पूर्वी आणि आता

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
kedarlasane
Rgistered member
Rgistered member
Posts: 17
Joined: 03 Dec 2010 22:01
नाव: केदार
आडनाव: लसणे
Contact:

पूर्वी आणि आता

Postby kedarlasane » 24 Feb 2011 20:18

कुठे गेले ते पूर्वीचे दिवस? delete झाले कि काय recycle bin मधून?
अस का वर बघताय? पण ते खर आहे.अजून काही दिवसांनी तरी असे म्हणण्याची वेल येवू नये?
मला नेहमी आमच्या गुरुजींनी सांगितलेला एक सुविचार नेहमी आठवतो तो असा कि
माणूस पक्ष्यांप्रमाणे आभाळात उडायला शिकला आहे,माश्याप्रमाणे पाण्यात पोहायला शिकला आहे,परंतु जमिनीवर माणसाने माणसासारखे राहण्याची वेळ आहे
.अरे तुम्ही म्हणत असाल कि पूर्वीच्या दिवसात मधेत सुविचार कुठून आले?विषय बदलला कि काय? मुळीच नाही!अरे सुविचार पूर्वीचेच
मला पूर्वीचे दिवस आठवले कि डोळ्यात नेहमी पाणी येते कारण काय ते पूर्वीचे दिवस होते.दररोज दिवे लागण्याच्या वेळी सर्वजन मिळून "शुभं करोति" म्हणत .आजकालच्या मुलांना "शुभं करोति" म्हणा असे म्हटले कि लगेच प्रश्न विचारतात
ते काय असत आणि ?कश्यासाठी?
चूक त्यांची नाहीये.चूक आपली आहे कारण लहानपणीच त्यांना चांगले संस्कार मिळत नाहीत. संस्कार झाले तरी पुढे संगतीचा परिणाम होतो.लहानपण हेच वय असते कि याच वयात कुंभार भांड्याला आकार देतो.
पुढे गेल्यावर जेव्हा मुलगा शाळेत जातो तेव्हा बरेच काही तो शिकतो (चांगले व वाईट सुद्धा).जेव्हा विध्यार्थ्याची परिक्षा असते तेव्हा त्याचे पालक त्याला जाताना बडीशेपची पुडी देतात? इथेच आपले चुकते कारण पुढे गेल्यावर मुलाला व्यसनाची सवय लागते.पूर्वी मुलाकडे पैसेच नसत.त्यामुळे त्यांना कसलेही व्यसन नव्हते.आज एवढ्या लहान वयात मुलाकडे १०० आणि २०० रु असतात.शिवाय पालकांचे प्रेमही उतू जाते ."बाळा आज बाहेरच जेवण कर हा!हे घे १०० रुपये" असे म्हणून आपण मुलांना बाहेरचे अशुद्ध अन्न खाऊ घालतो.
हे झालं मुलाबाबतीत. आता आपल्याबद्दल
का आजकाल Newton,Einstein जन्माला येत नाहीत? का आपण विचार करत नाहीत .खरे पाहता प्राचीन भारत समृद्ध होता.हे मी मोहिन्जादाडो व हडप्पा येथे सापडलेल्या अवशेषावरून बोलत आहे .किती प्रमाणबद्ध इमारती!इसवी सणाचा चौथ्या शतकात बांदले गेलेले तक्ष्याशीला विद्यापीठ त्यात शिकणारा संस्कृत तज्ञ पाणिनी.का नाही आज आर्यभट्टासारखे गणित तज्ञ जन्माला येत नाहीत.प्रत्येकाला आपण भारतीय असल्याचा गर्व असला पाहिजे .नुसता गर्व नाही तर प्रत्येकाने काहीतरी भारतासाठी केले पाहिजे.आपले करणे स्वत:पुरतेच?जरा इमारतीच्या ,गल्लीच्या ,गावाच्या बाहेर या .एवढे कायम लक्षात असु द्या कि भारत हा एकमेव असा देश आहे कि ज्याने संपूर्ण जगाला शून्याची देणगी दिली आहे.आज जर शून्याच नसता तर तुमचे आमचे बोलणे झालेच नसते.तुम्ही म्हणाल आपण मोबाईलवर बोलू पण ते शक्य नाही कारण तुमचा मोबाईल तुमचे ऐकत नाही कारण त्यला फक्त 0 आणि 1 हे दोनच अंक कळतात.एवढाच काय तर तुम्ही सध्या वापरात असलेला संगणक सुद्धा 0 आणि 1 वर चालतो. जर भारताने 0 अंकच दिला नसता तर तुम्ही आम्ही नसतोच जवळपास

चला आता बस झालं! पुन्हा भेटूच
Last edited by kedarlasane on 11 Mar 2011 22:28, edited 1 time in total.


कळावे ,
KedarLasane
https://kedarlasane.com
User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: पूर्वी आणि आता

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:13

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today