पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावं लागणार नवीन नियम लागू | New rules apply to helmets

New rules apply to helmets

New Rules Apply To Helmets – बृहन्मुंबई वाहतुक मुख्यालय, वरळी यांच्या तर्फे असे प्रसिध्दीपत्रक करण्यात येत आहे की, मुंबई शहरामध्ये अनेक मोटार सायकलस्वार हे विनाशिरस्त्राण (Helmet) मोटारसायकल चालवितात.

तसेच मो. सायकल चालविणान्याच्या मागे बसलेली व्यक्ती (pillion rider) हे सुध्दा हेल्मेटचा वापर करीत नाहीत.

New rules apply to helmets

वास्तविक पाहता मो. सायकलस्वार यांनी आणि त्यांच्या पाठीमागे बसलेल्या व्यक्ती (pillion rider ) यांनी मो. सायकल चालवित असताना शिरस्त्राण (Helmet) वापरणे हेमो, वाहन कायदा-1988 कलम 129 सह 194(ड) अन्वये बंधनकारक आहे.

शिरस्त्राण विना (Helmet) मो. सायकल चालविल्यास मो. वाहन कायद्यामध्ये रु. 500/- दंड तसेच 3 महिन्यांसाठी अनुज्ञाप्ती (License) निलंबीत करण्याची तरतूद आहे.

पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट घालावं लागणार नवीन नियम लागू

सदर प्रसिध्दीपत्रकान्वये सर्वनागरीकांना विनंती करण्यात येते. मो. सायकलस्वार आणि त्यांचे पाठीमागे बसलेली व्यक्ती (pillion rider) यांनी शिरस्त्राण वापरावे अन्यथा येत्या 15 दिवसानंतर अशा मो. सायकलस्वाराच्या पाठीमागे बसलेली व्यक्ती (pillion rider) यांचेवर सुध्दा कायदेशिर कारवाई करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top