वसुधालय... माझे साहस!

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
vasudhalaya
Posts: 2
Joined: 28 Nov 2010 22:23
नाव: vasudha
आडनाव: vschiv

वसुधालय... माझे साहस!

Postby vasudhalaya » 08 Mar 2011 07:32

लेखमाला स्पर्धेसाठी लेख पाठवायचा मनाने घेतलं. काय लिहू असा प्रश्न पडला. म्हटले, मराठी कॉर्नर ची ओळख "वसुधालय" नावाचा ब्लॉग सुरु केल्याने झाली मग म्हटले कि माझ्या ब्लॉग च्या अनुभवाबद्धल च लिहावे.

आता ६८ वर्ष्यांचे आयुष्य मागे झाले. शाळा झाली, लग्न, मुले झाली, घर सांभाळले. १० महिन्यांपूर्वी मला कोम्पूटर दिला. मी नको असतानाच मन मारून घेतला. एक आठवड्यात मला कोम्पूटर सुरु कसा करायचा, कीबोर्ड, माउस कसा वापरायचा वगेरे शिकवले. वाटले घरात आणखीन पसारा झाला, उगीचच कोम्पूटर आणून ठेवलाय. हळूहळू मला कोम्पूटरवर फोन करायला शिकवले. मग थोडी मज्या वाटू लागली. जेव्हा पाहिजे तेव्हा फोन वर बोलू व बघूही शकलो. नंतर मला इमेल शिक म्हणाले. परत मी नको म्हंटले. म्हंटले मला कुठे इंग्लिश मध्ये इमेल लिहिता येणार आहे. तरीही मुलांनी माझ्या नावे एक इमेल उघडले. हळूहळू कीबोर्ड वापरायला शिकले. घरातलीच काही इंग्लिश पुस्तके घेऊन त्यातून कोम्पूटरवर इंग्लिश लिहायचा प्रयत्न केला. नंतर मी त्यांना इंग्लिश पुस्तकातली माहिती इमेल करू लागले व त्यांच्या उत्तराची वर बघत असे. उत्तर आल्या वर अगदी छान वाटत असे.

मग मुलं व माझा भाऊ म्हणाला कि मराठीतून लिही. आणखीन धसका वाटला. आताशा कुठे इंग्लिश लिहायला शिकले. आता मराठीतून कशे लिहू? ते सुध्धा इंग्लिश कीबोर्ड वापरून. पण भाऊ व मुलांनी गुगल ट्रान्सलीतरेषण वर मराठी लिहायला शिकवले. आता मी मराठीतून इमेल लिहू लागले. इतकी माहिती गोळा केली व इमेल पाठवली कि मुलं म्हणाली की एक ब्लोग सुरु कर. आता ब्लोग ला इमेल पाठविले की सरळ ती माहिती प्रसिद्ध होते. इतकी छान सोय झाली आहे. प्रयत्न करते कि रोज एक ब्लोग पोष्ट तरी प्रसिद्ध करावे. ब्लोग लिहिण्याचा, थोडेफार साधेसुधे चार शब्द ब्लॉग वर लिहिण्याचा हा प्रयास, ह्यामध्ये माझ्या लहानपणीची एक गोष्ट १९ फेब्रुवारीला लिहिली होती, ती खाली दिली आहे.

आम्ही पूर्वी हैद्राबादला एकत्र सर्वजण राहत होतो. मी सरकारी शाळेत सातवीतं शिकत होते. मुलींची शाळा होती. शाळेच गॅदारिंग होत. शाळेच्या बाईंनी मला शाळा सुटल्यावर थांबायला सांगितले मी पहिल्यांदा घाबरले पण थांबले. शाळेच्या छोट्या मैदानात सर्व बाई ऊभ्या होत्या. माझं राहणं पाहून ही मुलगी शिवाजी च काम करण्यास ठीक दिसते. असं त्यांच्यात बोलण झाल. मला काहिच कळलं नाही माझ्या कडून शिवाजी सारखी तयारी करून घेतली. मी घरी सौ. वहिनी (आई ) ला सांगितले. हॉलं मध्ये वेळेवर गेले. मेकप शिवाजी चे पोशाख केला. स्टेज वर मी व ईतर सर्वजण होते. हॉलं मध्ये कलेक्टर ईतर बरीच मोठी मोठे उच्च लोक होते. माझं काम चांगलं झाल. सर्वांनी टाळ्या वाजविल्या. सौ. वहिनी (आई) पण होती.

त्यावेळा मी लहान काळी सावळी खूपच सरळं नाकं होतं एकदम शिवाजी च दिसले. मेकप पण चांगला झाला होता. मला आजही मी शिवाजी च काम केल्याचं आठवतं. घरी जाताना मेकप खूपं पुसायचा प्रयत्न केला होता. कोणी काही म्हणेल का म्हणून त्यावेळा अशी काम आवडतं नसतं. पण आज मला खूपच छान वाटतं आहे. नाकं खूपच सरळं असल्या मूळे त्याचा उपयोग चांगला झाला.

आणखीन एक वैयेक्तिक गोष्ट ८ नोवेंबर ला लिहिली होती. ती पिसावर गावाची. पिसावर म्हणजे कन्नड तालुक्यातलं गावं. माझ्या आईचं आजोळ. मामा मामी त्यांची नातवंड. माझे पणं मामा मामी लागतं असतं. आईच्या मामी न माझं माझ्या लहान पणी माझं नाकं टोचलं. मी चमकी किंवा नथ घातली की मला आईच्या मामीची आठवणं येते. आईच्या मामा मामीचा मोठ्ठा वाडा होता. वाड्यात डाळींबाच झाडं असे. इतरही झाडं होती. जुनी पण मोट्टी घर वाडा. एका खोलीत धान्याचां कोठार असे. धान्यं ठेवण्या करता मातीचे मातीतंच रोवलेले रांजन (कणग्या) भरपूर असतं. त्या सर्वांना रांजनवाडी म्हणतं असे. आताही कांही ठिकाणी रांजनवाडी आहेत. नागापूर माझं माहेरं तेथे पण असचं असे.
माझी आजी सर्व बघतं असे. नागापूर येथे आंबा गहू होतं असे त्यामुळे घरातचं शेती होती. माझी आजी बैलाची पूजा करतं असतं. आता मी मातीचे बैल मिळतात त्याची बैलाची पूजा करते

Image

ऑक्टोबर २०१० मध्ये सुरु केलेल्या ह्या ब्लॉगला ४३०० च्या वर भेटी झाल्या आहेत. असा लोकांचा प्रतिसाद बघून अगदी छान वाटते. आपण जेंव्हा वेळ मिळेल तसा माझा ब्लॉग जरूर बघावा अशी इच्छा. माझ्या ब्लोगचा पत्ता आहे - http://vasudhalaya.wordpress.com/

लेखक: वसुधा चिवटे
८ मार्च, २०११
Last edited by vasudhalaya on 08 Mar 2011 09:20, edited 2 times in total.


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: वसुधालय... माझे साहस!

Postby adwaitk007 » 08 Mar 2011 08:32

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
vasudhalaya
Posts: 2
Joined: 28 Nov 2010 22:23
नाव: vasudha
आडनाव: vschiv

Re: वसुधालय... माझे साहस!

Postby vasudhalaya » 08 Mar 2011 09:17

लेखाच्या शेवटी नाव आता लिहिले आहे. धन्यवाद.


आपली मराठी
Rgistered member
Rgistered member
Posts: 59
Joined: 17 Nov 2010 20:06
नाव: अमोल
आडनाव: देशमुख

Re: वसुधालय... माझे साहस!

Postby आपली मराठी » 11 Mar 2011 22:47

वयाच्या ६८ व्या वर्षी हा प्रयोग वा ! आपल्याला मनापासुन सलाम. आपल काम कौतुकास्पद आहे आणि नम्रतेन सांगतो की आम्ही अजुन चाळीसीही गाठलेली नाही तरी आपल्याईतकी उमेद आमच्यामध्येही नाही, आपल्यापेक्षा लहान असुनसुध्दा आपले मनापासुन अभिनंदन करण्याचे धाडस करतो.


pallavi kulkarni
Site Admin
Site Admin
Posts: 38
Joined: 18 Oct 2010 12:06

Re: वसुधालय... माझे साहस!

Postby pallavi kulkarni » 13 Mar 2011 17:52

वसुधा ताई..अभिनंदन! चांगले लिहिता आहात....अभिनंदन घरच्या लोकंचे ज्यानी तुम्हाला ही नवीन माहिती दिली..नव्या जगाची ओळख करुन दिली..
छान लिहिले आहे.


सौ.पल्लवी

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today