आज 08 फेब्रुवारी 2016 13:25
Change font size

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११

ओळख --- ' स्व ' ची जाणीव

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!

ओळख --- ' स्व ' ची जाणीव

Postby bageshri » 28 फेब्रुवारी 2011 10:09

मी कोण? जन्मापासून किंबहुना कळायला लागल्यापासून या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ' नांव सांगणं'. आधी त्या नावामागे वडिलांचा नांव,आडनाव आणि लग्न झाल्यावर नवऱ्याच नाव, आडनाव इतकाच सांगत आले. पण या विश्वाच्या पसाऱ्यात माझा स्थान काय ? माझी भूमिका काय? असे बरेच प्रश्न मनात यायला वयाची तिशी ओलांडून जावी लागली. कदाचित यालाच 'समज येणं' किंवा इंग्लिश मध्ये maturity अस म्हणत असतील.आणि मग हि ओळख,जाणीव करून घेण्यासाठी धडपड सुरु झाली.आधी खूप पुस्तके,लेख,वृत्तपत्रे, टीव्ही जिथे जिथे मिळेल तिथल्या माहितीतून 'स्व' च शोध घेऊ लागले आणि मग हाती लागला एक 'सुंदर सत्य'.
' मी आहे एक जीव, ज्यावर देहाचे कपडे घालून परमेश्वराने पाठवलाय इच्छा,वासना पूर्ण करायला. जर या कपड्यांमध्ये इच्छा पूर्ण नाहीच झाल्या तर परमेश्वर पुन्हा नवीन कपडे (देह) घालून पाठवेल. पुन्हा इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड...पुन्हा पुन्हा हेच होणार. '
पण मग हे किती वेळा होणार ? जोपर्यंत मी ह्या इच्छामध्ये अडकून पडणार तोपर्यंत. मग माझा ( जीवाचा ) ध्येय काय ? तर त्या परमेश्वराची, पूर्णा ची प्राप्ती. त्याच्या परम गतीला पोचण. म्हणजेच मोक्ष मिळवणं.
आणि हे सत्य अर्जुनाला कालवा म्हणून श्रीकृष्णांनी १८ अध्याय सांगितले.अर्जुनाला सर्वतर्हेने,सर्वप्रकारे उपदेश,मार्गदर्शन केलं. अर्जुन योद्ध होता,शूरवीर होता,निडर होता.पण दोन धर्म संकटा मध्ये अडकला होता, मानसिक द्वंदामध्ये होता. त्याला 'मोक्षाच्या दिशेने' नेण्यास योगेश्वर श्रीकृष्णांनी सहाय्य केलं. आज मी अजून तरी अशा धर्म संकटामध्ये,द्वंदा मध्ये अडकलेली नाही. पण म्हणून मी त्या अडचणीच्या क्षणाची वाट बघत बसायची का? माझ्याकडे भगवंताच मार्गदर्शन आहे. त्या अजुनामुळे आज ५००० वर्ष झाली तरी ते प्रत्येक मानवाला मार्गदर्शन करताय. मग मी का थांबली आहे????
मला जाणीव झाली आहे कि मी ' अपूर्ण' आहे, आणि 'अपूर्णच' राहणार आहे,जोपर्यंत मला त्या 'पुर्णत्वाच' साहाय्य मिळणार नाही.
आणि हि 'जाणीव' होताच पुर्णत्वामध्ये विलीन होण्याच्या मार्गात मी पहिलं पाऊल टाकलंय. आता पुढची पावलं कशी टाकायची यासाठी तो 'पुर्ण' च मदत करणार यात काही शंकाच नाही.

सौ.बागेश्री प्रशांत येवारे.


--- श्रीकृष्णार्पनामास्तु
bageshri
 
प्रतिक्रिया: 2
Joined: 27 फेब्रुवारी 2011 11:40
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time
Has thanked: 0 time
Been thanked: 0 time

ओळख --- ' स्व ' ची जाणीव

Sponsor

Sponsor
 

Re: ओळख --- ' स्व ' ची जाणीव

Postby adwaitk007 » 07 मार्च 2011 14:13

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)
-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
 
प्रतिक्रिया: 135
Joined: 26 ऑक्टोबर 2010 23:20
Has thanked: 2 times
Been thanked: 3 times
Has thanked: 2 times
Been thanked: 3 times


Return to लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११

cron

मराठी कॉर्नर विजेट


हे विजेट आपल्या ब्लॉगवर लावून या websiteची माहिती आपल्या वाचकांना देऊ शकता.
Marathi


कोड तुमच्या ब्लॉगवर लवण्यासाठी Ctrl+C व Ctrl+V चा वापर करा


फेसबूकवर आमचे चाहते बना!
ट्विटरवर आमचे चाहते बना!
तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा


आम्ही आधिच promise केल्यानूसार "तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!" हा विभाग सुरू करीत आहोत. इथे आपला ब्लॉग जर जोडला जावा असे वाटत असेल तर इथे click करा : तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा
जर आपणाला आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आम्हाला इथे लिहून कळवा marathicorner@gmail.com

सदस्य प्रवेश