Page 1 of 1

लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 30 Oct 2010 10:21
by vibhawari
लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुष्कळ आहे
ते दिशाहीन करण्यासाठी,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!
किती सराव करावा लागतो
विजयश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!
कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य एक कोडं आहे हे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जीवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""


"संकलित"

Re: लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 31 Oct 2010 12:48
by adwaitk007
वाह! मस्त! कोणाची आहे माहित आहे का?

Re: लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 01 Nov 2010 09:26
by vibhawari
नाही रे अद्वैत माहित नाही कोणाची आहे,,,
पण इथे share करावीशी वाटली

Re: लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 04 Nov 2010 23:39
by adwaitk007
ओह! काही हरकत नाही! बाकी कविता खरच खुप छान आहे!

Re: लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 30 Apr 2012 16:21
by kumarjadhav
फारच छान....

Re: लाख क्षण अपूरे पडतात

Posted: 30 Jul 2016 15:01
by msbharati
Khup chan ............kavita