ई-पीक पाहणी मोबाईल ॲपद्वारे नोंदणी करण्यास मुदतवाढ, E Peek Pahani Last Date Update

E Peek Pahani Last Date Update: महसूल व वनविभाग कडील ई पीक पाहणी चा खरीप हंगाम कालावधी वाढवून देण्याबाबत. हसूल आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी सुरु करण्यात आलेला ई-पीक पाहणी हा महाराष्ट्रासाठी एक व्यापक प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

श्री. थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या सातबारावर पीक पाहणीची अचूक नोंद होण्यासाठी  राज्य शासनाने ‘माझी शेती माझा सातबारा’ मीच नोंदविणार माझा पीक पेरा’ ही मोहीम हाती घेतली आहे. ई-पीक पाहणी मोबाईल ॲप प्रकल्पास राज्यभरातील शेतकरी वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत 18  लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी हे ॲप डाऊनलोड केले असून या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी देखील नोंदविली आहे. महाराष्ट्रात राबविण्यात येणारा हा व्यापक प्रकल्प असून हा प्रकल्प राज्यातील प्रत्येक कुटुंबाशी जोडला जाणारा आहे. या प्रकल्पामुळे शेतकरी बांधवांना आपल्या पीकाची माहिती स्वत:च भरणे शक्य होणार आहे. आताच्या डिजिटल युगात शेतकऱ्यांना सहज, पारदर्शक व बिनचूक पद्धतीने आपल्या पिकांची नोंदणी करता येणार आहे.

ई-पीक पाहणी ॲपवर नोंदणी करण्यास मुदतवाढ

संदर्भीय शासन निर्णयाद्वारे राज्यव्यापी केलेल्या ईपीक पाहणी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे स्तरावरून प्रचार प्रसिद्धी व प्रबोधन या साठी १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट आणि खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल आप द्वारे पीक पाहणी करण्यासाठी शेतकरी यांचे साठी १५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर असा कालावधी निश्चित करून देणेत आला होता व त्यानंतर १६ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत तलाठी स्थरावरून होणारी पीक पाहणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले होते.

E Peek Pahani Last Date

राज्याच्या काही भागात अतिवृष्टी, पूर, कोरोना महामारी व उशिराच्या मान्सूनमुळे आणि ई पीक पाहणी मोबाईल आप च्या थोड्या उशिराच्या शुभारंभ ह्याचा विचार करून राज्यस्थरीय अंमलबजावणी समितीच्या दिनांक 08/09/2021 च्या बैठकीत ई पीक पाहणीच्या शेतकरी स्तरावरील कामाची कालमर्यादा 15 सप्टेंबर वरून 30 सप्टेंबर आणि तलाठी स्तरावरील पीक पाहणी नोंदविण्याची कालमर्यादा 30 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोंबर पर्यंत वाढविण्यास मान्यता देण्यात येत आहे त्याप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील सर्व तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच मंडळ कृषी अधिकारी आणि सर्व शेतकरी बांधवांचे निदर्शनास आणून द्यावे. या बाबत आपण आपले स्थरावर व्यापक प्रचार प्रसिद्धी करावी ही विनंती.

e peek pahani online app

पीक पेरणीची माहिती भ्रमणध्वनी वरील प द्वारा (Mobile App) गा.न.नं. 12 मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी उपलब्ध करुन देण्याचा ई-पीक पाहणी कार्यक्रम संपूर्ण राज्यात राबविण्याच्या अनुषंगाने क्षेत्रिय महसूली अधिकारी व प्राधिकारी यांना दिशानिर्देश देण्याबाबत

 

ई पिक पाहणी कशी करावी खाली दिलेला Video नक्की पहा 👇👇👇👇👇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top