शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

हि लेखमाला स्पर्धा मराठी कॉर्नरवरिल पहिलीच स्पर्धा आहे. सहभाग घेण्याआधी स्पर्धेचे नियम काळजीपूर्वक वाचा!
prakashpolindia
Posts: 1
Joined: 14 Jan 2011 15:35
नाव: Prakash
आडनाव: Pol

शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

Postby prakashpolindia » 21 Feb 2011 00:53

जिजाऊ.....स्वराज्याची प्रेरणा......जगातील प्रत्येक माणसाने आदराने नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती.
प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच
असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही जिजाऊनी
शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मीही -
पारतंत्र्यात आहोत, ही दिलेली जाणीव होती.
छ. शिवरायांनी स्वराज्याची स्थापना करून मावळ्यांच्या मनात स्वाभिमान निर्माण केला. हे आपले राज्य आहे, आणि आपण त्यासाठी लढले पाहिजे हा आत्मविश्वास निर्माण केला. आज आपण म्हणतो घराघरात शिवाजी जन्माला यावे, पण शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल हे मात्र सोईस्करपणे विसरून जातो.

जिजाऊनी शिवबावर संस्कार केले, शिवबा घडवले आणि स्वराज्याचे रणशिंग फुंकले. बलाढ्य आदिलशाही, निजामशाही, मुघल या सत्तांना न जुमानता जिजाऊनी शिवबाला लढायला प्रोत्साहन दिले. शिवाजी महाराजांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचे रक्षण केले. जिजाऊ या स्वत शिकलेल्या होत्या. अक्षरज्ञानाबरोबर घोडयावर बसने, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी ई. चे प्रशिक्षण जिजाऊनी घेतले होते. जिजाऊ या अत्यंत संयमी आणि करारी स्वभावाच्या होत्या. गोरगरीबाप्रती आपुलकी आणि दुष्टांना शासन अशा प्रकारचा त्यांचा स्वभाव होता. तसेच संस्कार त्यांनी शिवाबावर केले. छ. संभाजीरांवर केले. त्यामुळेच पुढे संभाजी राजांनी शृंगारपुर चे सुभेदार असताना दुष्काळग्रस्त प्रज्येकडून एक वर्ष शेतसारा वसूल न करण्याचा निर्णय घेतला. (तेव्हा संभाजी राजांच्या या उदारपणांचे कौतुक करायचे सोडून ते अकार्यक्षम मंत्री आहेत अशी ओरड त्यांच्या अष्टप्रधान मंडळातील नतद्रष्टांनी सुरु केली होती.) संभाजी राजांचे हे वर्तन म्हणजे जिजाऊच्या संस्काराचाच परिणाम नव्हे काय ? छ. शिवरायांनी स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाला कडक शिक्षा दिली. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता होय हा संस्कार जिजाऊनी शिवबा आणि शंभूराजांवर केला. जिजाऊनी जे संस्कार आपल्या मुलावर आणि नातवावर केले त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही. त्या संस्कारामुळेच आज या दोन छत्रपतींची नावे घेतली कि आपण आपोआप नतमस्तक होतो. प्रत्येक आईने जर जिजाऊ सारखी भूमिका घेवून अन्याय, विषमता, जातीव्यवस्था याविरुद्ध लढणारे “शिवाजी” निर्माण केले तर पुढील काळात समाजात निश्चितच चांगले चित्र पाहायला मिळेल. आणि मला वाटते हीच जिजाऊ ना खरी आदरांजली ठरेल.


arvind
Rgistered member
Rgistered member
Posts: 9
Joined: 17 Nov 2010 17:36
नाव: Arvind
आडनाव: Khanolkar

Re: शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

Postby arvind » 22 Feb 2011 11:37

विचार छान आहेत. पण जिजाऊ आणि शिवबा घडतात की घडवता येतात याबद्दल प्रमाणिक शंका आहे.
अरविंद


User avatar
adwaitk007
Global Mod
Global Mod
Posts: 137
Joined: 26 Oct 2010 23:20
नाव: अद्वैत
आडनाव: कुलकर्णी
Contact:

Re: शिवाजी जन्माला येण्यासाठी आधी आम्हाला जिजाऊ घडवावी लागेल

Postby adwaitk007 » 07 Mar 2011 14:14

कृपया लेखाच्या शेवटी आपले नाव मराठीमध्ये ठळक अक्षरांत लिहावे! तेच नाव तुम्हाला मिळणार्‍या प्रशस्तिपत्रावर जसेच्या तसे येणार आहे. त्यामुळे ते काळजीपूर्वक लिहावे!

स्पर्धेसाठी शुभेच्छा! :)


-अद्वैत
मराठी कॉर्नर ग्लोबल मॉडरेटर

Return to “लेखमाला स्पर्धा- फेब्रुअरी २०११”

Who is online

Registered users: Bing [Bot]

Login · Register

तुमचा ब्लॉग आमच्याशी जोडा!

ही सुविधा लवकरच पुन्हा सुरू होत आहे.

मराठी कॉर्नरची संक्षिप्त माहिती

In total there are 3 users online :: 1 registered, 0 hidden and 2 guests
Registered users: Bing [Bot]
Most users ever online was 148 on 11 Dec 2012 21:52
Total posts 1831
Total topics 1439
Total members 648
Our newest member jdchivadi
No birthdays today