दिव्यांगांना, अपंगांना 2000 रू. मदत, अर्ज सुरू | असा भरा ऑनलाईन फॉर्म | Disability Scheme Pune 2022 Corporation Online form application
Disability 2000rs Scheme Pune Corporation 2022
समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका जाहिर प्रकटन सन 2022 कोविड-१९ प्रादुर्भावाच्या काळामुळे उद्भवलेल्या
परिस्थितीमुळे ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांच्या बँक खात्यामध्ये आर.टी.जी.एस. द्वारे प्रत्येकी रक्कम रू.2000 प्रमाणे एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.
सदर अर्थसहाय्य देण्याकरीता पुणे शहर हद्दीतील ४०% पेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्या नागरिकांकडून अर्ज मागविणेत येत आहे.
अर्थसहाय्य घेणेकरीता dbt.punecorporation.org या संकेतस्थळावरती अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येईल किंवा खालील नमुना प्रमाणे माहिती भरून पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी सादर करता येईल.
🔴 ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक – dbt.punecorporation.org
🔴 ऑफलाईन अर्ज डाऊनलोड करा – Form Download
अर्जा सोबत दिव्यांग प्रमाणपत्र, बँकेत खाते असल्याबाबत तसेच आर.टी.जी.एस. द्वारे रक्कम जमा करण्यासाठी बँकेच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत, पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड, रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

दिव्यांगांना अपंगांना 2000 रू. मदत कागदपत्रे
अधिक माहितीसाठी संपर्क क्र.०२०-२५५०१२८३ व ०२०-२५५०१२८४ या दूरध्वनीवर संपर्क साधावा.
सदर अर्ज स्विकारण्याची मुदत दि.०१ जून २०२२ ते दि.३० जुलै २०२२ पर्यंत राहील (कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी).
आवश्यक कागदपत्रे
- दिव्यांग प्रमाणपत्र
- बँक पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत
- पुणे शहर हद्दीत वास्तव्याचा पुरावा
- आधारकार्ड
- रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत
Video Topics
00:00 – introduction of disability scheme Pune corporation online
01:20 – eligible of this scheme and date of application
03:30 – how to fill online form application step by step
03:40 – disability registration
05:05 – online application
07:00 – select scheme Pune corporation
08:05 – fill personal information
09:35 – address filling
10:22 – bank details filling process
12:05 – document uploading process
14:35 – important information
Excellent Article 👍
Pingback: दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी ऑनलाईन अर्ज | Maha Sharad.in Portal Registration 2022 »