कोव्हीड-19 या आजारामुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या नजिकच्या नातेवाईकास खात्यात पैसे जमा होण्यास सुरवात | COVID19 relief fund

COVID19 relief fund

COVID19 relief fund :- अधिदान व लेखाधिकारी, मुंबई यांना असे कळविण्याचे मला निदेश आहेत की, वर नमूद दिनांक 26.11.2020 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार, कोव्हीड-१९ या आजारामुळे मृत पावलेल्याव्यक्तींच्या जवळच्या नातेवाईकास रू.५०,०००/- इतके सानुग्रह सहाय्य प्रदान करणे या योजनेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणा कडून मंजूर करण्यात येणाऱ्या ५००० अर्जदा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

रांना रू.५०,०००/- प्रत्येकी याप्रमाणे एकूण रू.२५,००,००,०००/- (पंचवीस कोटी फक्त) इतकी रक्कम मंजूर करण्यात येत आहे.

 COVID19 relief fund

वर नमूद शासन परिपत्रक दिनांक ०८.१२.२०२१ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार अधिदान व लेखाधिकारी कार्यालयास देयक सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी.

देयक मंजूर झाल्यानंतर देयकाची रक्कम ईसीएसव्दारे या योजनेच्या अंमलबजावणीसाठी उघडण्यातआलेल्या खालील तपशीलाच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी.(वेतनेत्तर) (२२४५ ०१५५) या लेखाशीर्षाखाली पुर्नविनियोजनाव्दारे उपलब्ध होणाऱ्या निधीमधून भागविण्यातयावा.

याबाबतचे देयके अधिदान व लेखा कार्यालय, मुंबई यांना सादर करण्याकरिता, लेखाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, आहरण व संवितरण अधिकारी आणि वित्तीय सल्लागार व सह सचिव यांना नियंत्रक, अधिकारी, म्हणून घोषित करण्यात येत आहे.

या योजनेखालील लाभार्थ्यांची संख्या मोठया प्रमाणात असलयाने आणि संगणकीय प्रणालीव्दारे आधार संलग्नीत खात्यामध्ये रक्कम जमा होणार असल्याने देयकासोबत लाभार्थ्यांचा तपशील उपलब्ध करून दिला जाणार नाही. मात्र, प्रत्येक देयकाचे उपयोगिता प्रमाणपत्र महालेखापालांना वर्षाच्या अखेरीस सादर करण्यात येईल.

अर्ज करण्यासाठी खाली दिलेला संपूर्ण व्हिडिओ पहा 👇👇👇

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top