free traveling scheme – शासन निर्णय क्र.टीसी 1995/2039/प्र.क्र. 120/परि-1, दिनांक 25.01.1996 अन्वये महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षांपेक्षा जास्त वय असणा-या जेष्ठ नागरिकांकरिता रा.प. साध्या बसेसमध्ये प्रवासभाडयात 50% सवलत अनुज्ञेय करण्यात आली असून शासननिर्णय क्र. टीसी 3408/15/प्र.क्र. 98/परि-1, दिनांक 21.06.2008 अन्वये रा.प. महामंडळाच्या साध्या बसेसमधुन देण्यात येणारी 50% सवलत निमआराम बसेसमध्ये देखील लागू करण्यात आली आहे. तसेच दि. 01.06.2018 पासुन सदरची सवलत शिवशाही बसेसमध्ये (आसनी व शयनयान) अनुक्रमे 45% व 30 % लागु करण्यात आली.
free traveling scheme
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये विनामुल्य प्रवास सवलत व 65 वर्ष ते 75 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये 50 % सवलत अनुज्ञेय करणेबाबत पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे.
65 ते 75 वर्ष वयोगटातील व 75 वर्ष वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये अनुक्रमे 50% व 100% सवलत दि.26.08.2022 (दि. 25.08.2022 व दि. 26.08.2022 ची मध्यरात्र) पासून अनुज्ञेय करण्यात येत आहे. {free traveling scheme}
सवलती करीता आधारकार्ड, निवडणुक ओळख पत्र केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचा-यांना दिलेली ओळखपत्र, (मात्र त्यावर फोटो, जन्म तारीख रहिवासी पत्ता अनिवार्य आहे ) पासपोर्ट, ड्रायव्हींग लाइसन्स, पॅनकार्ड, तहसिलदार यांनी दिलेले ओळखपत्र व रा प महामंडळाव्दारे देण्यात येणारे स्मार्टकार्ड, डीजी लॉकर, एम आधार ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासभाड्यात 100% सवलत असली तरी या योजनेतील जे प्रवाशी संगणकीय आरक्षण सुविधेव्दारे विंडो बुकींगव्दारे ऑनलाईन, मोबाईल अॅपव्दारे संगणकीय आरक्षणाव्दारे तिकीट घेतील अशा प्रवाशांकडुन सेवा प्रकार निहाय लागु असलेला आरक्षण आकार वसुल करण्यात यावा.
नागरिकांना आजपासून ST चा प्रवास मोफत
दि. 26.08.2012 च्या पूर्वी आगाऊ आरक्षण केलेल्या प्रवाशांकरिता परिपत्रक लागू होणा-या तारखेनंतर प्रवास सुरु केल्यास त्या 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटाचा परतावा देण्यात यावा. “free traveling scheme”
याकरिता सदर प्रवाशांनी नजिकच्या आगारात / बसस्थानकावर परताव्याकरिता अर्ज व वयाच्या पुराव्याची प्रत सादर करावी आगार व्यवस्थापक / स्थानक प्रमुखांनी त्याची खातरजमा करुन त्याचा प्रचलित कार्यपध्दतीनुसार परतावा करावा. सदर परतावा दिलेल्या रक्कमेची मागणी सवलत मासिक विवरणपत्रात समायोजित करण्यासाठी दर्शवावी.
किती वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये विनामुल्य प्रवास सवलत मिळणार आहे?
75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये विनामुल्य प्रवास सवलत मिळणार आहे.
65 वर्ष ते 75 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये किती टक्के सवलत मिळणार आहे?
65 वर्ष ते 75 वर्षापर्यंत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवेमध्ये 50 % सवलत