New Traffic Fines in Marathi 2022: वाहतूक नियमांचा भंग केल्यास वाहनधारकांना १ सप्टेंबरपासून अधिक दंड भरावा लागणार आहे. वाढतेरस्ते अपघात रोखण्याचा उपाय म्हणून दंडाच्या रकमेत ही वाढ झाली आहे.
नव्या मोटार वाहतूक कायद्यातील ६३ तरतुदी लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढली आहे. अर्थसंकल्पी अधिवेशनात संसदेच्या दोन्ही सदनात मोटार वाहतूक दुरुस्ती विधेयक संमत करण्यात आले होते.
वाहतूक नियमांचा भंग केल्यास आकारला जाणारा दंड आता कित्येक पटीने वाढवण्यात आला आहे. यात कमीत कमी म्हणजे ५०० रुपये दंड हा रस्ते नियम तोडण्यासाठी असून जास्तीत जास्त म्हणजे २५ हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास हा अल्पवयीन मुला-मुलीने वाहन चालवून गुन्हा केल्यास मालक व पालकाला भोगावा लागणार आहे.
गाडी चालवताना आता वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन करत असाल तर आता तुमच्या खिशाला फटका बसू शकतो. कारण राज्य परिवहन विभागाने आता वाहतूकीच्या नियमांचा भंग केल्यास भला मोठा दंड आकारण्याची तयारी सुरु केलीय.
New Traffic Fines Decision in marathi
राज्यात नागरिकांकडून परिवहन विभागाच्या वाहतूकीच्या नियमांचं पुर्णपणे उल्लंघन केलं जातं. त्यामुळे अपघाताच्या प्रमाणात बरीच वाढ झाल्याचं दिसून येतंय.
त्याला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने नवीन दंडाची नियमावली तयार केली असून ती राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे.
या लेखामध्ये आपण Traffic चे नियम व त्यांचे नवीन व जुने दर याची पूर्णपणे माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. (New Traffic Fines Rules in India 2022)
ट्राफिक फाईन रुल्स मराठी
परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड ५०० रुपयांवरून ५ हजार रुपये केला गेला आहे. मर्यादा पेक्षा वेगाने वाहन चालवल्यास आता ४०० रुपयाऐवजी २ हजार रुपये दंड आकारला जाईल,
कायमस्वरूपी चालक परवाना मिळवण्याची प्रक्रियाही अधिक कडक करण्यात आली आहे. रुग्णवाहिकेला वाट मोकळी करूनन दिल्यास दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. (New Traffic Fines in Marathi)
अपघातांची वाढती संख्या
रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागतात. अपघातांमध्ये दगावणाऱ्यांत तरुणांची संख्या सर्वाधिक असून हे प्रमाण एकूण अपघात मृत्यूंच्या ६५ टक्के आहे.
हे लक्षात घेत वाहनधारकांवर वचक बसवण्यासाठी नियम अधिक कडक करून वाहतुकीला शिस्त लावणे आणि अपघातांचे प्रमाण कमी करणे.
यासाठी नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक खात्याने जुन्या कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक गेल्या लोकसभेतच मांडले होते. त्याला १७ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात मंजुरी मिळाली. (New Traffic Fines in Marathi)
New Traffic Fines in Marathi (New & Old Traffic Fines)
खालील दिलेला Traffic Fine ची मांडणी खालील प्रमाणे दिलेली आहे 👇👇
नियमभंग – जुना दंड – नवा दंड (₹)
- रस्ते नियमांचा भंग – 100 – 500
- प्रशासनाचा आदेशभंग – 500 – 2000
- परवाना नसलेले वाहन चालवणे – 500 – 5000
- पात्र नसताना वाहन चालवणे – 500 – 10000
- वेगमर्यादा तोडणे – 400 – 2000
- धोकादायक वाहन चालवणे – 1000 – 5000
- दारू पिऊन वाहन चालवणे – 2000 – 10000
- वेगवान वाहन चालवणे – 500 – 5000
- विनापरवाना वाहन चालवणे – 5000 – 10000
- सीटबेल्ट नसणे – 100 – 1000
- दुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्ती – 100 – 2000
- ॲम्ब्युलन्ससारख्या महत्त्वाच्या वाहनांना रस्ता न देणे – …… – 10000
- विमा नसताना वाहन चालवणे – 1000 – 2000
- अल्पवयीन मुला-मुलीकडून गुन्हा मालक-पालक दोषी – …… – 25000 (3 वर्षे तुरंगावास) ‘New Traffic Fines in Marathi’