आपले सरकार महा ई सेवा केंद्र अर्ज सुरू, आता अटी शर्ती मध्ये बदल

aaple sarkar seva kendra registration

सोलापूर: उपरोक्त विषयास अनुसरुन कळविणेत येते की, सोलापूर जिल्ह्यातील CSC केंद्रधारकांना माहिती व तंत्रज्ञान विभाग (साप्रवि) यांचेकडील दि. 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेकामी स्थानिक वृत्तपत्रामध्ये जाहिरनामा प्रसिध्द करुन विहित नमुन्यात अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.

त्यानुसार जाहिरनाम्याचा मसुदा यासोबत जोडून आपले कार्यालयाकडे पाठविणेत येत आहे. तरी सदरचा जाहिरनामा दि. 28.10.2021 रोजीच्या योग्य त्या वर्गीकृत वृत्तपत्रामध्ये प्रसिध्द करुन त्याबाबतचे देयक जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावेत. (aaple sarkar seva kendra registration form)

आपले सरकार सेवा केंद्र अर्ज सुरू जाहिरात

माहिती व तंत्रज्ञान विभाग (सा.प्र.वि.) यांचेकडिल दिनांक-19 जानेवारी 2018 रोजीचे शासन निर्णयान्वये CSC केंद्र धारकांना आपले सरकार सेवा केंद्राचा दर्जा देणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील CSC केंद्र धारकांना व त्या भौगोलिक क्षेत्रात राहणारा कोणताही व्यक्ती ज्यांचे केंद्र सुरू नसेल परंतू जो CSC-SPV चे केंद्र मिळण्यासाठी विहीत केलेल्या अटी व शर्ती पूर्ण करीत असेल अशा व्यक्तींना सुचित करणेत येते की, सदरचा जाहिरनामा, अर्जाचा विहित नमूना, अटी व शर्तीबाबतची माहिती तसेच शहरी/ ग्रामीण भागाकरिता 200 रिक्त ठिकाणांची यादी https://solapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तरी सदर संकेतस्थळावरून अर्जाचा विहित नमुना डाउनलोड करून त्यावरील परिपूर्ण माहिती भरुन खालील नमूद तारखेपर्यंत अर्ज सादर करावेत.

अर्ज स्विकारण्याचा कालावधी – दि. 29.10.2021 ते दिनांक- 10.11.2021 कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)

उपरोक्त आपले सरकार सेवा केंद्रांकरिता अर्ज सेतू संकलन, महसूल शाखा जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत मूळ अर्ज व प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती दिनांक- 10.11.2021 सायं 5.00 वाजेपर्यंत समक्ष सादर करावेत. उशिरा प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार कोणत्याही परिस्थितीत केला जाणार नाही. तसेच csc
केंद्रधारकांना B2C व्यवहारांच्या संख्येनुसार प्राधान्य राहिल याची नोंद घ्यावी.

महा ई सेवा केंद्र अर्ज अटी व शर्ती

  1.  उमेदवार हा किमान पदवीधर असणे आवश्यक आहे.
  2. उमेदवारांकडे संगणक ज्ञानाबाबत (MS-CIT/CCC)प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  3.  स्थानिक उमेदवाराला प्राधान्य राहिल. (आधार पुरावा जोडणे आवश्यक आहे)
  4. CSC ID व अस्तित्वात असणाऱ्या B2C सेवा देणाऱ्या केंद्रचालकांनी अर्ज केल्यास त्यांचा प्राधान्याने विचार केला जाईल.
  5. एका केंद्राकरिता एकापेक्षा अधिक csc- ID असणाऱ्या केंद्र चालकांनी अर्ज केल्यास केंद्राच्या उलाढाली । व्यवहारांची अधिक संख्या असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  6. महानगरपालिका/नगरपालिका/ग्रामपंचायतीचे ना-हरकत प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे
  7. उमेदवार हा गुंतवणूकीच्या दृष्टीकोनातून सक्षम असला पाहिजे
  8. उमेदवाराने संगणक साहित्य व इतर अनुषंगिक साहित्य व जागा उपलब्धतेबाबत अर्जासोबत योग्य तो तपशिल जोडणे आवश्यक आहे.
  9. महाराष्ट्र शासनाने प्रसिध्द केलेल्या आपले सरकार सेवा केंद्राबाबतचा दि. 19 जानेवारी 2018 रोजीच्या शासन निर्णयातील तरतूदींना अधिन राहून केंद्राची नियुक्ती व कार्यान्वीत केल्या जाईल. तसेच केंद्रचालकांना अटी व शर्तीचे पालन करावे लागेल.
  10. शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार केंद्र चालू ठेवणे, शासनाने ठरवून दिलेले दर पत्रक केंद्रावर प्रसिध्द करणे, तसेच ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे, शासनाने पुरविलेल्या आज्ञावली इ.चे योग्य वापर, संरक्षण व जतन करणे केंद्रचालकांना बंधनकारक राहिल.

अधिक माहितीसाठी 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: अहो थांबा, अस कॉपी नाही करायचं तर शेअर करायचं असत !!
Scroll to Top