मोहरम सणा विषयी माहिती मराठी मध्ये | Muharram Information in Marathi

By Shubham Pawar

Published on:

Muharram Information in Marathi – मोहरम (इंग्लिश-Muharram) किंवा मुह्हरम हा एक मुस्लिम सण आहे. इस्लामनुसार मोहरम हा वर्षारंभ आहे. मोहरम याचा अर्थ \”निषिद्ध, धिक्कार करण्यासारखा\” असा आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

\’मोहरम\’ हे इस्लामिक कॅलेंडरमधील पहिल्या महिन्याचे नाव. या महिन्याने इस्लामच्या नव्या वर्षाची सुरुवात होते. मोहरम महिन्यात हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसेन आणि हुसैन हे दोघेही करबला येथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ पैगंबर म्हणजे इस्लामचा \’पैगाम\’ म्हणजे संदेश माणसापर्यंत पोचवणारे आदरणीय प्रेषित.

Muharram Information in Marathi

पैगंबर यांनी हा धर्म निर्माण केला. त्यांना या धर्माचा \’इलहाम\’ झाला. त्यांना जेव्हा याचा \’इलहाम\’ झाला म्हणजे दृष्टांत झाला त्यावेळेस त्यांना आपण काय बोलत आहोत, कुठे आहोत याची जाणीव उरलेली नव्हती.

त्या दिवसापासून यांना, \”सल्लील्लाहू अलेह वसल्लम हजरत पैगंबर नबी\” अशी ओळख मिळाली. सुरुवातीस हा युद्ध व रक्तपातास निशिद्ध असा महिना होता. हा महिना तसा पवित्र होता, परंतु इमाम हुसेन यांच्या वधाची घटना याच महिन्यात घडली म्हणून हा महिना अशूभ ठरला. Muharram Information in Marathi

हजरत पैगंबर नबी साहेबांचे मुलीकडून नातू असलेले हसन व हुसेन यांना त्यांच्या शत्रूंनी इ.स.च्या सातव्या शतकात करबला मैदानात \”दर्दनाक मौतीचा\” अविष्कार करत ठार मारले. हा ताबूत बनविण्याचा प्रघात चौदाव्या शतकात विदेशी आक्रमक लंगडा अमीर तैमूरलंगने सुरू केला. या ताबुताचे तोंड मक्केकडे यांच्या श्रद्धास्थानाकडे करतात.

मोहरम सणा विषयी माहिती मराठी मध्ये

हजरत मोहम्मद पैगंबर यांची मुलगी बीबी फातिमा यांची हसेन आणि हुसेन ही दोन्ही मुले होती. पैगंबरांचे हे दोन्ही नातू करबला येथे शहीद झाले. इराकची राजधानी असलेल्या बगदादमधील करबला या गावात \’तारीख-ए-इस्लाम\’ हे ऐतिहासिक युद्ध झाले होते.

इस्लाममध्ये त्यांचा प्रमुख नेता अर्थात खलिफा निवडण्याचा रिवाज आहे. मोहम्मद पैंगबरांनंतर असे चार खलिफा निवडले गेले. परंतु, काही वर्षांनी उमैया वंशांचे संस्थापक, इस्लाम धर्मातील पाचवे खलिफा असलेल्या अमीर मुआविया यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यजीदने स्वत:ला खलिफा घोषित केले.

परंतु, इस्लाममध्ये \’बादशाही\’ची संकल्पना नव्हती. शिवाय यजीद एक क्रूर शासकही होता. त्याची प्रतिमा समाजात चांगली नव्हती. त्यामुळे यजीदला खलिफा मानण्यास पैगंबरांच्या नातवडांसह अनेकांनी नकार दिला

Muharram Information in Marathi

हिजरीच्या महिलन्यातील एका रात्री हुसैनला राजभवनात बोलावून यजीदचं हे फर्मान सुनावण्यात आलं. परंतु, हे फर्मान नाकारून हुसैन मक्केच्या दिशेने जायला निघाले. परंतु, संतप्त यजीदने आपले सैनिक हुसैनना मारण्यासाठी पाठवले.

हुसैन आपल्या परिवार व मित्रांसोबत करबला इथे पोहोचले असताना यजीदच्या सैन्याने त्यांना गाठले. हुसैन यांनी या सैन्याला इस्लाममधील शांतताप्रिय सिद्धांत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला खरा परंतु, सैन्यावर त्याचा परिणाम झाला नाही. अखेर हे युद्ध करबलामध्ये सुरू झाले. \”Muharram Information in Marathi\”

हुसैनचे 72 अनुयायी या लढाईत मारले गेले. या युद्धभूमीत केवळ हुसैन आणि त्यांचा 6 महिन्यांचा पुत्र अली असगर उरले होते. तहानेने व्याकूळ झालेल्या आपल्या पुत्रासाठी हुसैनने सैन्याकडे पाण्याची मागणी केली परंतु, पाणी देण्याऐवजी या चिमुकल्याचा बाण मारून जीव घेण्यात आला. या युद्धात हुसैन यांनाही मारण्यात आले. या नरसंहारानंतर मुस्लिम बांधव या महिन्याकडे \’मातम का महिना\’ म्हणून पाहतात.

मोहरम सणा विषयी माहिती मराठी मध्ये

असे म्हटले जाते की अनेक लोक मोहरममध्ये उपवास ठेवतात. प्रेषित मुहम्मद यांच्या नातवाचे हौतात्म्य आणि करबला येथील शहीदांचे बलिदान आठवते. करबलाच्या शहीदांनी इस्लाम धर्माला नवसंजीवनी दिली होती. अनेक लोक या पवित्र महिन्यातील पहिले दहा दिवस उपवास करतात. Muharram Information in Marathi

ज्यांना दहा दिवस उपवास करता येत नाहीत ते 9 आणि 10 तारखेला उपवास करतात. या दिवशी देशभरात लोकांची अतूट श्रद्धा जमते. मान्यतेनुसार, प्रेषित हजरत मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम हुसेन या दिवशी धर्मयुद्धात शहीद झाले. करबला म्हणजे सध्याचा इराक, जिथे यझिद 60 हिजरी रोजी इस्लाम धर्माचा खलीफा झाला.

त्याला संपूर्ण अरबस्तानात आपले वर्चस्व पसरवायचे होते, ज्यासाठी त्याच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते इमाम हुसेन, पैगंबर मुहम्मद यांच्या घराण्याचा एकमेव दिवा, जो अजिबात झुकायला तयार नव्हता. त्यामुळे सन 61 हिजरीपासून याझिदचे अत्याचार वाढू लागले. [Muharram Information in Marathi]

I am a Marathi YouTuber, Website Developer, and Owner/founder of Marathi Corner website and YouTube channel. I am from Pune, Maharashtra.

Leave a comment