंमलबजावणीमुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत आहे, जेणेकरून काही नैसर्गिक दुर्घटनामुळे त्यांची पिके नष्ट झाल्यास त्यांचे दैनंदिन जीवन जगण्यासाठी आणि पुन्हा नव्याने शेतीची मशागत करण्यासाठी पुरेसा पैसा मिळेल. ही योजना शेतकर्‍यांच्या आर्थिक क्षमतेच्या दृष्टीने सर्वात मोठी दिलासा देणारी सरकारची योजना आहे. (Pik Nuksan Bharpai Online Form Maharashtra)

Nuksan Bharpai Online Form 2022 Crop Insurance App द्वारे पीक नुकसानीचा दावा

 1. पहिले ‘Play Store’ वर
 2. त्यानंतर “Crop Insurance” शोधा.
 3. इन्स्टॉल करा.
 4. ॲप्लिकेशन चालू करा.
 5. ॲप्लिकेशन ओपन केल्यावर सुरुवातीला इंग्रजी भाषेत ॲप्लिकेशनचा इंटरफेस दिसेल Change Language या बटनावर टच करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता
 6. “नोंदणी खात्या शिवाय काम सुरु ठेवा” या बटनावर क्लिक करा
 7. ‘पिक नुकसान’ या बटनावर क्लिक करा
 8. “पीक नुकसानीची पूर्व सूचना” या बटनावर क्लिक करा
 9. “मोबाईल क्रमांकावर पाठविलेल्या ओटीपी द्वारेआपल्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करा.
 10. खरीप किंवा रब्बी हंगाम निवडा वर्ष, योजना, राज्य निवडून खालील हिरव्या रंगाच्या निवडा बटनावर क्लिक करा
 11. बँक, CSC Farmer Online जो हि नोंदणीचा स्त्रोत असेल तो निवडा अर्ज पॉलीसी टाकून निवडा या बटनावर क्लिक करा
 12. अर्ज/पॉलीसी क्रमांक टाकल्यावर पॉलीसी क्रमांकासह सर्व तपशील दिसून येईल, यादीतून अर्जाची/पॉलीसीची निवड करा.
 13. यादीत दिसणाऱ्या अर्जातून नुकसान झालेल्या पिकांची निवड करा
 14. पिकांच्या नुकसानीच्या घटना नोंदविण्यकरिता घटनेचा प्रकार, दिनांक, पिक वाढीचा टप्पा, नुकसान भरपाईची संभाव्य टक्केवारी फोटो आणि व्हिडीओ अपलोड करा निवड करा.
 15. यशस्वीरीत्या सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर पीक नुकसानीचे पूर्व सूचना नोंदणीची डॉकेट आयडी नोंदणीकृत मोबाईलवर sms द्वारे मिळेल
 16. त्यानंतर तुम्हाला ‘Docket ID’ भेटेल ज्या द्वारे पीक नुकसानीची स्थिती बघता येईल. Pik Nuksan Bharpai Online Form 2022

कॉल द्वारे पीक नुकसानीचा दावा

 • आपण कॉल लावून पण पिकांची तक्रार करू शकतो. आपल्या जिल्ह्यासाठी जो हेल्पलाईन नंबर त्याच नंबर वर कॉल करा.
 • अहमदनगर, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, सातारा – 18001037712 (भारती एक्सा जनरल इन्शुरन्स कं. लि.)
 • परभणी, वर्धा, नागपूर, जालना, गोंदिया, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार – 18001024088 (रिलायन्स जनरल इन्शुरन्स कं. लि.)
 • नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली – 18001035490 (इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कं. लि.)
 • औरंगाबाद, भंडारा, पालघर, रायगड, हिंगोली, अकोला, धुळे, पुणे – 18002660700 (एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कं. लि.)
 • उस्मानाबाद – 18002095959 (बजाज अलियांन्झ जनरल इन्शुरन्स कं. लि.)
 • लातूर – 18004195004 (भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड)

 

पीक नुकसानीचा दावा ऑनलाईन कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा विडियो नक्की बघा 👇👇 “Pik Nuksan Bharpai Online Form”

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top