Dip Amavasya 2022: माहिती, पूजा, विधी, महत्व जाणून घ्या

Dip Amavasya 2022 information in Marathi – Deep Amavasya Puja, Vidhi in Marathi then this is the right place for you.

आषाढ महिन्याच्या शेवटी असणारी अमावस्या आपण तिला आषाढी अमावस्या व दिप अमावस्या असंही म्हणतात.

श्रावण महिना सुरु व्हायच्या आदल्या दिवशी अमावस्या येते तर त्या दिवशी सर्व देवांची दिवे लाऊन पूजा केली जाते.

विशेष योगायोग मनाला जात आहे: यावेळी सावन महिन्यात अनेक विशेष योगायोग बनत चालले आहेत. सावन हा सोमवारपासून सुरू झाला असून हा महिना ही सोमवारीच संपेल.

श्रावण पूर्णिमा आणि अमावस्याही सोमवारी पडत आहे. असा योगायोग 47 वर्षांनंतर तयार होत असतो. यावर्षी अमावस्येच्या दिवशी चंद्र, बुध, गुरु, शुक्र व शनि ग्रह आपापल्या राशि चक्रात राहतील. ग्रहांचा हा शुभ प्रभाव अनेक राशींवर दिसेल.

Dip Amavasya 2022 information in Marathi

“Deep Amavasya information in marathi” – सावनच्या पवित्र महिन्यात सावन सोमवार आणि अमावस्येच्या विशेष महत्व आहे. परंतु जर अमावस्या सोमवारी म्हणजे सोमवती अमावस्या असेल तर त्याचे महत्त्व आणखीन वाढते.

Dip Amavasya information in Marathi
Dip Amavasya information in Marathi – Deep Amavasya Puja, Vidhi in Marathi

या वेळी सावनच्या तिसर्‍या सोमवारी खूप दशकांनंतर 20 जुलै ला सोमवती अमावस्या आली आहे.

या अमावस्याला दिप अमावस्या असेही म्हणतात. असे म्हटले जाते की असा शुभ योगायोग दिवस हा 20 वर्षां पूर्वी झाला होता.

भगवान शिव, पार्वती, आणि कार्तिकेय यांची पूजा दिप अमावस्येच्या दिवशी केली जाते.

सावनच्या सावन सोमवार आणि दीप अमावस्या यांना पूजा आणि जलाभिषेकाचे विशेष परिणाम प्राप्त होतात.

भगवान शिवची असीम कृपा मिळावी म्हणून अनेक भक्त दिप अमावस्याला व्रत ठेवतात.

अमावस्येवरही महिला तुळशी / पिंपळाच्या झाडाचे 108 प्रदक्षिणा करतात. अमावस्यावरील देवतांची उपासना व पूजा करण्याची अनेक भागात परंपरा आहे.

असा विश्वास आहे की यामुळे स्वर्गातील पूर्वजांना अज्ञात तारखेला मुक्ती मिळते.

Dip Amavasya 2022 Poja, Vidhi in Marathi

 • ‘Deep Amavasya Puja, Vidhi in Marathi’ – तर या दिवशी सर्व दिवे स्वच्छ घासून ठेवले जातात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी देवांची पूजा केली जाते.
 • तसेच आपल्या घरातील मुलांना सुद्धा या दिवशी संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना म्हणून त्यानंतर मुलांना सुद्धा ओवाळले जाते.
 • तर या दिवशी सर्व दिवे स्वच्छ घासून ठेवले जातात आणि दुसर्‍या दिवशी सकाळी देवांची पूजा केली जाते.
 • तसेच आपल्या घरातील मुलांना सुद्धा या दिवशी संध्याकाळी शुभंकरोती प्रार्थना म्हणून त्यानंतर मुलांना सुद्धा ओवाळले जाते.
 • देवासमोर दिवसभर दिवे लावले जातात आणि संध्याकाळी देवासमोर शुभंकरोती प्रार्थना म्हटली जाते आणि त्यानंतर मुलांना सुद्धा वोवाळले जाते.
 • गोडाचा नैवेद्य केला जातो तसेच एक कणकेचे दिवे केले जातात हे सकाळीच केले जातात दुपारी गोड धोडाचा नैवेद्य केला जातो.
 • आमच्याकडेही आषाढी अमावस्या पूजा केली जाते साध्या सोप्या पद्धतीने आहे.
 • तर तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला हि पूजा कशी वाटली ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका.

सोमवती अमावस्या तिथी मुहूर्त-
अमावस्या तारीख प्रारंभ – 20 जुलै 2021 पासून 12:10AM वाजता
अमावस्या तारीख संपेल – 20 जुलै 2021 रोजी 11:02PM वाजता

दिप अमावस्या महत्व आणि या दिवशी काय करावे?

भगवान शिव, पार्वती, गणेशजी आणि कार्तिकेय यांची दिप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी जलाभिषेक देखील विशेष फलदायी असल्याचे सांगितले जाते.

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ आंघोळ करावी.  त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्या.  पूर्वजांना या दिवशी अनेक ठिकाणी उपवास देखील केला जातो. गरजूंना देणगी द्या. पीपळाच्या झाडाची पूजा करा.

Dip Amavasya 2022 information in marathi – शक्य असल्यास या दिवशी पीपल, केळी, केळी, लिंबू किंवा तुळशीच्या झाडाची लागवड करावी.

अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा तलावामध्ये जाऊन माशांना पीठाच्या गोळ्या खाण्याची परंपरा आहे. ही तारीख तर्पण, स्नान, दान इत्यादींसाठी पुण्यवान मानली जाते.

 1. बरेच लोक या दिवशी व्रत ठेवतात.
 2. अमावस्येवरही महिला तुळशी किंवा पीपलच्या झाडाचे 108 प्रदक्षिणा करतात.
 3. अमावस्येवर अनेक ठिकाणी वडिलोपार्जित देवतांची पूजा करण्याची आणि त्यांची पूजा करण्याची परंपरा आहे.
 4. सावन हा हिरवळ आणि उत्साहाचा महिना मानला जातो.
 5. म्हणून निसर्गाच्या जवळ येण्यासाठी या महिन्याच्या अमावस्येला वृक्षारोपण केले जाते.
 6. असे मानले जाते की या दिवशी झाडे लावून ग्रह दोष शांत होतो.
 7. या तारखेला गंगा स्नान आणि देणग्यांना खूप महत्त्व आहे.

RAED MORE –

शिवरात्री ची सम्पूर्ण माहिती व कथा : Shivratri Mahatva in Marathi

Bail Pola information in Marathi | बैल पोळा माहिती

गटारी नव्हे दीप अमावस्या! (हिंदूंच्या मंगलपूजेचे गटारीकरण नको)

(हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत).

मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com

Deep Amavasya Information in Marathi – आज दीप अमावस्या आहे. हिंदु च्या सर्वाधिक कुचेष्टेचे, विकृत विनोदांचे जे सण आहेत त्यात वटपौर्णिमेनंतर दीप अमावस्या हा सण येतो.

सण साजरे करताना आधी आपणच त्यात अनेक विकृती येऊ देतो आणि नंतर “आम्हाला आमचे सण साजरे करू द्या“ म्हणून न्यायालयाच्या दारात जातो. म्हणूनच दिव्यांच्या या अस्सल मंगल मराठी सणाला आपण गटारात नेण्याचे पाप करू नये असे मला वाटते.

व्यक्तिगत पातळीवर गटारी साजरी करण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. पण दीपपुजे ऐवजी केवळ गटारी म्हणून याला वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, SMS, फेसबुक, whatsapp इत्यादींवर कुप्रसिद्धी मिळू नये.

दारूच्या बाटल्या, कोंबड्या, बोकड यांची चित्रे” शुभेच्छा म्हणून एकमेकांना पाठविणे, Happy Gatari म्हणून wish करणे या वाईट गोष्टी आपण कटाक्षाने टाळाव्यात.

जो आपला सणच नाहीये त्यासाठी आपण आपला धर्म का म्हणून बदनाम करायचा? हळूहळू याचे चांगले परिणामही दिसू लागले आहेत. प्राण्याच्या शरीरातून जगभर पसरलेला कोरोना लाखोंचे प्राण घेत सुटला आहे.

किमान या पावसाळी दिवसांमध्ये मांसाहार बंद ठेवण्याची तीव्र गरज आणि आपली प्रथा यावर्षी प्रकर्षाने अधोरेखित झाली आहे.

हजारो वर्षांची परंपरा असलेल्या आपल्या धर्मात याच्या मागचे विज्ञानही सामावलेले आहेच.

वैज्ञानिक कारणे – Deep Amavasya Information in Marathi

Deep Amavasya Information in Marathi पूर्वी या दिवशी मांसाहार करून गौरींच्या जेवणापर्यंत मांसाहार बंद ठेवला जात असे. आपण यामागची वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया –

 1. या ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही.
 2. बहुतेक प्राण्यांचा हा काळ म्हणजे विणीचा / प्रजननाचा काळ असतो. याच काळात प्राण्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्मालाच येणार नाहीत.
 3. मग वर्षभर खायला प्राणी मिळणार कुठून ? याचा साऱ्या निसर्गचक्रावरच विपरीत परिणाम होतो. हल्ली मत्स्यदुष्काळ वगैरे शब्द ऐकू येऊ लागले आहेत.
 4. त्यामुळे निसर्गपुत्र कोळीबांधव या काळात मासेमारी करीत नाहीत आणि सरकारी पातळीवरूनही मासेमारीवर बंदी घालण्यात येते.
 5. या दिवसात बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीराच्या आत आणि शरीरावरील त्वचेवर अनेक घातक जीवजंतू असण्याची शक्यता असते.
 6. शिजविताना त्यांचा पूर्ण नाश न झाल्यास त्याचाही खाणाऱ्याला त्रास होऊ शकतो.
 7. वातावरणात ओलावा असतो. मांस किंवा मासे नीट न ठेवल्यास ते हवेतील वाढलेल्या जंतूंमुळे कुजण्याची प्रक्रिया अधि33क वेगाने होते.
 8. आजच्या प्रगत काळात अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके, औषधे उपलब्ध असूनसुद्धा, धुमाकूळ घालणाऱ्या विविध साथीना आवर घालणे कठीण होते.
 9. अनेक घातक रोगांच्या जीवघेण्या साथी, ह्या अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर वाढणाऱ्या जंतुंमुळे पसरतात. म्हणून या दिवसात मांसाहार टाळल्यास जंतू संसर्गाचा धोका कमी होतो.
 10. अशा सर्व कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेली आहे. त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो.

शाकाहार करण्यामागेही शास्त्रीय कारणे आहेत – Deep Amavasya 2022

 1. अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा अनेक भाज्या याच काळात उगवतात. संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पाहायलाही मिळत नाहीत.
 2. शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच खाल्ल्या जातात. तुलनेने शाकाहाराचे या दिवसात नीट पचन होते.
 3. विविध उपासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मिळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक अपोआप शरीराला लाभतात.
 4. कायम मांसाहार करणाऱ्यांच्या पचन संस्थेवर नेहेमी येणारा ताण, या शाकाहारी बदलामुळे कांही काळ कमी होतो. Deep Amavasya Information in Marathi

अमावस्येची दीप पूजा आणि निरांजनाची खास रचलेली आरती

 • Deep Puja in Marathi या दीप अमावास्येच्या दिवशी घरातील दिवे घासून पुसून ते एका पाटावर मांडावेत.
 • घरात खूपच दिवे असतील तर नेहेमीच्या पूजेतील, कुटुंबात वंशपरंपरागत असलेले, असे काही महत्वाचे दिवे पूजेसाठी ठेवावेत.
 • शक्यतो प्रत्येक दिव्याखाली छोटी ताटली ठेवावी म्हणजे ओघळणारे तेल त्यात जमा होते. पाटाखाली छोटीसी तरी रांगोळी काढावी.
 • पाट नसल्यास केळीच्या पानावर दिव्यांची स्थापना करावी. त्यांना हळदीकुंकू, फुले वाहून नैवेद्य दाखवावा.
 • नैवेद्यासाठी दूधसाखर, दुधगूळ, लाह्या बत्तासे, पेढे, फळे असे काहीही चालते. उदबत्ती व निरांजन लावून ओवाळावे.
 • (पूजा करावी) दिव्यांमध्ये वाती या कापसाच्या असाव्यात आणि शक्यतो जोड वात लावावी. जीवा-शिवाच्या एकरूपतेचे, अद्वैताचे प्रतीक म्हणून, जोडा सलामत राहावा म्हणून, अशी याची कारणे सांगितली जातात
 • ‘Dip Puja Mahiti in Marathi’ परंतु शास्त्रीय कारण असे की दोन वातींमुळे केशाकर्षण (कॅपीलरी ऍक्शन) योग्य प्रकारे होऊन, ज्योतीला तेलाचा अखंड पुरवठा होतो आणि दिवा नीट तेवत राहतो.
 • दिव्यांचे तोंड/मुख म्हणजे त्याच्या वाती ! हे तोंड गोड करण्यासाठी या वाती खडीसाखरेच्या खड्याने पुढे सरकवतात आणि नंतर त्या उजळतात (पेटवितात).
 • कांही जण प्रत्येक वातीच्या मुखाशी, साखरेचे ४/५ दाणे ठेवतात. या दिवशी अनेक जातीनिहाय काही खास पक्वान्न करण्याची एक छान खाद्य संस्कृती महाराष्ट्रात आहे.2`1

विविध घरामधील परंपरा –  Dip Amavasya 2022

विविध घरांमध्ये परंपरेनुसार खीर पुरण, उकडीचे मोदक, उकडीचे दिवे, कणकेचे गोड दिवे, मुरड कानवले, दिंड पुरण इत्यादी पक्वान्ने केली जातात.

Deep Amavasya Mahatva in Marathi अशा खास पक्वान्नांचा नैवेद्य दाखवितात. सायंकाळी सर्व दिवे उजळून (पेटवून) आरती करावी. आरतीच्या वेळी घरातील विजेचे सर्वच्या सर्व दिवे चालू ठेवा.

बाहेर काळोख, पाऊस, थंड हवा आणि घरात उजळलेले दिवे पाहून खूप प्रसन्न वाटते.

घरातील लहान मुले हे वंशाचे दिवे (मुलगे आणि मुलीसुद्धा) मानले जातात म्हणून त्यांचे औक्षण केले जाते.

या सर्व गोष्टी करतांना तुमची एखादी चूक झाल्यास फार काही बिघडत नाही. देवाला तुमची मनोभावे केलेली भक्ती हवी असते. तुमची चूक झाली तर तो तुम्हाला ठोकून काढीत नाही.

त्यामुळे सण आनंदाने आणि श्रद्धेने साजरा करावा, दडपणाने, भीतीने करू नये. प्रत्येक पूजेमध्ये देवाला, आरती करतांना आपण निरांजनाने ओवाळतो.

‘Dip Amavasya mahatva in Marathi’  पण येथे एक वैशिष्ठय असे की खुद्द निरांजनाचीच आरतीही रचलेली आहे. (खाली ही आरती देत आहे). तसेच पूजा किंवा व्रतानंतर सांगितल्या जाणाऱ्या ‘ कहाण्या ‘हा मराठी वाङ्मयाचा एक आगळावेगळा प्रकार म्हटला पाहिजे.

त्या त्या पूजेला साजेल अशी, त्या व्रताचे महत्व सांगणारी अशी एखादी गोष्ट, अत्यंत बाळबोधपणे या कहाणीमध्ये सांगितलेली असते.

सार्थी संस्था बद्दल संपूर्ण माहिती | Sarthi Sanstha

Deep Amavasya Information 2022:  जाणून घ्या आणि लक्षात ठेवा

“Dip Amavasya Information in Marathi” – जर एखादी स्त्री लिहिता वाचता येणारी असेल तर ती अशी कहाणी वाचून दाखवीत असे. अनेक स्त्रियांना ती कहाणी तोंडपाठ असल्याने, त्यांच्या मधील एखादी स्त्री ती कहाणी सांगत असे.

ही कहाणीही खाली देत आहे. आपल्याकडे दिव्यांच्या संबंधी खूप चांगले श्लोक आहेत, त्यापैकी एक श्लोक खाली देत आहे.

दीपज्योति: परब्रह्म दिपज्योतिर्जनार्दन: । दीपो हरतु मे पापं दीपज्योतिर्नमोस्तु ते ।।

माझी सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या दिवशी आपल्या घरातील दिव्यांची पूजा करून आपली मंगलमय संस्कृती जपूया !

या मांगल्याचा प्रचार करूया !! ज्यांना जमेल त्यांनी, एखाद्या दिव्यासोबत आपले स्वचित्र (selfie) काढून ते एकमेकांना पाठवावे, शुभेच्छा द्याव्यात.

सर्वांना दीप अमावास्येच्या हार्दिक शुभेच्छा ! (हे जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि आपल्या संस्कृतीची अकारण होणारी कुचेष्टा थांबविण्यास हातभार लावावा, ही विनंती)

(हा लेख शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत).

मकरंद करंदीकर.
makarandsk@gmail.com

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top