होळी-धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

येथे सर्वप्रकारच्या शुभेच्छा दिल्या जातिल!
admin
Site Admin
Site Admin
Posts: 502
Joined: 01 Mar 2010 22:11
नाव: marathi
आडनाव: corner

होळी-धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Postby admin » 19 Mar 2011 23:43

मराठी कॉर्नरच्या सर्व सभासदांना होळी-धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!


धन्यवाद!
मराठी कॉर्नर टिम.
arvind
Rgistered member
Rgistered member
Posts: 9
Joined: 17 Nov 2010 17:36
नाव: Arvind
आडनाव: Khanolkar

Re: होळी-धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Postby arvind » 21 Mar 2011 10:55

होळीच्या लाकडांसाठी दाही दिशा
एकदा महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षांच्या सेवकांची जमली टोळी
सर्व म्हणाले, "आपण करूया ह्यावेळी एकच मोठी होळी."

मार्गदर्शनासाठी ते प्रथम गेले राजकडे आणि म्हणाले,
"जुनी झाडे नाहीत, पालापाचोळा नाही, सर्वत्र प्लेस्टीक
आता मोठ्या होळीत जाळायला काही उरलच नाही,
तेंव्हा आम्ही भैयांच्या टप-य़ा जाळू का होळीत?"
राजसाहेब म्हणाले, "अरे ते फ़क्त बोलण्यापुरत असत,
त्यांचा आपल्याला मत मिळवायल उपयोग होतो.
त्यापेक्षा तुम्ही अस करा, उध्दवकडे जा
त्याच्या उरलेल्या पुस्तकांचे गठ्ठे घ्या जाळायला."

लगेच सारी मंडळी उध्दवच्या घराकडे वळली
"छोटे साहेब, आजकाल मराठी कोणी वाचत नाही
मुल ईंग्रजी शाळेत शिकतात, तेंव्हा तुम्ही हो म्हणा,
आम्ही सर्व मराठी वाचनालय आणि घराघरात
पडलेल्या पुस्तकांची लावतो भली थोरली होळी"
उध्दवसाहेब म्हणाले, "अरे तुम्हाला काय शिवसेना
बंद करायची आहे की काय? त्यापेक्षा तुम्ही
अशोकरावांच्याकडे जा, ते सुचवतील आदर्श मार्ग".

सर्वजण उत्साहाने अशोक चव्हाणांकडे धावले,
त्याना म्हणाले, "साहेब होळीत काय जाळायच?
आदर्श ईमारत नाहीतरी पाडणारच आहेत,
तेंव्हा त्याच्या दरवाजे, खिडक्या काढून जाळू का?"
अशोकराव म्हणाले, "मला आणखी घोटाळ्यात नका पाडू.
त्यापेक्षा अस करा, आदर्शशी संबधित सर्व फायली
गोळा करा चोरून मारून, आणि होवून जाऊद्या होळी."

सर्व कार्यकर्ते तात्काळ आर. आर. साहेबकडे पळाले,
"आबा, होळी कशी करायची? आम्ही सगळ्या
घोटाळ्यांच्या सगळ्या फायली सीबीआयकडून पळवू?
नाहीतरी सीबीआय चौकशीतून काही हाती लागतच नाही."
आबा म्हणाले, "अरे, माणसं गेली तर "ऐसी छोटी छोटी
घटना होतीही है म्हणून सुटता येत, पण ह्या
फायली गेल्या तर माझी सोन्यासारखी नोकरी जाईल
त्यापेक्षा अजितदादांकडे जावा, शेतक-यांसाठी खूप स्कीम्स आहेत.

कार्यकर्ते दादाकडे गेले, दादाना ते येणार हे आधीच
कळालेल होत. ते दिल्लीला निघून गेले होते.
त्यानी दरवाजावर बोर्ड लावून ठेवला होता
होळीशी शेतक-य़ांचा काहीही संबंध नाही
आत्महत्या करताना देखील शेतकरी गळ्फासच
पसंत करतात. तेंव्हा होळीसाठी मदत हवी
असल्यास मुख्य्मंन्त्र्याना भेटायला जावे.
ते दिल्लीत ब-याच गोष्टी शिकून आलेले आहेत.

कार्यकर्ते निराश होवून मुख्यमंत्र्याकडे निघाले
मुख्यमंत्री राष्ट्र्गीत पाठ करण्यात मग्न होते
प्रथम त्याना प्रश्न कळलाच नाही, त्याना आठवत होती
दिल्लीची होळी, रंगांची ऊधळण असणारी, जाळपोळ
त्याना नवी होती. मग सावरून ते म्हणाले,
"ते सर्व वाढदिवसांच्या शुभेच्छांचे फलक जाळा."
ते केव्हांच काढले, अस सांगताच ते म्हणाले,
"गडक-यांकडे जा, महागाईवर तेच जाळपोळ करताहेत."

कार्यकर्ते नाईलाजाने गडक-याकडे आले, म्हणाले,
"भाऊसाहेब, स्विस ब्यांकेच्या नोटा आणणार ना?
त्या मिळतील का आम्हाला होळीत जाळायला?"
गडकरी खदखदून हसले, मग गदगदून हसले,
म्हणाले, "किती भोळेपणा हा? अरे, सरकारला
अडचणीचा विषय म्हणून आम्ही तो लावून धरतो.
परदेशी गेलेल्या नोटा आणि माणस कधी परत येतात?
तुम्ही पवारांच्याकडे जा, तिथे तुम्हाला जाळण्यासाठी
स्टंप्स, ब्याटी आणि चेंडू तरी मिळतील."

सोक्षमोक्ष लावण्याच्या निर्धाराने कार्यकर्ते पवारांकडे आले,
"साहेब सर्वांनी निराशा केली. आता तुमच्यावरच आमची भिस्त.
नाहीतरी क्रीकेटमधे आपली टीम लडखडतेय तिला नाही शिस्त.
तेव्हां तेवढ्या स्टंप्स, ब्याटी वगैरे होळीसाठी मिळतील का?"
पवारांनी विचार करून सांगितले, "अरे बाबानो, क्रीकेटमुळेच
अखिल भारतीय पक्ष म्हणवता येत आणि चार पैसे मिळतात.
तुम्ही अस करा मी पंतप्रधान होईन ह्या आशेने एक चंदनाचे
सिंहासन बनवले होते, तेच नेता का? होळी सुगंधित होईल.

जास्तच निराश कार्यकर्ते शेवटी एका साधुकडे पोचले
म्हणाले, "महाराज, झाडे नाहीत, लाकडे नाहीत
गुरं नाहीत, गोव-या नाहीत, तेल तूप महाग,
आहे फक्त प्लास्टीक, होळीत जाळायच काय?
राजकारण्यांनी खूप निराशा केली, आता ऊपाय?"
गुरुजींनी स्मित केल आणि म्हणाले आत पहा,
"क्रोधाचे ओंड्के, द्वेषाच्या काठ्या, मत्सराच्या मोळ्या
आणि परनिंदेचा पाचोळा, खूप काही सापडेल तुम्हाला
आणि त्याची होळी करायला पुरे आहे एक उदबत्ती, धगधगती".

अरविंद खानोलकर


Return to “शुभेच्छा विभाग”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1829
Total topics 1437
Total members 646
Our newest member maxrox
No birthdays today