अर्थसंकल्प 2022-23 या शेतकर्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार | Maharashtra Budget 2022

maharashtra government budget 2022

राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय?

 • राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या.
 • भूविकास बँकांचे 34 हजार 788 कर्जदारांकडे असणारे 964 कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्याची मोठी घोषणा अजित पवार यांनी केली.
 • त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजनेत काही बदल करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामध्ये जर बदल केले नाहीत, तर शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी अन्य पर्यायांचा विचार करेल असे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.

अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा 

 1. हिंगोलीमध्ये बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पीय भाषणात केली आहे.
 2. शेतकरी कल्याणासाठी अधिक अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगितले.
 3. नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आता 2022-23 यावर्षी 50 हजार रुपये अनुदान प्रोत्साहनपर दिले जाणार आहे.
 4. शेतकऱ्यांना शेततळे योजनेसाठी 50 हजार एवेजी ते वाढवून आता 75 हजार रुपये अनुदान मिळणार आहेत
 5. दोन वर्षात 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
 6. त्याशिवाय गोसीखुर्द प्रकल्पासाठीच्या कामासाठी निधीची तरतूद करण्यात आली.
 7. कोकण आणि परभणी कृषी विद्यापीठाला 50 कोटींचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली.
 8. पंतप्रधान सिंचन योजनेतून 11 प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 9. जलसंपदा विभागाला 13 हजार 252 कोटी रुपयांच्या निधीची तरतदू यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
 10. भरड धान्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
 11. शेततळ्यासाठीच्या अनुदानात वाढ करण्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे
 12. देशी गाई, बैलांची उत्पादकता वाढवण्यासाठी राज्यात तीन मोबाइल प्रयोगशाळा उभारणार
 13. प्रत्येक महसूल विभागात प्रत्येकी एक शेळी प्रकल्प
 14. या वर्षात 60 हजार कृषीपंपाना वीज देणार
 15. एक लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचे लक्ष्यं
 16. मुंबईतील पशूवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी

शिक्षणक्षेत्रासाठी अर्थसंकल्पामध्ये घोषणा

उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे तर शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद करण्याची घोषणा केली आहे.

शिक्षणासंबंधित क्षेत्रासाठी अजित पवारांनी नेमक्या काय-काय घोषणा केल्या.

 1. उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी 1160 कोटींच्या निधीची तरतूद
 2.  शालेय शिक्षण विभागासाठी 2354 कोटींच्या निधीची तरतूद
 3. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला 10 कोटींचा निधी
 4. सांस्कृतिक विभागासाठी 193 कोटींच्या निधीची तरतूद
 5.  क्रीडा विभागासाठी 354 कोटींच्या निधीची तरतूद

अर्थसंकल्पात राज्यातील परिवहन क्षेत्रासाठीच्या घोषणा

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विविध विभागांसाठीची तरतूद केली. अजित पवार यांनी राज्यात परिवहन, वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

 • यामध्ये समृद्धी महामार्गाचा गडचिरोली, गोंदियापर्यंत विस्तार करण्यात येणार असून मुंबईला जलवाहतुकीशी जोडण्यासाठीच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली.
 • मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचा विस्तार गोंदिया, गडचिरोलीपर्यंत करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली
 • गडचिरोलीत नवीन विमानतळ उभारणार असल्याची महत्त्वाची घोषणा
 • मुंबई शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतू २०२३ च्या अखेरीस सुरू होणार
 • एसटी महामंडळाला एक हजार नवीन बसेस देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 •  शिर्डी विमानतळाला १५० कोटींच्या निधीची तरतूद, तर रत्नागिरी विमानतळासाठी १०० कोटींच्या निधीची तरतूद
 • मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरवठा करणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटले.
 •  पर्यावरण पूरक ३ हजार बस सुरू करणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले.
 •  राज्यात ई-वाहनांसाठी ५००० ई-चार्जिंग स्टेशन उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले. राज्यात इलेक्ट्रीक वाहनांचा भविष्यातील वाढणारा वापर पाहता हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे
 •  मुंबई महानगर क्षेत्राला जलमार्गाने जोडण्याचा उद्देश असल्याचे अजित पवार यांनी सांगितले
 •  परिवहन विभागाला ३ हजार ३०३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.
 •  पुणे रिंग रोडसाठी १५०० कोटींचा निधी प्रस्तावित

राज्याच्या अर्थसंकल्पामधील दहा महत्वाच्या घोषणा!

 • राज्यातील 16 जिल्ह्यात प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय
 • जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींचा निधी
 • मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
 • तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड
 • आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींची भरीव तरतूद
 • आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा
 • मुंबई प्रमाणे राज्यात एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
 • राज्यात रस्ते बांधण्यासाठी 15 हजार 773 कोटी रुपये
 • एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार आहेत
 • महिला शेतकऱ्यांसाठीची 30 टक्केची तरतूद वाढवून 50 टक्के केली
 • कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार

2 thoughts on “अर्थसंकल्प 2022-23 या शेतकर्यांना 50 हजार रुपये अनुदान मिळणार | Maharashtra Budget 2022”

 1. Pingback: तुकडेबंदी बद्दल चा निकाल, 1 ते 2 गुंठे जमीन खरेदी विक्री करता येणार का? जाणून घ्या सत्त्य | Tukde Bandi Kayda Latest

 2. Pingback: खतांवर सबसिडी जाहीर, जाणुन घ्या खतांचे नवीन दर | New Fertilizer Rates 2022 Subsidy Announced »

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top