E-nomination important for PF account holders: पीएफ खातेधारकांना भविष्य निर्वाह निधीसाठी ई-नॉमिनेशन महत्वाचे
कोविड-19 महामारीच्या काळात, अनेक लोक आर्थिक आधारासाठी आपल्या भविष्य निर्वाह निधीवर अवलंबून होते, असे आढळून आले, मात्र, यापैकी अनेक लोकांना आपल्या पीएफचे दावे वळते करण्याच्या प्रक्रियेत, त्यांनी नॉमिनेशन (आपल्यानंतरच्या वारसदाराचे नाव) न भरल्यामुळे, त्यांना अनेक अडचणी येत असल्याचे निष्पन्न झाले आहे.
E-nomination important for PF Account Holders
कोणत्याही बचत योजनेत ठेवीदाराने आपल्या वारसदाराच्या नावाचा उल्लेख करणे अत्यंत आवश्यक आहे, याआधी, पीएफ खातेधारकांना फॉर्म क्रमांक-2 भरुन तो संबंधित पीएफ कार्यालयात नेऊन द्यावा लागत असे.
मात्र, डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत, पीएफ खातेधारकांना घरीच बसून केवळ काही मिनिटांत, ऑनलाईन हा नॉमिनेशन फॉर्म भरता येणार आहे.
भविष्यात, एखाद्या खातेधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसदारांना रक्कम मिळतांना काहीही अडचण येऊ नये, हे सुनिश्चित करण्यासाठी, ईपीएफओ च्या गोवा येथील क्षेत्रीय कार्यालयाने प्रादेशिक पीएफ आयुक्त, अश्विनी कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली, ईपीएफ आणि ईपीएस (कर्मचारी निवृत्तीवेतन योजना) नॉमिनेशन मोहीम सुरु केली आहे.
भविष्य निर्वाह खात्यावर वारसदाराच्या नावाचा उल्लेख असला तर, संबंधित कर्मचाऱ्याने ज्याचे/जिचे नाव दिले असेल, त्याला/तिला, त्यांच्या माघारी, कोणतीही अडचण न येता पैसे जमा केले जाऊ शकतील.
ईपीएस/ईपीएफ नॉमिनशन डिजिटली भरण्यासाठी संबंधित व्यक्तींनी खालील पद्धतीचा अवलंब करावा : –
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या संकेतस्थळाला भेट द्या>>>> https://unifiedportal-mem.epfindia.gov.in/memberinterface/
- सेवा>>कर्मचार्यांसाठी>> Member UAN/Online Services वर क्लिक करा.
- UAN and password वापरून लॉगइन करा
- Manage Tab मध्ये E-Nomination निवडा
- पडद्यावर Provide Details दिसेल. Save वर क्लिक करा
- कुटुंबाची माहिती अद्ययावत करण्यासाठी Yes वर क्लिक करा
- Add family details वर क्लिक करा. (एकापेक्षा जास्त वारसदार समाविष्ट केले जाऊ शकतात.)
- Nomination Details वर क्लिक करून आपल्या हिश्याची एकूण रक्कम जाहीर करा.
- Save EPF Nomination क्लिक करा.
- E-sign’ वर क्लिक करून OTP तयार करा. आधार कार्डशी संलग्न असलेल्या आपल्या मोबाईल क्रमांकावर पाठवलेला ‘OTP’ भरा
- आता ई-नॉमिनेशन कर्मचारी भविष्यनिधी संघटनेकडे नोंद झाले आहे
- E-nomination व्यतिरिक्त, वारसदारंविषयी कुठलीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही