द लास्ट किस !

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
deepakparulekar
Rgistered member
Rgistered member
Posts: 5
Joined: 16 Nov 2010 15:04
नाव: दीपक
आडनाव: परुळेकर
Location: Mumbai
Contact:

द लास्ट किस !

Postby deepakparulekar » 27 Feb 2011 12:18

अश्वत्थामा, त्या जंगलातून सुसाट पळत सुटला होता. एका हाताने कपाळावरची भळाभळा वाहणारी जखम पुसतं, त्या घनदाट जंगलातून वाट मिळेल तिथे, झाडाझुडुपातून, काट्यातून कसलीही अगदी जीवाचीही पर्वा न करता पळत सुटला होता. कपाळावरची जखम ताजी होती आणि धावण्याच्या वेगाबरोबर ती ठणकत होती. किती तरी वेळ तो असाच धावत होता. घसा तहानेने कोरडा पडला होता.. धावता धावता मध्येच त्याचा पाय घसरला आणि तो घसरत,घरंगळत्,गडगडत खाली गेला.जेव्हा तळ लागला तेव्हा त्याचे तोंड एका छोट्या वाहणार्‍या ओढ्याला लागले. कैक वर्षांपासून तहानेने व्याकूळ असल्यागत त्याने घटाघट ते पाणी पिउन घेतले. पाणी पोटात जाताच त्याचे डोळे जड झाले आणि त्या शीतल प्रवाहाच्या काठावर तो तसाच निद्राधीन झाला. बर्‍याच वेळाने जंगलातल्या किलबिलाटाने त्याला जाग आली. किलकिल्या डोळ्यांनी त्याने समोर पाहिले. ओढा शांतपणे वाहत होता. सुर्य मावळण्याच्या तयारीत लगबगीने जात होता. त्या घनदाट जंगलात त्याचं एखाद दुसरं किरण पडलं होतं.हळूहळू त्याने डोकं वर उचललं आणि आकाशाकडे तोंड करुन तो उताणा पडला. डोक्यावरची जखम तीव्रतेने ठणकली तसा त्याने त्या जखमेवर हात फिरवला. जखम अजुनही संथ वाहत होती आणि रक्त डोक्यावरुन ओघळून मानेपर्यंत गोठले होते. बाजुच्या झुडुपांच्या आधाराने तो कसाबसा उठुन बसला. विषण्ण नजरेने समोर पाह्त असतानाच, कंबरेला काही तरी टोचतय हे जाणवून त्याचा हात आपसूक कंबरेला गेला त्याने चाचपून पाहिले आणि ती वस्तू हातात लागताच तो चक्रावला... ते एक पिस्तुल होते!!!!

ते पिस्तुल त्याने समोर धरले आणि त्याच्या डोकं गरागरा फिरु लागलं... त्या पिस्तुलाकडे पाहत धडाधड त्याला सर्व काही आठवू लागलं.... मी अश्वत्थामा नाही.. मग मी कोण?

त्याने परत जखमेला हात लावला!!
वेदनेची एक भयंकर कळ त्याच्या ह्रदयातून सरसरत गेली.. जखम अजुनही तशीच ताजी होती..
अविरत वाहणार्‍या जखमेवरून कुणाला अश्वत्थामा म्हणता येत नाही पण अविरत वाहणारी जखम फक्त अश्वत्त्थामालाच होत नाही!!
त्याने स्वतःकडे पाहिले त्याचे कपडे रक्ताने आणि चिखलाने माखले होते.. वेगाने फिरणारे विचारांचे चक्र १० तास मागे गेले आणि त्याला काहीतरी आठवलं. तो कडा! भिरभिरणारा पाउस, गार वारा आणि त्यात गारठलेली, शहारलेली प्रीती!!! प्रीती??? कोण प्रीती?? मी कोण?? तो परत आठवू लागला..

त्या कड्यावर तो आणि प्रीती उभे होते.खाली हिरवीगार खोल दरी. तळही न दिसणारी.. भिरभिरणारा पाउस..आणि त्या पावसात चिंब भिजलेले..भिजून गारठून गेलेली प्रिती..तिच्या चेहर्‍यावरुन निथळणारे थेंब थरथरणार्‍या तिच्या ओठांवरुन ठीपकत वाहत होते. तो तिच्या त्या चिंब झालेल्या सर्वांगाला न्याहळात उभा होता.. त्याला आठवलं पहिल्यांदा पावसात भिजलो होतो तेव्हा ही ती तशीच दिसत होती... गारठल्याने ती कुडकूडत उभी होती, झोंबणारा वारा सहन न होताच ती हळूच त्याच्या मिठीत शिरली आणि त्याला घट्ट बिलगली.. तिचे हात त्याच्या कमरेला वेढलेले असतानाच तिच्या हाताला काहितरी लागले.. तिने चाचपले.. त्याचं लक्ष्य नव्हतं..तो तिच्यात धुंद झाला होता...एव्हाना त्याचं लक्ष्य गेलं."निहार?? हे हे तुझ्या सॅकमध्ये काय??"

निहार, माझं नाव निहार.. निहार प्रधान...!! त्याला आठवलं..
"निहार काय आहे त्या सॅकमध्ये??"


परत तो आठवू लागला..
युसुफ भाई,डोंगरी,सँडहर्स्ट स्टेशनच्या बाजुचा भिकारी.ती बकाल, घाणेरडी चाळ, आणि त्या चाळीच्या वरच्या मजल्यावर एका खोलीत बसलेला युसुफ भाई! पानाने रंगलेले तोंड, एखाद्या ड्रॅकुलासारखा दिसत होता. बाजुला तो भिकारी,जो त्याला तिथे घेउन गेला होता..


"साठ हजार??? बहुत ज्यादा है सर!"
"सर???" त्याच्या सर या शब्दावर तो तोंडातलं पानाचं रक्त ओके पर्यंत हसला.
"सर?? ए,हनिफ चर्सी, किधर से लाया रे इसको?? हा हा हा !! सर !! सर, आप बहोत शरिफ मालुम होते है, काय कु इस झमेले में पडते हो??"
"आपको क्या इससे??आप को बेचना है की नहीं बोलो??"त्याचा आवाज जरा चढला,त्यबरोबर युसुफभाईच्या पानाचा रंग त्याच्या डोळ्यात चढला,
"देखो मियाँ, ये बाजार में बिकने वाली भिंडी नहीं है जो किलो के भाव में बेची जाती है, ये पिस्तौल है. एसकी एक गोली की किमत किसी की बेशकिमती जान लेती है!" युसुफ भाईचे शेवटचे शब्द त्याला टोचले..
"ठीक है, जैसा आप ठीक समझो! त्याने ब्रीफकेस उघडली आणि ६ गड्ड्या समोर ठेवल्या.. हनिफची त्याच्या ब्रीफकेसवर असलेली अधाशी नजर त्याच्या नजरेतुन सुटली नाही.पाचशेची एक नोट त्याने हनिफ समोर धरली, हनिफचे डोळे तरारले.नोटांची बंडले उचलताच युसुफ ने एका खोक्यातुन एक पिस्तुल काढले आणि त्याच्या हातात दिले.दोन क्षण तो त्या पिस्तुलाकडे बघतच राहिला..
"कभी चलायी भी है मियाँ?"
"वक्त सब कुछ चलाना सिखाता है!" त्याच्या डोळ्यातली धगधग आता पेटली होती.
"खुदा हाफीस, युसुफ भाई!" तो जायला वळला आणि युसुफने त्याच्या खांद्यावर हात ठेवला," सरजी! जब भी इसे चलाओगे, हजार बार सोचना..क्यों कि, जब गोली चलेगी वापस नहीं आएगी!"
तो फक्त हसला आणि तिथुन निघाला...

" हॅलो, प्रिटी,! या!! कॅन यु हिअर मी???"
"या?? हे! अ‍ॅम मिस्सिंग यु बॅडली!! कधी तुला पाहतोय असं झालयं!"
"अरे फ्लाईट ५ तास लेट आहे! मी बहुतेक सकाळी ९/१० वाजता पोहचेन!"
"शीट ! बघ ना! प्यार की दुशमन एअरलाईन्स!!"
"काय माहित?? एमरजन्सी लँडींग केलीय..! !"
"नो नो ! डोन्ट वरी! एव्हरीथिंग विल बी ऑलराईट! घाबरु नको तुला बघितल्याशिवाय मी मरणार नाही!! आय लव्ह यु सो मच!! चल ठेवतो..लव्ह यु अ‍ॅन्ड टेक केअर!!"

डोंगरीहुन पिस्तुल घेउन निघताना त्याने गाडी ऑन केली आणि फ्लाईट हॉल्टला असताना प्रितीशी झालेलं संभाषण त्याला आठवलं. संध्याकाळचे ७ वजले होते.क्रॉफर्ड मार्केटमधून सरळ तो मरीनलाईन्सला बाहेर पडला आणि मरीन ड्राईव्ह वरुन ड्राईव्ह करताना त्या किनार्‍याबरोबर त्याचे मन अलगद मागे जाउ लागले. त्याला ते ठीकाण दिसलं जिथे पहिल्यांदा त्याने प्रितीला भर पावसात, उधाणलेल्या समुद्राच्या समोर किस्स केलं होतं.. त्याला राहवलं नाही. गाडी तिथेच पार्क करुन तो उतरला..आणि त्या कठड्यावर उभा राहिला..खूप वेळ समुद्राकडे बघत.. सेलफोनच्या वाजण्याने तो भानावर आला..प्रितीचा कॉल होता.." या प्रिटी??या, अ‍ॅम ऑन द वे! हो, यु गेट रेडी वी अर गोईंग आउट फॉर अ डीनर!! या विदीन २० आय'ल बी देअर! बाय!!"आता रात्र किर्रर्रर्र झाली होती. जंगलातला काळोख चोहीकडून त्याला घेरत होता.सारे अंग ठणकत होते.आणि कपाळावरची जखम तर ठणकायची बंदच होत नव्हती. मध्येच कुठुन तरी कसले तरी चित्र-विचित्र आवाज त्याची गाळण उडवत होते. रात्र तिथेच काढणं त्याला भाग होती. कसलाही आवाज न करता तो शांतपणे पडुन राहिला. जसजसा काळोख गहीरा होत गेला तसतसे आकाश असंख्य तार्‍यांनी उजळू लागले..किलकिल्या डोळ्यांनी तो आकाशात पाहू लागला.एकाएका तार्‍याला निरखून पाहू लागला..
ते दोघे मनातल्या मनात असेच बोलायचे.तो रात्रभर टेरेसवर पडुन असायचा आकाशातले तारे मोजत.त्या त्यार्‍यांमध्ये तिला सजवत. प्रितीच्या नावाचं नवीन नक्षत्र! आणि रात्रभर त्या नक्षत्राशी मारलेल्या गप्पा.ते आठवून त्या जंगलातल्या भयाण काळोखात त्याचा ह्रदयात हलकीशी वेदना झाली..

"तुला ठावूक आहे प्रिटी, ही माझी सगळ्यात मोठी ईच्छा होती." तो कुशीवर वळत तिच्याकडे बघत बोलला..
" कसली रे?" तिने विचारले...चांदण्यांच्या प्रकाशात तिचा चेहरा त्या चंद्रालाही लाजवत होता..
"हीच!! तुझ्याबरोबर समुद्राच्या वाळूत पौर्णिमेची रात्र आकाशातले तारे मोजत जागून काढायची...."
ती हसली..
''वेडा आहेस तू! "
"वेडं केलयं तू मला" बोलता बोलता तो तिच्या चेहर्‍यावर झुकला.तिने डोळे मिटुन घेतले.तिच्या ओठांत त्याचे ओठ मिसळून गेले. इतका वेळ शांत असलेला समुद्रही थरारला आणि त्याची एक लाट अलगद दोघांच्या पायाला गुदगुल्या करून गेली. त्याच्या बाहुच्या उशीवर ती तशीच झोपून गेली आणि तिला जाग येईपर्यंत तो तसाच तिला न्याहळत...

"मला माहित नाही मी काय करतोय ते, बट आय कॅन्ट जस्ट टॉलरेट इट एनीमोर, आय लव्ह हर,आय लव्ह हर लाईक एनिथिंग अ‍ॅन्ड आय जस्ट कॅन्ट थिंक माय लाईफ विदाउट हर!!"
"सी निहार, यु हॅव टु थिंक केअरफुली बिफोर टेकिंग एनी डीसीझन!"
"या अ‍ॅम अवेअर ऑफ इट! लेट्स होप फॉर द बेस्ट! थॅंक्स रॉन!!"
"जोजो! टु लार्ज मोर!"

एमरजन्सी लँडींग झालेली फ्लाईट लवकरच क्लिअर झाली. अवघ्या एका तासात फ्लाईट टेक ऑफ्फ झाली आणि त्याच्या जीवात जीव आला.घरी जाउन प्रिटीला सरप्राईजच देतो.तो तिच्या स्वप्नात परत हरवून गेला. मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर फ्लाईटरात्री ३ वाजता लँड झाली.
४ वाजता तो एअरपोर्टच्या बाहेर पडला. कॅब पकडली आणि घराच्या दिशेने निघाला.
काय करत असेल आता प्रिटी??झोपली असेल की माझी वाट पाहत जागी असेल?


"तू अशी विस्कटलेलीच छान दिसतेस, यूवर धिस मेस्सी लूक किल्स मी!"
हनीमूनच्या पहिल्या रात्री जेव्हा सकाळी जाग आली होती तेव्हा ती तशीच विस्कटलेली बेडवर पडली होती. किती तरी वेळ तो तिला तसाच पाहत होता.
"यु मेस्ड मी!" असं बोलून ती अलगद त्याच्या कुशीत शिरली.आजही ती तशीच दिसेल.त्याला धीर होत नव्हता.

"निहार,आपण कुठे चाललोय??"
"वी आर ऑन द वे टू हेवन! एक मस्त जागा आठवलीय!"
"पण कुठे ते सांग ना!"
"चल पोहचल्यावर बघ! तू मला विसरून जाशील!"
"मग ती जागा नक्कीच इतकी खास नसेल!"
"का गं?"
"तुझा विसर पाडेल अशी फक्त एकच गोष्ट या जगात आहे!!"
"अच्छा?? कोणती गं?"
तिने त्याचाकडे भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं,"फक्त तूच रे! अजुन काही नको मला!"
एका तासाभरात मुख्य रस्ता सोडून एका आडवाटेला त्याने कार वळवली आणि अर्ध्या तासाने एका ठीकाणी थांबवली.
पावसाळ्याचे दिवस होते.आभाळ भरलं होतं. गाडी पार्क करुन दोघेही चालू लागले.सगळीकडे हिरवीगार सृष्टी, दुधाचे पान्हे फुटावे त्याप्रमाणे डोंगरातुन पांढरेशुभ्र झरे, धबधबे कोसळत होते्. गार वार अंगाला झोंबून जात होता. एका दोन तास मस्तपैकी गप्पा मारत्,गाणी गात ते वर चढुन गेले. चालत चालत ते एका कड्यावर आले. आणि समोरचं दृश्य बघुन प्रिती हरखून गेली.सगळीकडे हिरवळ पसरली होती. ते दोघे ज्या कड्यावर उभे होते तिथे खोलवर पसरलेली एक दरी.दूर कुठुन तरी दुथडी भरून वाहणारी नदी,सगळीकडे नुसती हिरवळ्,गानारे पक्षी,कोसळनारे धबधबे! खरोखरच स्वर्ग होता तो!! हलका हलका पडणारा पाउस आता कोसळू लागला आणि इतका कोसळू लागला की समोरचं काहीच दिसेना. दोघेही पावसात धुंद झाले होते. ती एकटक त्या निसर्गाचच्य चित्राकडे देहभान हरपून बघत उभी होती.
"बोललो होतो ना मी की तू मला विसरून जाशील म्हणून!"
ती लाजली "नाही रे, तुझ्याइतकं मला कोणीही वेड लावू शकत नाही!"
बोलताना ती गारठलेली होती आणि थंडीने थरथर कापत होती. तिला त्याने जवळ घेतलं,ह्रदयाशी घट्ट कवटाळलं. त्याच्य डोळ्यांतुन आसवे वाहू लागली पण पावसाच्या पाण्यात तिला ती जाणवली नाहीत.
"प्रिटी??"
"हं?" ती मिठीतुन दूर न होताच उदगारली!
"आठवतं तुला मरीन ड्राईव्हवरची पहीली किस्स? असाच पाउस कोसळत होता ना!"
"हो!" त्याने तिचा निथळणारा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीतघेतला आणि थरथरणार्‍या तिच्या ओठांवरील थेंबांना प्राशुन घेवू लागला. कितीतरी वेळ दोघे एकमेकांत विरघळून गेले होते...

"निहार!!!!! नको प्लीज! निहार ! अ‍ॅम सॉरी! निहार! आय लव्ह यु, आय लव्ह यु सो मच!"
घाबरलेली प्रिती कड्याच्या टोकावर कशीबशी लोंबकळत, वर येण्यासाठी हात पाय मारत प्रयास करत होती.भीतीने तिचं शरीर गलितगात्र झालं होतं. ती त्याच्याकडे गयावया करत होती.
तो खाली झुकला.कपाळावर हात ठेवून तिच्याकडे बघू लागला. कमरेच्या सॅकमधे असलेले पिस्तुल बाहेर काढले..
"अ‍ॅम सॉरी प्रिटी! अ‍ॅम रिअली सॉरी! आय लव्ह यु टु स्विटहार्ट! आय लव्ह यु लाईक एनिथिंग!" तिच्या कापाळाचं चुंबन घ्यायला तो खाली झुकला आणि प्रितीने तिच्या हाताला लागलेला दगड जोरात त्याच्या कपाळावर मारला! तो व्हिव्हळला आणि त्या वेदनेत एक गन शॉट फायर झाला!
" निहाहाहाहार...!!!!!!" एक आर्त किंकाळी दरीत कोसळली.....

कॅब थांबताच तो पळतच बिल्डींगमध्ये शिरला.लिफ्टची वाट न बघताच पळतच चार फ्लोअर चढून गेला. त्याच्याकडल्या चावीने त्याने हळूच दरवाजा उघडला. सकाळचे ५ वाजले होते.
ती झोपली असेल का? त्याला धीर होत नव्हता. आज २ महिन्यानी तो तिलाबघणार होता. त्याचे सारे प्राण अधिर होउन त्याच्या डोळ्यात साठले होते.बेडरुमचा दरवाजा हळूच लोटला आणि ती त्याला दिसली.
तशीच विस्कटलेली.....
पण.....


यावेळी तिला विस्कटवणार्‍या कुणा दुसर्‍याच्या मिठीत ती विसावली होती........


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: द लास्ट किस !

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:13

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: No registered users

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 0 registered, 0 hidden and 3 guests
Registered users: No registered users
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1804
Total topics 1437
Total members 638
Our newest member maharashtrianamit
No birthdays today