NDA काय आहे? NDA Information In Marathi

nda information in marathi

NDA Information in Marathi: नमस्कार मित्रांनो,  आपण बऱ्याचदा NDA हा शब्द कधी ना कधी कुठे ना कुठे एकला असेलच. मग तुम्हाला NDA म्हणजे काय? हे माहित आहे का? तर आजच्या या लेखात आपण NDA Full Form In Marathi, NDA म्हणजे काय? NDA मध्ये प्रवेश कसा मिळतो? NDA साठी पात्रता काय लागते? अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखात आपण जाणून घेणार आहोत. 

NDA ची सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी हा लेख तुम्ही पूर्ण शेवटपर्यत वाचावा अशी माझी इच्छा आहे. जेणेकरून तुम्हाला कोणतीही शंका शिल्लक राहणार नाही.  चला तर मित्रांनो जाणून घेऊयात NDA Information In Marathi.

NDA Information In Marathi: NDA काय आहे?

बऱ्याच लोकांचे स्वप्न असते कि आपण सैन्य दलात भर्ती होऊन देशाची सेवा करावी. यासाठी बरेच लोक स्वतःवर खूप मेहनत घेतात. तसेच सैन्य दलाकडून सुद्धा वेळोवेळी भर्ती जाहीर केली जाते आणि पात्र लोकांना या भर्तीसाठी आवाहन केले जाते.

मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि मग NDA म्हणजे काय? 

तर मित्रांनो NDA सुद्धा यातलाच एक भाग आहे. म्हणजेच NDA हि एक अकादमी आहे जिथे सैन्यात जाण्यासाठी विशेष प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या अकादमीत विज्ञान, नवीन तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा याविषयांचे प्रशिक्षण दिले जाते.

या अकादमीमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सशस्त्र दल म्हणजेच थल सेना, वायु सेना आणि जल सेना यामध्ये निवड केली जाते. NDA हि अकादमी एक पूर्ण शासकीय अकादमी आहे आणि येथे एकदा प्रवेश घेतल्यानंतर जवळपास तुम्हाला सैन्यात सेवा देण्यावर शिक्का मोर्तब केला जातो. “NDA Information In Marathi”

NDA Full Form In Marathi: NDA फुल फॉर्म काय?

मित्रांनो वरील भागात आपण जाणून घेतले कि NDA हि एक सैनिक अकादमी आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना सैन्य प्रशिक्षण देऊन सैन्य दलात भर्ती होण्याजोगे सक्षम बनवले जाते. 

मग या NDA चा फुल फॉर्म काय होतो? हे आता आपण जाणून घेऊयात.

मराठीमध्ये NDA चा फुल फॉर्म हा “राष्ट्रीय संरक्षण अकादमी” असा होतो. 

तर इंग्लिशमध्ये NDA चा फुल फॉर्म “National Defence Academy” असा होतो.

हि अकादमी एक शासकीय अकादमी आहे आणि यामधून उत्तीर्ण झाल्यास विद्यर्थ्यांना अति सोप्या आणि साध्या रीतीने सैन्यामध्ये जाता येते. 

NDA मध्ये प्रवेश कसा घ्यावा?

NDA मध्ये प्रवेश मिळवणे हे एक कठीण कार्य असते तसेच एकदा NDA मध्ये प्रवेश मिळाला कि तुम्हाला सैन्यात सेवा देण्यासाठी १०० टक्के निवड होते. 

NDA मध्ये प्रवेश घेण्याकरिता विशेष परीक्षा द्यावी लागते. हि परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. तसेच हि परीक्षा राष्ट्रीय स्तरावर UPSC – Union Public Service Commission द्वारा आयोजित केली जाते.

ह्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येते हि मुलाखत SSB-Service Selection Board कडून घेतली जाते. मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तीन वर्ष पुणे येथील NDA मध्ये प्रशिक्षण घ्यावे लागते. 

प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यर्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार अथवा त्यांच्या प्रशिक्षणादरम्यान केलेल्या प्रदर्शनानुसार त्यांना थल सेना, जल सेना किंवा वायु सेना मध्ये जाण्याची संधी मिळते.  NDA Information In Marathi

ज्या विद्यार्थ्यांनी थल सेना निवडली असेल त्यांना डेहरादून येथे इंडियन मिलिट्री अकादमी (IMA) येथे, ज्यांनी जल सेना निवडली त्यांना केरळ येथे इंडियन नवल अकादमी येथे आणि वायु सेना निवडलेल्या व्यक्तींना हैद्राबाद येथे एअर फोर्स अकादमी येथे आणखी एक वर्ष त्यांच्या निवडलेल्या सेनेनुसार प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण होताच त्यांना सैन्यात भर्ती केल्या जाते. 

NDA साठी लागणारी पात्रता

NDA मध्ये जाण्याकरिता काही पात्रता लागते ती कोणती ते आपण जाणून घेऊया. 

NDA मध्ये लागणारी पात्रता खालीलप्रमाणे आहे:

 • NDA साठी पात्र होण्याकरिता विद्यार्थी हा १२वी उत्तीर्ण असल्याला हवा. 
 • तसेच १२वी मध्ये विद्यार्थ्याने भौतिकशास्त्र आणि गणित हे विषय मुख्य विषय म्हणून घेतलेले असावे.
 • परीक्षा देण्याकरिता विद्यार्थी हा भारताचा नागरिक असावा. 
 • परीक्षार्थी हा भारताचा नागरिक असावा. 
 • परीक्षार्थ्यांचे वय हे १६.५ ते १९ वर्ष यामध्ये असावे आणि तो अविवाहित असावा. 
 • NDA मध्ये फ़क्त पुरुषांनाच अनुमती आहे त्यामुळे परीक्षार्थी हा पुरुष असला पाहिजे. 
 • परीक्षार्थी हा शारीरिकद्रुष्ट्या सक्षम असायला हवा. 
 • विद्यार्थ्यांची कमीत कमी उंची हि १५७ से.मी. असायला हवी. 
 • विद्यार्थ्यांच्या शरीरावर टॅटू नसायला हवा. 
 • परीक्षार्थ्यांची छाती हि ८१ से.मी. असायला हवी. 
 • परीक्षार्थ्यांची दृष्टी हि चांगली असायला हवी किंवा त्याला चष्मा नसायला हवा. 

या सांगितलेल्या सर्व गोष्टी जर बरोबर असतील तर तुम्ही NDA ची परीक्षा देऊ शकता.  “NDA Information In Marathi”

NDA मध्ये येणारी पदे 

NDA मध्ये उत्तीर्ण झाल्यावर खालील पदांवर नियुक्ती करण्यात येते:

 • मेजर
 • कॅप्टन
 • लेफ्टनंट
 • लेफ्टनंट कर्नल
 • कर्नल
 • मेजर जनरल
 • एचएजी
 • लेफ्टनंट जनरल HAG
 • एच ए जी (HG)
 • ब्रिगेडिअर
 • लेफ्टिनेंट जनरल NFSG
 • सीओएएस (COAS)

 

NDA परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

NDA परीक्षेचा अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे: ‘NDA Information In Marathi’

 • NDA ची परीक्षा हि संघ लोकसेवा आयोगाकडून (UPSC) घेतली जाते. यामध्ये दोन पेपर घेतले जातात. पहिला पेपर हा गणिताचा असतो आणि दुसरा पेपर हा सामान्य बुद्धिमत्ता क्षमतेवर आधारित असतो. 
 • गणितामध्ये १२ वी ला असलेल्या अभ्यासक्रमावर आधारित बीजगणित, अंकगणित, भूमिती इत्यादी विषयांचे प्रश्न विचारले जातात. 
 • सामान्य बुद्धिमत्तेमध्ये बुद्धिमत्ता तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते आणि यामध्ये विभाग अ आणि विभाग ब अश्या दोन विभागामध्ये परीक्षा घेतली जाते.
 • विभाग अ मध्ये इंग्रजी या विषयावर प्रश्न विचारले जातात यामध्ये व्याकरण, शब्दसंग्रह, आकलन यावर प्रश्न विचारतात. 
 • विभाग ब मध्ये सामान्य विज्ञान, सामाजिक अभ्यास, भूगोल, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वर्तमान घटना इत्यादी विषयांवर प्रश्न येतात. 

 

NDA परीक्षेचे स्वरूप

 • परीक्षा हि ऑफलाईन पद्धतीने होत असते आणि सर्व प्रश्न हे बहुपर्यायी (MCQs) पद्धतीचे असतात.
 • NDA परीक्षेमध्ये एकूण ९०० गुणांची परीक्षा होत असते. 
 • यामध्ये १२० प्रश्न गणितावर आणि १५० प्रश्न सामान्य बुद्धिमत्ता क्षमतेवर असे एकूण २७० प्रश्न विचारले जातात. 
 • गणितामध्ये प्रत्येक बरोबर प्रश्नांच्या उत्तराकरिता २.५ गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरावर ०.८३ गुण वजा केले जातात. 
 • तसेच इंग्लिश हा विषय २०० गुंणांसाठी ५० प्रश्न विचारले जातात आणि सामान्य विज्ञान हा विषय ४०० गुणांसाठी १०० प्रश्न विचारले जातात. 
 • इंग्लिश आणि सामान्य विज्ञान या विषयांमध्ये चुकीचे उत्तर दिल्यास १.३३ गुण कमी केले जातात.

 

निष्कर्ष

आजच्या या लेखात आपण बघितले कि NDA म्हणजे काय? NDA Long Form In Marathi काय? NDA मध्ये कोणती पदे असतात? NDA मध्ये प्रवेश कसा घ्यावा? NDA साठी लागणारी पात्रता, NDA परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम. 

मित्रांनो या लेखात दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि हि दिलेली माहिती तुमच्या उपयोगी पडली कि नाही हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा सोबतच जर तुमच्या काही शंका असतील तर त्या सुद्धा आम्हाला विचारू शकता. 

हा “NDA Information In Marathi” लेख तुमच्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.  

धन्यवाद…

FAQ’s of NDA Information in Marathi

NDA साठी काय पात्रता लागते?
उत्तर: NDA मध्ये जाण्यासाठी विद्यार्थी हा १२वी उत्तीर्ण आला पाहिजे आणि त्याचे वय हे १६.५ ते १९ वर्षे यामध्ये असणे आवश्यक आहे. 

NDA मध्ये फक्त मुलांनाच प्रवेश मिळतो का?
उत्तर: होय, NDA मध्ये सध्य स्थितीत मुलांनाच प्रवेश आहे. परंतु, येणाऱ्या काळात मुलींना सुद्धा प्रवेश मिळण्यावर शिक्का मोर्तब झाला आहे. 

NDA मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे काय करावे लागते?
उत्तर: NDA मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या योग्यतेनुसार थल सेना, वायु सेना आणि जल सेना यापैकी एका सेनेमध्ये पुढील प्रशिक्षण घेण्यास जावे लागते आणि त्यानंतर तुम्हाला सेनेमध्ये भर्ती केल्या जाते. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top