लॅपटॉप घेऊ कि नेटबुक

येथे कंप्युटर/लॅपटॉप/नेटबुक/iPad/टॅबलेट PC इत्यादींवर चर्चा आपेक्षित आहे.
kedarlasane
Rgistered member
Rgistered member
Posts: 17
Joined: 03 Dec 2010 22:01
नाव: केदार
आडनाव: लसणे
Contact:

लॅपटॉप घेऊ कि नेटबुक

Postby kedarlasane » 17 Dec 2011 17:04

Image

मस्कार मित्रांनो,
आज आपण नेटबुक विषयी माहिती मिळवणार आहोत.नेटबुक म्हणजे छोटा लॅपटॉप कि जो लाईटवेट म्हणजे कमी वजनाचा असतो.साधारणता त्याच्या असणाऱ्या कमी वजनामुळे आणि किमतीमुळे दिवसेंदिवस नेटबुक लोकप्रिय होत चालले आहे.याचे मुख्य वैशिष्ट म्हणजे सर्वसाधारण संगणकात असलेल्या सर्व सुविधा यात तुम्हाला मिळतात.अपवाद म्हणजे नेटबुकला ऑप्टीकल ड्राईव्ह नसतो.तुम्ही त्यात सीडी किंवा डीवीडी टाकू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला बाहेरील ऑप्टीकल ड्राईव्ह लागेल जो कि तुम्ही युयसबी पोर्ट वापरून जोडू शकता.या सोबत तुम्हाला ओरिजनल विंडोज ७ हि बेसिक ऑपरेटिंग सिस्टम मिळते.किंवा तुम्ही मुक्त प्रणालीतील उबुंटू ही अतिशय उत्तम अशी ऑपरेटिंग सिस्टम तुमच्या नेटबुकमध्ये वापरू शकता.काही नेटबुक हे अतिशय कॉम्पॅक्ट असतात जी कि तुमच्या पर्समध्ये सुद्धा मावू शकतात.
चला तर मग नेटबुकची फायदे पाहुयात
१)कमी वजन (साधारण १ किलो)
२)जास्त काळ बॅटरी बॅकअप (अंदाजे ९ तास)
३)१ वर्ष वॉरंटी
४)जास्त वेग(२ जीबी रॅम)
५)इंटेलचा अॅटोम प्रोसेसर/ amd प्रोसेसर
६)विंडोज ७ ऑपरेटिंग सिस्टम सहित
७)किंमत १५००० ते २८००० दरम्यान

नेटबुक कुणी घ्यावा?

१)घरगुती वापरासाठी
२)फक्त नेट सर्फिंग करणाऱ्यासाठी
३)विद्यार्थी

लॅपटॉप विरूद्ध नेटबुक ठळक मुद्दे :
Image

काही नेटबुक्स :
Image

तेव्हा लॅपटॉप घेताना एकदा विचार करा कि आपल्याला नक्की त्याची गरज आहे का? नाहीतर आपला नेटबुक घेतलेला बरा! २०००० पर्यंत डेल किंवा एचपी कंपनीचा चांगला नेटबुक मिळतो.आणि बाह्य ऑप्टीकल ड्राईव्ह ट्रान्ससेंड कंपनीचा १५०० पर्यंत मिळतो. ओपेनसोर्स ऑपरेटिंग सिस्टम उबुंटू http://www.ubuntu.org वरून मोफत डाउनलोड करता येईल .
काही अडचण असल्यास कमेंट द्या.


कळावे ,
केदार लसणे.
www.tuljabhavani.in
rishika08
Rgistered member
Rgistered member
Posts: 14
Joined: 29 Nov 2016 12:44
नाव: Pallavi
आडनाव: Deshmukh
Contact:

Re: लॅपटॉप घेऊ कि नेटबुक

Postby rishika08 » 09 Jan 2017 16:32

अतिशय उपयुक्त माहिती पुरवल्या बद्दल आपले आभार. खरोखरीच आपला वापर लक्षात घेऊन लॅपटॉप घ्याचा कि नेटबुक याचा निर्णय घेतला पाहिजे. पण एक शंका होती, नेटबुक चा बॅटरी बॅकअप लॅपटॉप पेक्षा जास्त का असतो?


Return to “कंप्युटर/लॅपटॉप/नेटबुक/iPad/टॅबलेट PC”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1781
Total topics 1432
Total members 629
Our newest member Rashmi102
No birthdays today