आजच्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी फिट इंडिया मोबाईल ॲप सुरु केले “फिट इंडिया हे मोबाईल ॲप 135 कोटी भारतीयांसाठी सुरु केलेले तंदुरुस्तीसाठीचे भारताचे सर्वात व्यापक ॲप आहे” : अनुराग ठाकूर
फिट इंडिया मोबाईल ॲप
महत्त्वाची वैशिष्ट्ये :
- हे ॲप मोफत मिळणार आहे पण ते आपल्या तंदुरुस्तीसाठी मौल्यवान ठरणार आहे
- फिट इंडिया ॲप नव्या भारताला तंदुरुस्त भारत बनविण्यासाठी सहाय्यक ठरेल
- या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंग, मुष्टीयोद्धा संग्राम सिंग, क्रीडा पत्रकार
- अयाझ मेमन आणि पायलट कॅप्टन ॲनी दिव्या यांच्यासह इतरांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.
- फिट इंडिया ॲप हे मोफत उपलब्ध असलेले ॲप असून अँड्रॉईड आणि आयओएस
- अश्या दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे
- चळवळीसारख्या विविध उपक्रमांमध्ये सार्वजनिक पातळीवर भाग घेऊन ‘आझादी का अमृत महोत्सव’ उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन ठाकूर यांनी देशवासियांना केले.
- दुसरा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा भाग म्हणून केंद्रीय युवक व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी
- आजच्या क्रीडादिनाला नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडीयम येथे झालेल्या कार्यक्रमात फिट इंडिया ॲपची सुरुवात केली.
तंदुरुस्तीसाठीचे भारताचे सर्वात व्यापक ॲप
या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्र्यांनी भारतीय हॉकी संघाचा कप्तान मनप्रीत सिंग, मुष्टीयोद्धा संग्राम सिंग, क्रीडा पत्रकार अयाझ मेमन आणि पायलट कॅप्टन ॲनी दिव्या यांच्यासह इतरांशी आभासी पद्धतीने संवाद साधला.
फिट इंडिया ॲप हे मोफत उपलब्ध असलेले ॲप असून अँड्रॉईड आणि आयओएस अश्या दोन्ही प्रणालींच्या मंचावर ते इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध आहे.
या ॲपचा वापर अत्यंत मूलभूत स्मार्टफोनद्वारे देखील करता आला पाहिजे हे लक्षात घेऊनच त्याची रचना करण्यात आली आहे.
फिट इंडिया चळवळीच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त तसेच राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त सर्वांचे अभिनंदन करत, केंद्रीय मंत्री म्हणाले, “फिट इंडिया मोबाईल ॲप प्रत्येक भारतीयाला त्याच्या तंदुरुस्तीची पातळी तपासण्याची सोय अगदी त्याच्या हातात आणून देते.
या ॲपमध्ये ‘फिटनेस स्कोअर, अनिमेटेड व्हिडिओ, शारीरिक हालचालींवर लक्ष ठेवणारा ट्रॅकर
आणि प्रत्येकाच्या व्यायामाची विशिष्ट गरज पूर्ण करणारा ‘माय प्लॅन’ अशी काही अत्यंत वैशिष्ट्ये आहेत.
Fit India Mobile App Download process here 👇👇👇👇
“FITNESS KI DOSE, AADHA GHANTA ROZ!”
FIT INDIA 🇮🇳 MOBILE APP
India’s most comprehensive Fitness App launched on #NationalSportsDay !
On Your Marks,
Fitness Test,
Go !“FITNESS KI DOSE, AADHA GHANTA ROZ!”
Google Play Store:https://t.co/blpuV0yeGR
Apple Store:https://t.co/zytUEN6RCl#FitIndiaApp pic.twitter.com/k5hUWFVUyO
— Anurag Thakur (@ianuragthakur) August 29, 2021