गट शेती योजना महाराष्ट्र | Gat Sheti Yojana in Marathi

gat sheti yojana maharashtra

Gat Sheti Yojana in Marathi: शेतकऱ्यांचे उत्पन्न सन 2022 सालापर्यंत दुप्पट करण्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून विविध योजना, उपक्रम घोषित करण्यात आले आहेत. यातील ‘गटशेती योजने’ बाबतच्या सर्व मुद्द्यांवर या लेखामध्ये माहिती जाणून घेणार आहोत.

प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गटशेतीस चालना देणे ही राज्य पुरस्कृत योजना सन 2017-18 व सन 2018-19 या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून शासनाने 24 जुलै 2017 नुसार मान्यता दिलेली आहे.

एका समूहातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शिवारातील संलग्न भौगोलिक क्षेत्रामध्ये सामूहिक शेती करणे, शेती उत्पादनावर प्रक्रिया व मूल्यवर्धन करणे. Gat Sheti Yojana

एकत्रित विपणनासाठी सामूहिक स्वरूपाची व्यवस्था निर्माण करणे आणि या सर्व माध्यमांतून आपल्या गट समूहाचा विकास घडवून आणणे म्हणजे गटशेती किंवा अथवा समूह शेती.

राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 सालापर्यंत दुप्पट करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याचसाठी तिचे सबलीकरण करण्यात येणार आहे.

यासाठी सन 2017-18 आणि 2018-19 या दोन वित्तीय वर्षात अंमलबजावणी करण्यासाठी पथदर्शी योजना आखण्यात आली आहे.

 

Gat Sheti योजनेची अंमलबजावणी

 1. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अथवा कंपनी नोंदणी अधिनियम 1956 च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून शेतकरी गटाची नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.
 2. दोन वर्षांत या योजनेअंतर्गत प्रत्येक गटास जास्तीत जास्त एक कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.
 3. प्रतिवर्षी 200 शेतकरी गटांना त्यासाठी पात्र ठरविण्यात येणार आहे.
 4. पीक पद्धती व शेतीचा प्रकल्प विचारात घेऊन गटशेती साठी आदर्श नमुना प्रकल्प मॉडेल तयार करण्यात येईल.
 5. यामध्ये पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग व रेशीम उद्योग आदी विभागांच्या आदर्श नमुना प्रकल्पाचा समावेश करण्यात येईल.
 6. या योजनेत शेती अवजारे, बँकेचा समावेश ही करण्यात आला आहे.
 7. गटातील सदस्यांची संख्या वाढण्यासह या सदस्यांचे एकूण क्षेत्र 100 एकरांच्या पटीत वाढले तर वाढीव असलेल्या प्रत्येकी 100 एकरांसाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचे वाढीव अनुदान देय राहणार आहे.
 8. या योजनेअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व पुरस्कारास पात्र ठरलेल्या शेतकरी गटांना प्रथम (25 लाख), द्वितीय (15 लाख), तृतीय (5 लाख) याप्रमाणे पारितोषिके देण्यात येणार आहेत. ‘Gat Sheti Yojana’

 

Gat Sheti Yojana

सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे शेतकऱ्यांची वैयक्तिक जमीन धारणा कमी होत गेल्याने शेती व्यवसायाच्या निविष्टी आणि उत्पादन यांचे संतुलन साधणे आणि फायदेशीर उत्पन्न मिळविणे त्याच्यासाठी अवघड होत जाते.

समूह/ गटशेतीच्या माध्यमातून शेती क्षेत्राचा आकार वाढवणे आणि निविष्टी एकत्र करून उत्पादन घेणे हा उत्तम पर्याय सिद्ध होऊ शकतो, हे अन्य देशांतील शेती क्षेत्राच्या अनुभवावरून लक्षात येते. ‘Gat Sheti Yojana’

समूह किंवा गट शेतीची आवश्यकता काय असणार आहे?

जमिनीचे सातत्याने होत असलेले विभाजन किंवा तुकडे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर करणे.

 • विपणन पद्धतीचा अवलंब
 • काढणीपश्चात प्रक्रिया करणे
 • प्रक्रिया उद्योग व मूल्यवर्धन
 • शेती पूरक जोडधंदा

 

Gat Sheti समूह शेतीचे फायदे

 1. समूह शेतीमुळे उच्च तंत्रज्ञान व यांत्रिकीकरणाचा अवलंब करून शेती व्यवसाय सुकर होण्यास मदत होणार आहे.
 2. सामूहिकरीत्या शेती मालाची विक्री केल्याने उत्पादन व वाहतूक खर्चात बचत होऊन फायदा वाढणार आहे. ‘Gat Sheti Yojana’
 3. काही कृषी मालांवर काढणीपश्चात प्रक्रिया करणे शक्य होणार असल्याने शेतमालास योग्य भाव मिळणे शक्य होऊ शकेल.
 4. समूह शेतीतून मोठ्या प्रामणावर भांडवल व उत्पादन होणार असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करणे शक्य होणार आहे.

सामूहिक शेतीमुळे खालील दिलेल्या गोष्टींचे उत्पादन वाढणार आहे-

 • पशुपालन
 • रेशीम व्यवसाय
 • मत्स्यव्यवसाय
 • दुग्धव्यवसाय
 • रोपवाटिका
 • मधुमक्षिकापालन
 • शेतीपूरक जोडधंदे करणे शक्य होऊन शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार आहे. Gat Sheti Yojana Maharashtra

Gat Sheti योजनेची पार्श्वभूमी

 • लोकसंख्या वाढीमुळे शेतजमिनीचे सातत्याने विभाजन होत असून तिची धारणक्षमता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
 • सन 2010-11 च्या अहवालानुसार महाराष्ट्रात 1970-71 मध्ये असलेली 4.28 हेक्टरची धारणक्षमता कमी होत जाऊन ती सन 2010-11 मध्ये 1.44 हेक्टर प्रति खातेदार इतकी कमी झाली आहे.
 • काही ठिकाणी तर ती 11 ते 15 गुंठे इतक्या कमी प्रमाणात आहे. Gat Sheti Yojana
 • अशा परिस्थितीत एवढ्या छोट्या क्षेत्रावर शेती करणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसल्याचे आढळून आले आहे. या समस्येवर समूह शेती हा प्रभावी उपाय आहे.

कामकाजाचे स्वरूप

 • सभासदांनी कामकाज, आर्थिक व्यवहार इत्यादी रीतसर नोंद ठेवणे आवश्यक आहे.
 • शेतकरी गट स्थापन करताना यात शेतकरी गट शाश्वत होण्याकरिता व दर महिन्यात सर्व सदस्यांनी एकत्र येण्यासाठी कोणते तरी वस्तुनिष्ठ प्रयोजन असावे.
 • या हेतूने शेतकरी गटांमध्ये प्रत्येक महिन्याला बचत करणे आवश्यक आहे. या बचतीतून शेतकरी गटास भविष्यात बँकेकडून विनातारण पतपुरवठा होण्यासाठी विश्वासार्हता निर्माण होईल.
 • समूह/ गटाच्या शेतीच्या सभासदांनी शाश्वत गट म्हणून कार्यरत राहण्यासाठी निर्यामित बैठका घ्याव्यात.
 • गटाची स्थापना करणे ,त्याच्या नियमित बैठक आयोजित करणे त्यांना एकत्रित ठेवण्यासाठी ठराविक मासिक वर्गणी जमा करणे, कामकाजाची व व्यवहाराची नोंद ठेवणे इत्यादी क्षेत्रीय कर्मचार्‍यांकडून प्रशिक्षण देण्यात जाईल. Gat Sheti Yojana
 • स्थापन केलेले गट बँकेशी जोडल्यास जोडण्यात येतील. नाबार्ड सारख्या बँकेमार्फत समूह शेतीसाठी अनेक योजनांद्वारे कर्जपुरवठा, अल्प व्याजदराने विनातारण ठेवीच्या 3/4 पट कर्ज उपलब्ध होऊ शकते.
 • स्थापन होणाऱ्या समूह/ गट शेतीचा गट अंतर्गत समन्वय साधण्यासाठी तालुका व व जिल्हा स्तरावर समित्या स्थापन करण्यात येतील. ‘Gat Sheti Yojana in Marathi’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top