जिल्हा बँक देणार 30 लाखापर्यंत एज्युकेशन लोन | District Bank Education Loan

District Bank Education Loan

District Bank Education Loan – जिल्हा बँक देणार 30 लाखांपर्यंत शैक्षणिक कर्ज. संचालक मंडळाकडून शैक्षणिक कर्जात दुप्पट वाढ. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक बोर्डाकडून शैक्षणिक कर्जात वाढ करण्यात आली आहे. देशात महागाई प्रचंड वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी येत आहेत.

District Bank Education Loan

याच पार्श्वभूमीवर त्यात आता देशांतर्गत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना 30 लाखांपर्यंत कर्ज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी हे कर्ज 15 लाख रुपये होते. तसेच, परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी 40 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. याआधी हे कर्ज 25 फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणातलाखांपर्यंत मिळत होते. “District Bank Education Loan”

या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे, असे विरोधी पक्षनेते अजित पवार  यांनी सांगितले. गृहकर्जाची मर्यादा 75 लाख असेल आणि व्याजदर 8 टक्के असणार आहे. याआधी ते व्याज 9 टक्के होते. जिल्हा बँकेकडून पगारदारांना देण्यात येणारे कर्ज आता 20 वीस लाख रुपयांपर्यंत देणार आहे. आधी ही मर्यादा 15 लाख होती.

जिल्हा बँक देणार 30 लाखापर्यंत एज्युकेशन लोन

वीस लाखांहून अधिक रकमेची ज्या संस्थांना अडचण असेल अशा 13 तालुक्यांतील 109 संस्थांना नऊ कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. वाहनाच्या कर्जाबाबतदेखील त्यांनी निर्णय घेतला आहे. वाहनासाठी कर्ज मर्यादा दोन लाखांहून पाच लाख करण्यात आली आहे. (District Bank Education Loan)

तर, व्याजदर साडेदहा टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आला आहे, असाही निर्णय घेण्यात आला आहे. नोटाबंदीच्या कालावधीतील 22 कोटी रुपये रिझर्व्ह बँकेने अद्यापि स्वीकारलेले नाहीत. यासाठी सर्वोच्च न्यायालयात खटलादेखील सुरू आहे. राज्यातील वेगवेगळ्या बँकांची अशी रक्कम नव्वद ते 100 कोटी रुपये इतकी आहे, या सगळ्यासाठी प्रयत्न करणार असल्याच त्यांनी म्हंटले .

रिझर्व्ह बँकेच्या मनात सहकारी बँकांबाबत अढी

रुपी बँक इतर कोणत्या बँकेत विलीन करता येईल का, यासाठी प्रयत्न केले. काही सहकारी बँका रुपीला विलीन करून घ्यायला तयार होते. मात्र, त्याआधीच रिझर्व्ह बँकेने निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही. काही उद्योगपती मोठ्या प्रमाणात कर्ज बुडवतात. मात्र, त्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून वेगळी भूमिका घेतली जाते. जे चुकीचे काम करतील, त्यांच्यावर कारवाई करायला हवी.

मात्र, बँकेचा परवाना रद्द करण्यात येणं हे दुजाभाव करणे आहे. रिझर्व्ह बँकेच्या मनात सहकारी बँकांबाबत अढी आधीपासूनच आहे. देशात आठ ते दहा बँकाच ठेवायच्या आणि इतर बंद करायच्या, वरिष्ठ पातळीवर अशी चर्चा आहे, असेही अजित पवार यांनी सांगितले. {District Bank Education Loan}

परदेशात शिक्षण घेणाऱ्यांना किती कर्ज मिळणार आहे?

परदेशात शिक्षण घेणाऱ्यांसाठी 40 लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.

गृहकर्जाची मर्यादा किती असेल आणि व्याजदर किती टक्के असणार आहे?

गृहकर्जाची मर्यादा 75 लाख असेल आणि व्याजदर 8 टक्के असणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top