२७ फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा होतो ह्या निमित्ताने प्रत्येक मराठी माणसाला एक दिवस का होईना मराठीची आठवण होते हेही नसे थोडके !
आपली मराठी भाषा खूप समृद्ध आहे तिला फार मोठे शब्द भांडार लाभले आहे. मराठी भाषेत प्रत्येक शब्दाचा वेगळा अर्थ आहे त्या उलट ईंग्लिशमध्ये एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ आहेत. फार मोठा इतिहास आहे आपल्या भाषेला आणि खूप महान कवी ,लेखक ह्यांनी आपल्या लेखणीने मराठी साहित्य आणखी समृद्ध केले आहे पण आपणच तिला जगभर पोहचवण्यात कुठेतरी कमी पडलो आहोत असे वाटते.
आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान तर आहेच पण तिचा प्रसार करण्यात मात्र आपणच कमी पडतो. अनेकवेळा दोन मराठी व्यक्ती भेटल्यावर मराठीत न बोलता हिंदी,ईंग्लिशमधे संवाद साधतात. हिंदी राष्ट्रभाषा आणि ईंग्लिश जागतिक मान्यता असलेली भाषा आहे हे मान्य आहे पण शक्य असेल तेव्हा मराठीत बोलण्याचा प्रयत्न तर आपण करू शकतो.
मराठीची गळचेपी होते अशी विधाने नेहमी केली जातात पण ही गळचेपी इतर कोणी नाही आपणच करत असतो. इतरांकडे बोटे दाखवताना आपण स्वतहाला सहज विसरतो. रिक्षा, टॅक्सी मध्ये बसल्यावर चालकाला मराठी येते की नाही ह्याचा विचार न करताच हमखास मराठी माणसे हिंदीत बोलतात मग त्यांना मराठी येत नाही ते मराठी शिकण्याचा प्रयत्न करत नाही अशी ओरड करण्यात काय अर्थ आहे.
आज जर्मन,फ्रेंच ह्या भाषा जगभरात पोचल्या हे फक्त तेथील लोकांमुळेच त्यांनी त्यांच्याच भाषेत अनेक तंत्रे विकसित करून जगाला त्या भाषा शिकण्यास भाग पाडले. आपली मुले मराठी माध्यमांत शिकतात हे सांगताना आपल्याला लाज वाटते पण ती फ्रेंच ,जर्मन भाषा शिकत आहेत हे मात्र आपण अभिमानाने सांगत असतो.
प्रत्येक मराठी माणसाने जर ह्या मराठी दिनाच्या निमित्ताने आपल्या भाषेचा प्रसार करण्यात खारीचा वाटा जरी उचलण्याचा संकल्प केला तर फ्रेंच,जर्मन भाषेप्रमाणे मराठी भाषाही अभिमानाने आणि आनंदाने शिकली जाईल आणि सर्वदूर पसरेल.
श्रद्धा हेगिष्टे
"आपली मराठी "
- adwaitk007
- Global Mod
- Posts: 137
- Joined: 26 Oct 2010 23:20
- नाव: अद्वैत
- आडनाव: कुलकर्णी
- Contact:
Re: "आपली मराठी "
कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!
स्पर्धेसाठी शुभेच्छा!
स्पर्धेसाठी शुभेच्छा!

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”
Who is online
Registered users: Google [Bot]