बायोगॅस पुरवठा व दुभत्या जनावरांसाठी अनुदान योजना | Biogas Anudan Yojana Maharashtra

biogas purvatha anudan yojana maharashtramaharshtra

Biogas Anudan Yojana Maharashtra: वनक्षेत्रातील जळावू लाकडाच्या तोडीमुळे वनांवर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सदस्यांना / ग्रामस्थांना सवलतीच्या दराने बायोगॅस / स्वयंपाक गॅस पुरवठा/ दुभत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्षलागवडीचे संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना राबविली जाते.

सदर योजनेच्या अनुषंगाने सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता अनुसूचित जाती उपयोजने अंतर्गत संरक्षित वनाचे लगत क्षेत्रातील गावाचे अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना कुकींग गॅस / बायो गॅस पुरवठा करण्याकरिता रु. 4000 लक्ष इतका नियतव्यय मंजूर व अर्थसंकल्पित केलेला आहे. ‘Biogas Purvatha Anudan Yojana’

या लेखामध्ये बायोगॅस पुरवठा / दुभत्या जनावरांसाठी अनुदान योजना प्रमुख अटी, आवश्यक कागदपत्रे, लाभाचे स्वरूपसंपर्क कुठे साधावा अशी सर्व प्रकारची माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. माहिती आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.

बायोगॅस अनुदान योजना प्रमुख अटी

 1. समितीला वर्ग करण्यात आलेल्या वनक्षेत्रात चराई बंदी व कु-हाडबंदी.
 2. समितीला वर्ग करण्यात आलेल्या वनक्षेत्रातील गवत कापून लिलाव करतील किंवा शेतक-यांना वितरीत करतील.
 3. समितीली वर्ग करण्यात आलेल्या वनक्षेत्राची आगीपासून संरक्षण करण्यासाठी सक्रीयरित्या सहभाग देणारी समिती / मागील वर्षात 2 हेक्टर क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र जळीत झालेले नसावे.
 4. समितीला वर्ग केलेल्या वनक्षेत्रात अतिक्रमण /शिकार / अवैध वृक्षतोडीस प्रतिबंध करण्यात यावा.
 5. गेल्या वर्षात एकही नविन अतिक्रमण झालेले नसावे. (Biogas Anudan Yojana Maharashtra 2021)

Biogas Anudan Yojana Maharashtra Documents

शासकीय योजनांच्या माध्यमातून लाभ / सवलती घेण्याकरिता शासनाने वेळोवेळी ठरवून दिलेली आवश्यक कागदपत्रे 👇👇
उदा.

 • आधार कार्ड
 • मतदार ओळखपत्र
 • रहिवासी दाखला
 • बँकेचे पासबुक Biogas Anudan Yojana Maharashtra

बायोगॅस पुरवठा अनुदान योजना लाभ व संपर्क

 • ज्या कुटुंबांमध्ये पाळीव जनावरे नसल्यामुळे शेण उपलब्ध नाही अशा कुटुंबांना एलपीजी गॅस कनेक्शन दिले जाते.
 • गॅस कनेक्शनसाठी 4090/- रुपये खर्च गृहीत धरला आहे.
 • त्यापैकी लाभार्थ्याने 25% रक्कम तसेच गॅस सिलेंडरची 25% रक्कम गॅस एजन्सीला देणे आवश्यक आहे.
 • उर्वरीत 75% रक्कम तसेच गॅस सिलेंडरची 75% रक्कम शासनाकडून अनुदान लाभार्थ्याच्या नावे संबंधित गॅस एजन्सीला दिली जाते.
 • ज्या कुटुंबात किमान 4 पाळीव गायी किंवा म्हशी असतील, त्यांना शासनाकडून अनुदान तत्वावर 2 घन मी. बायोगॅस बांधून दिले जाते.
 • यात लाभार्थ्याचा 25% सहभाग असून शासनाकडून 75% अनुदान मिळते.
 • किमान 4 भाकड / अनुत्पादक जनावरे विकायला तयार असलेल्या कुटुंबास एक चांगल्या जातीची संकरीत गाय (किंमत 40.000/-) किमतीची व 4 भाकड / अनुत्पादक बैल विकायला तयार असल्यास 2 चांगल्या प्रतीचे बैल (किंमत 35,000/- रुपये) उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडून 50% अनुदान तत्वावर योजना राबविण्यात येते
 • ज्या गावात किमान 50 हेक्टर शासकीय क्षेत्रावर वृक्ष लागवड केली असेल अशा क्षेत्रांना संयुक्त वन व्यवस्थापन समिती त्या क्षेत्रावरील लोकांना रोपांचे संरक्षणाचे काम कुटुंबनिहाय / क्षेत्रनिहाय ठरविण्यात येते.
 • पाच वर्षांपर्यंत रोपांची देखभाल केल्यास व त्यातील 95 % रोपे पाचव्या वर्षाअखेर जिवंत राहिल्यास कुटुंबाला रोपे लागवडीच्या दुसऱ्या वर्षापासून पाचव्या वर्षापर्यंत प्रती महिना प्रती रोप 50 पैसे देण्यात येते.

 

 • या ठिकाणी संपर्क साधावा : समिती ज्या वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कार्यक्षेत्रात येते. (Biogas Purvatha Anudan Yojana in Marathi)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top