जनता कर्फ्यू (२२ मार्च 2020) | #JanataCurfew in Marathi

If you like Janata Curfew in Marathi then this the right place for Janata Curfew information in Marathi and Janata Curfew Meaning Marathi. जर आपणास जनता कर्फ्यू मराठीत माहिती हवी असेल तर जनता कर्फ्यू माहिती आणि जनता कर्फ्यू म्हणजे काय आपण मराठी मध्ये येथे पाहणार आहे.  Janata Curfew in Marathi


  आपल्या देशाला संबोधित करताना आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत भरातील लोकांना एक सर्वात महत्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी सर्व देशवासीयांना रविवारी, 22 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 या वेळेत "जनता कर्फ्यू" चे अनुसरण करण्याचे आवाहन केले.

  रविवार २२ मार्च च्या एक दिवसीय जनता कर्फ्यूने काय होणार? #JanataCurfew 

  एक दिवसीय कर्फ्यूचा उद्देश जाणूया. कोरोना विषाणूचे आयुष्य काही पृष्ठभागांवर १२ तासांपेक्षा कमी आहे आणि जनता कर्फ्यू १४ तासाचा, म्हणजे या १४ तासांमध्ये ज्या ज्या सार्वजनिक ठिकाणी कॅरोना चे विषाणू आहेत अशा ठिकाणी किंवा पॉईंट्सना नक्कीच स्पर्श केला जाणार नाही व आपोआप ही साखळी तुटण्यास मदत होईल.

  बरेचजण आॅफिसवरून शनिवारी रात्री घरी पोहोचल्यावर बाहेर पडणार नाहीत असे गृहीत धरूया. रविवार सकाळपासून जनता कर्फ्यू रात्री 9 वाजेपर्यंत लागू होईल. रविवारी रात्री 9 नंतर कर्फ्यू संपला तरी बहुसंख्य जनता घरातून बाहेर पडणार नाही असे गृहीत धरायला हरकत नाही.

  म्हणजे तसं पाहिलं तर शनिवार रात्रीचे 9 पासून जास्तीत जास्त लोक *24 तास* + *रविवार रात्री 9 पासून सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत *10 तास* *= 34 तास* *घरात असतील. (इथे गृहीत धरले आहे की सोमवारी सकाळी 7 वाजता व्यक्ती कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडली आहे.)

  14 तासाच्या (किंवा वरीलप्रमाणे पाहिलं तर 34 तासांच्या) जनता कर्फ्युमुळे आपण स्वतःला व आपल्या परिवाराला या महाविषाणूपासून सुरक्षित करण्याचा चांगला प्रयत्न करीत आहोत.

  प्रत्येक विषाणूला जिवंत राहण्यासाठी HOST लागतो. इथे HOST म्हणजे मानवी शरीर असे म्हणूया. तर जनता कर्फ्यूमुळे HOST न मिळाल्याने विषाणूंच्या फैलावास अटकाव होईल. यालाच म्हणतात...

  म्हणून प्रत्येकाने जनता कर्फ्यू मध्ये सामील होऊन स्वतःला, आपल्या परिवाराला व आपल्या शेजार्‍यांना आणि आपल्या देशवासीयांना सुरक्षित करायचे आहे.

  जर आत्ता हे झाले नाही तर मग भविष्यातील LOCK DOWN सारख्या इतर कडक उपायांना सामोरे जाण्यापासून दुसरा पर्याय शिल्लक नाही. (सध्या ईटली व स्पेन या दोन देशात LOCK DOWN सारखी स्थिती आहे.)

  चला तर मग, आपण प्रामाणिक प्रयत्न करुया. तोडूया ही साखळी.

  #JanataCurfew

  Janata Curfew Meaning Marathi


  भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींनी 22 मार्च रोजी लोकांना घराबाहेर न जाण्याचे आवाहन केले. युवक, नागरी संस्था आणि इतर संघटनांचे नेतृत्व असलेल्या NCC and NSS सारख्या राज्य सरकारांनी, नागरिकांना 'Janata Curfew' चे पालन करण्यास आणि त्यांना घरात रहाण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


   Janata Curfew information in Marathi


  पंतप्रधान श्री. नरेद्र मोदींनी सर्व नागरिकांना airlines कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, जे लोक जेवणाचे डबे पोहचवतात, रेल्वे, बस किंवा ऑटोरिक्षा चालविनारे, सरकारी अधिकारी, पोलिस आणि मीडियाद्वारे देण्यात आलेल्या सेवांचे कौतुक करावे अशी विनंती केली.


  त्यांना ‘राष्ट्ररक्षक’  म्हणून संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देश आपल्या सेवांसाठी आहे.
  पंतप्रधानांनी नागरिकांना 22 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजता बाल्कनीमध्ये उभे राहून अशा लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाच मिनिटे टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले.


  पंतप्रधान मोदींनी प्रत्येकाला दररोज किमान 10 लोकांना कॉल करून ‘जनता कर्फ्यू’ तसेच कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उपाययोजनां विषयी माहिती देण्याचे आवाहन केले.

  टिप्पणी पोस्ट करा

  0 टिप्पण्या