10th मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या SC Category च्या विद्यार्थ्यांना 2 Lakh Scholarship | BARTI SC Category Student Scholarship

barti scholarship

Barti SC Category Student Scholarship: अनुसूचित जातीतील दहावीच्या परीक्षेत 90 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक उच्च शिक्षणाची पूर्वतयारी करण्यासाठी अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख रूपयांप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजना’ राबविण्यात येत आहे.

ही योजना MH-CET, NEET, JEE, मेडिकल, इ. सारख्या परीक्षेच्या पूर्व तयारी साठी अनुसूचित जातीतील गुणवंत तसेच आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी असून ज्या विद्यार्थीचे पालक दारिद्र्य रेषेखालील किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000/- पेक्षा कमी आहे व मुख्यता लाभ हा त्याच विद्यार्थ्यांसाठी असेल ज्यांचे पालक असंघटीत क्षेत्रात, कमी पगारावर, कंत्राटी पद्धतीने कामे करतात.

सन- 2022 इयत्ता 10 वी च्या निकालानंतर जाहिरात देऊन विद्यार्थ्यांकडून बार्टी वेबसाईट वर ऑनलाईन अर्ज मागविण्यात येतील तसेच संबंधीत निवड झालेल्या विद्यार्थ्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ”बार्टी” मार्फत प्रपत्र पाठवून कागदपत्रे प्राप्त करून घेण्यात येतील.

 

Barti Scholarship 2022

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने सुरू करण्यात येत असलेल्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आत असणे अनिवार्य असणार आहे. तसेच शासकीय सेवेत नोकरीला असणाऱ्या पालकांच्या पाल्यांना ही योजना लागू असणार नाही.

उत्पन्नाचा व जातीचा प्रमाणित दाखला देणे अनिवार्य असणार आहे. विशेष म्हणजे या योजनेमधील लाभार्थी संख्या अमर्यादित असणार आहे! अशी माहिती बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे. ‘Barti SC Category Student Scholarship’

 

आवश्यक कागदपत्रे

१. अर्जाचा नमुना

२. विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ. 10) चे मार्कशीट (शाक्षांकित प्रत)

३. विद्यार्थ्याचा SSC बोर्ड (इ. 10) चे शाळा सोडल्याचा दाखला (शाक्षांकित प्रत)

४. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्याचा /वडीलांचा जातीचा दाखला (शाक्षांकित प्रत)

५. सन 2020-21 या आर्थिक वर्षाचा तहसीलदार तथा सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला विद्यार्थ्यांच्या पालकांचा/ आई-वडील यांचा उत्पन्नाचा दाखला (मूळ प्रत)

६. विद्यार्थ्याचा रहिवासी दाखला (शाक्षांकित प्रत)

७. विद्यार्थ्याचे राष्ट्रीयकृत बँक खाते झेरॉक्स प्रत (शाक्षांकित प्रत)

८. आई-वडील/ पालकांचे विहित नमुन्यातील स्व घोषणापत्र

९. विहित नमुन्यातील मुख्याध्यापकांचे प्रमाणपत्र किंवा शिफारस पत्र

१०. कुटुंबाचे पिवळे रेशनकार्ड (असल्यास प्राधान्य) Barti Scholarship 2022 for 10th Pass

नियम व अटी शर्ती

• या योजनेचा लाभ हा शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षापासून पुढील वर्षाकरीता लागू राहील.

• विद्यार्थी महाराष्ट्र राज्यातील रहिवासी तसेच अनुसूचित जातीतील प्रवर्गातील असणे अनिवार्य.

• सदर प्रोत्साहनपर पुरस्कार शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थीचे आई-वडील/ पालक दारिय रेषेखालील असणे किंवा त्यांचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2,50,000 /-(अक्षरी दोन लाख पन्नास हजार रुपये) पर्यंत असणे बंधनकारक आहे .

• सदर योजनेचा लाभ हा विद्यार्थ्यांनी पुढील व्यावसायिक शिक्षणाची (MH-CET/ NEET/ JEE इत्यादी) पूर्व तयारी करणे करिता देण्यात येत असल्याने विद्यार्थ्याने इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणे आवश्यक आहे. पदविका अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही.

• योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु. 50,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.

• योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील, त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये होणाऱ्या सहामाही/ वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून)

• पालकांचा उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रक,जातीचा दाखला इ. पुराव्यांची आवश्यकता वाटल्यास चौकशी केली जाईल.

• अर्जामध्ये खोटे, बनावट, दिशाभूल करणारे पुरावे /कागदपत्रे सादर केल्यास विद्यार्थ्यास सदर योजनेकरिता अपात्र ठरविण्यात येईल व योजनेचा लाभ दिला असल्यास सदर लाभ वसूल करण्यात येईल.

• भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर विशेष अनुदान योजनेसाठी च्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास नियामक मंडळ, बाटी, पुणे यांच्या सल्ल्याने महासंचालक, याांना याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार असेल. Barti Scholarship 2022

 

Barti Scholarship 2022 Application Form

 1. सदर योजनेकरिता पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील 10 वी मध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त करणाऱ्या गुणवत विद्यार्थी/ विद्यार्थ्यांचे पालक याचेकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.
 2. सदर योजनेकरिता अर्जाचा नमुना व योजनेची माहिती बार्टी कार्यालयाच्या संकेतस्थळावर PDF स्वरुपात तसेच सदर अर्जाचा नमुना व योजनेबाबतची माहिती सहा. आयुक्त समाज कल्याण व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात देखील उपलब्ध आहे.
 3. बार्टी संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना Download करून अर्जदार विद्यार्थी/ पालक यांनी भरून सदर अर्ज हा बार्टी मुख्य कार्यालयास खालील पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने पाठवावा, (कार्यालयाचा पत्ता- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, 28, राणीचा बाग पुणे- 411001)
 4. अर्जासोबत आई-वडील/ पालकांनी द्यावयाचे स्व घोषणापत्र व मुख्याध्यापक यांनी द्यावयाचे शिफारस पत्र सादर करणे अनिवार्य आहे.
 5. स्वयं घोषणापत्र साध्या कागदावर विद्यार्थ्यांचे वडील यांनी सादर करावे.वडील हयात नसल्यास आईने सादर करावे. आई-वडील ह्यात नसल्यास विद्यार्थ्यच्या पालकांनी सादर करावे.
 6. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे/ पुरावे उदा, गुणपत्रक, शाळा सोडण्याचा दाखला, रहिवासी दाखला, जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला इ. कागदपत्रांच्या वाचनीय छायांकित (झेरॉक्स) प्रती साक्षांकीत करून सोबत जोडाव्यात.
 7. योजने अंतर्गत प्राप्त अजांची छाननी बार्टी कार्यालय स्तरावरुन करण्यात येईल.
 8. योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल व पुढीलप्रमाणे योजनेचा लाभ देण्यात येईल.

अ) योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांची निवड झाल्यानंतर त्यांना प्रथम हप्ता रु. 50,000/- इतकी रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर RTGS द्वारे जमा करण्यात येईल.

आ) योजनेतील उर्वरित तीन हप्ते सहा महिन्याचा कालावधी नुसार देण्यात येतील ,त्याकरीता निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये होणाऱ्या सहामाही/ वार्षिक परीक्षेत किमान 75% गुण मिळविणे आवश्यक आहे. (भाषा विषयांचे गुण वगळून) Barti Scholarship 2022

FORM DOWNLOAD - CLICK HERE

विद्यार्थ्यांना किती रुपये स्कॉलरशिप मिळेल?

अकरावी व बारावी या दोन वर्षात प्रत्येकी एक लाख रूपयांप्रमाणे एकूण दोन लाख रुपयांची स्कॉलरशिप मिळेल.

बार्टी स्कॉलरशिप साठी कोण फॉर्म भरू शकतो?

१० वी पास विद्यार्थी अर्ज करू शकतात.

24 thoughts on “10th मध्ये 90% पेक्षा जास्त मार्क्स मिळालेल्या SC Category च्या विद्यार्थ्यांना 2 Lakh Scholarship | BARTI SC Category Student Scholarship”

 1. Nitin mahamuninitinmahsmuni

  My son has got 92.40%marks on ssc exam2022 ..
  Please say last date og apply
  And how to apply…means
  By post…
  Sy hand…
  OR
  Online…please reply soon lam waitimg…

 2. I have also not got the scholarship though eligible for the scholarship. Barti scholarship is given to someone or it was just a news . I have filled the documents and l had got a call from barti stating that l am selected for the scholarship but the amount is not received yet .lf you can help by contacting barti then plz do the needful as soon as possible.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top