दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर : Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 Timetable

Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam Timetable

Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 Timetable – नमस्कार मित्रांनो, दहावी बारावीचे परीक्षा वेळापत्रक जाहीर झालेले आहेत हे वेळापत्रक कशा पद्धतीने पहावे आपण या पोस्टमध्ये पाहणार आहोत हे वेळापत्रक आपल्या मित्रांना शेअर करावे दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर. दहावी परीक्षा ही : २ मार्च ते २५ मार्च रोजी होणार असून तसेच बारावी परीक्षा: २१ फेब्रुवारी ते २१ मार्च पर्यंत होणार आहे.

Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 Timetable

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या लेखीपरीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यावर सूचना, आक्षेप मागविण्यात आलेत. त्यानंतर आता राज्य मंडळाने अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत, तर दहावीची लेखीपरीक्षा 2 मार्च ते 25 मार्च या कालावधीत होईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.

राज्य मंडळातर्फे दरवर्षी सप्टेंबर महिन्यात दहावी तसेच बारावीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात येते. परंतु, मार्च 2020 मध्ये कोरोना आल्यानंतर पुढील दोन वर्षे संभाव्य वेळापत्रकच जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु, यंदा 19 सप्टेंबरला संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानंतर संबंधित वेळापत्रकावर 15 दिवसांमध्ये लेखी सूचना मागविण्यात आल्या होत्या. या सूचनांचा विचार करून अंतिम वेळा- पत्रक राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. {Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 Timetable}

TIMETABLE SSC-MARCH-2023 – येथे क्लिक करा new -

TIMETABLE HSC-FEB-2023 VOCATIONAL – येथे क्लिक करा  new -

TIMETABLE HSC-FEB-2023 GENERAL AND BIFOCAL येथे क्लिक करा new -

दहावी, बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक

ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळा- पत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.

त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे. अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंव तत्सम माध्यमातून व्हायरल झालेल वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा व अन् विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपू मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्याल यांना कळविण्यात येईल. “Maharashtra Board SSC 10th, HSC 12th Exam 2023 Timetable”

अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकच ग्राह्य धरावे

  •  सध्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले वेळापत्रक हे माहितीसाठी आहे. दरम्यान, परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालय यांचेकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल.
  • त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी व विद्यार्थ्यांनी परीक्षेला बसावे, असे मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
  • राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in/ 

TIMETABLE SSC-MARCH-2023 – येथे क्लिक करा new -

TIMETABLE HSC-FEB-2023 VOCATIONAL – येथे क्लिक करा  new -

TIMETABLE HSC-FEB-2023 GENERAL AND BIFOCALयेथे क्लिक करा new -

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top