नियमित कर्जमाफी अनुदान बँक खात्यात जमा, नवीन GR आला पहा | Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana

Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana

Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana – सन 2022 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात अल्पमुदतीच्या पीककर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु. 50 हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षात अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची घोषणा करण्यात आली होती.

Niyamit Karjmafi 50000 Anudan Yojana

त्यानुसार अल्पमुदत पीक कर्जाची पुर्णतः परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रक्कमेवर जास्तीत जास्त रु. 50 हजार पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देणेबाबत दिनांक 27.07.2022 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. त्याअनुसार सहकार विभागाच्या संदर्भ क्र. 1 दिनांक 20.07.2022 च्या शासन निर्णयान्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2010 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. तसेच, सदर योजनेसाठी सहकार विभागाच्या संदर्भाधीन क्र.2 दि.02.08.2022 च्या शासन निर्णयान्वये नवीन लेखाशिर्ष निर्माण करण्यात आले आहे.

शासन निर्णय

सन 2022 – 23 या आर्थिक वर्षात सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील कार्यक्रम खर्चाच्या योजनेअंतर्गत मजूर निधीपैकी रु. 2350.00 कोटी (रु. दोन हजार तिनशे पन्नास कोटी फक्त) इतकी रक्कम महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना (राज्यस्तर)(कार्यक्रम) (2435 0189), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत वितरीत करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

शासन निर्णय (GR) येथे पहा
👇👇👇👇
Download

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top