लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
Pramod1
Rgistered member
Rgistered member
Posts: 8
Joined: 02 Nov 2010 01:40
नाव: pramod
आडनाव: sawant

लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११

Postby Pramod1 » 28 Feb 2011 00:24

स्त्री जन्मा....
नुकताच पत्रकार दिन साजरा करण्यात आला. ‘दर्पण’ हे मराठीतील सर्वार्थाने पहिले नियतकालिक सुरु करणारे बाळशास्त्री जांभेकरांचा ६ जानेवारी हा जन्मदिन. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिन पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे शिलेदार जे आपापल्या लेखणीने समाज प्रबोधनाचे काम करतात त्यांचा गौरव केला जातो. ज्या पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या जोरावर पत्रकारितेला वळण दिले त्यांचे स्मरण केले जाते.
मुंबई पत्रकार संघानेदेखील अशाच काही पत्रकारांचा त्यांच्य़ा लक्षणीय कामगिरीला सलाम करून गौरव केला. या गौरव मूर्तींमध्ये एक महिला पत्रकार होती दीप्ती राऊत. ग्रामीण भागातील महिलांच्या समस्या प्रखरपणे मांडल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी पुरुष पत्रकार व महिला पत्रकार अशी आजच्या काळातदेखील होणारी तुलना योग्य नसल्याचे म्हटले. परंतु दिप्ती राऊत यांना मिळालेला पुरस्कार महिला पत्रकारांना स्फूर्तीदायी ठरेल.
याच दिवशी दै. प्रहार मध्ये एक छोटे खानी बातमी वाचली. बातमी वर्ध्याची होती. एका प्रियांका नावाच्या मुलीला रस्त्यावरून चालताना काही मुले नेहमी छेडत असत. एके दिवशी तिने आपल्या वडलांच्या कानी ही बाब घातली. तिचे वडील जाब विचारण्यासाठी त्या मुलांकडे गेले असता त्या मुलांनीच त्यांना मारण्यास सुरु केले. आपल्या बाबांना सोडविण्यासाठी पुढे सरसावलेल्या प्रियांकाला त्यातल्या काही मुलांनी पकडले व तिच्या अंगावर घासलेट टाकून पेटवून दिले. भर रस्त्यात हा प्रकार घडत असताना त्या बाप-लेकीच्या मदतीला कॊणी पुढे आले नाही. भरपूर भाजल्याने प्रियांकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
‘वर्धा’ म्हटले की आठवते ते महात्मा गांधीजींचे परमशिष्य आचार्य विनोबा भावेंचे वास्तव्य असलेले पवनार आश्रम. आचार्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या वर्ध्यामध्ये असा प्रसंग घडणे यापेक्षा आणखी दुर्दैव ते कोणते?
वरील दोन्ही बातम्यांम्ध्ये स्त्री केंद्रस्थानी आहे, परंतु वेगवेगळ्या दृष्टीकोनातून. एक जी स्वत: बातमीदार आहे, जी बातम्या मिळविते तर दुसरी स्वत:च एक बातमी झाली. आपण महाराष्ट्रात राहतो की बिहारमध्ये हा प्रश्नदेखील आजकाल मनामध्ये येत नाही. कारण मागासलेला बिहार जाती पातीचं राजकारण विसरून विकासाच्या मुद्द्यावर सत्तांतर घडवून एका नव्या दिशेची चाहूल देतो तर आपण मात्र पुतळा आणि नामांतरामध्ये अडकलोय. या सगळ्या धबडग्यात स्त्रीची मात्र दररोज शिकार होतेय. मग ती दहा वर्षाची असो की पन्नास.
आपण फक्त दरदिवशी वर्तमानपत्र उघडायचे, वाचून हळहळायचे बस्स. शेवटी सामान्य मराठी मान्सं आपण, नाही का?...


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:12

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: Google [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 2 users online :: 1 registered, 0 hidden and 1 guest
Registered users: Google [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1782
Total topics 1433
Total members 632
Our newest member mitamadhu
No birthdays today